Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Online PF Check: ऑनलाइन पीएफ कसा चेक करावा, हे ॲप आणि वेबसाइट करेल तुमची मदत; संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या

आपल्या पगारातून एक विशिष्ट रक्कम आपल्या पीएफ खात्यात ट्रांसफर होत असते. ही रक्कम साठून किती झाली आहे ते तपासण्यासाठी तुम्ही वेबसाइट किंवा ॲपचा वापर करू शकता. पीएफमध्ये असलेली रक्कम एसएमएस आणि मिस्ड कॉलद्वारेही कळू शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 06, 2025 | 12:13 PM
Online PF Check: ऑनलाइन पीएफ कसा चेक करावा, हे ॲप आणि वेबसाइट करेल तुमची मदत; संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या

Online PF Check: ऑनलाइन पीएफ कसा चेक करावा, हे ॲप आणि वेबसाइट करेल तुमची मदत; संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

पीएफ म्हणजेच प्रोविडेंट फंड ही नोकरदार लोकांसाठी महत्त्वाची रक्कम आहे. दर महिन्याला नोकरदार लोकांच्या पगारातून ठराविक रक्कम रजा होऊन पीएफमध्ये जमा केली जाते. ही रक्कम कंपनीतर्फेच जमा केली जाते. अशात अनेकदा आपला पीएफ जमा तर होत असतो मात्र जमा होऊन आता त्याची रक्कम किती झाली आहे हे अनेकांना ठाऊक पडत नाही. पीएफ ही एकप्रकारची आपली सेव्हिंगच आहे जिला आपण कधीही बाहेर काढून गरजेच्या वेळी त्याचा वापर करू शकतो.

अनेकांना हे ठाऊक नाही पण तुम्ही ऑनलाइन पद्धतीने आपला पीएफ बॅलेन्स चेक करू शकता. अनेक लोक ऑनलाइन पीएफ बॅलेन्स चेक करताना गोंधळून जातात. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही हे वेबसाइट किंवा ॲपद्वारे चेक करू शकता. एवढेच नाही तर पीएफमध्ये असलेली रक्कम एसएमएस आणि मिस्ड कॉलद्वारे देखील कळू शकते. सरकारने EPFO ​​ॲप आणि उमंग ॲप देखील तयार केले आहे, जे घरी बसलेल्या लोकांना त्यांच्या पीएफ अकाऊंटमध्ये किती रक्कम जमा आहे हे जाणून घेण्यास मदत करते. चला याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

India VS New Zealand Match: आता स्मार्टफोनवरच पाहता येईल लाइव्ह मॅच; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

दोन पद्धतींनी चेक करू शकता PF Balance चेक?

पीएफ बॅलन्स साधारणपणे दोन प्रकारे तपासले जाऊ शकते. हे काम UAN नंबरसह (Universal Account Number) किंवा त्याशिवाय चेक करता येते. जर तुम्हाला UAN नंबरच्या मदतीने पीएफ शिल्लक तपासायची असेल तर तुम्हाला ईपीएफ पोर्टलवर जावे लागेल किंवा हे काम उमंग ॲपच्या मदतीने केले जाऊ शकते. तुम्हाला UAN नंबर आठवत नसेल तर, तुम्ही तुमच्या मोबाइलवरून एसएमएस किंवा मिस्ड कॉलद्वारे पीएफ बॅलन्स तपासू शकता. यासाठी 7738299899 या क्रमांकावर एसएमएस सुविधा उपलब्ध आहे. तसेच 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉलची सुविधा उपलब्ध आहे. तुमच्या पीएफ अकाऊंटशी लिंक असलेल्या नंबरवरूनच तुम्हाला मिस्ड कॉल किंवा एसएमएस पाठवण्याचे आहे, हे लक्षात ठेवा.

UAN नंबरने कसे करू शकता ऑनलाइन PF चेक?

  • UAN क्रमांकासह ऑनलाइन PF शिल्लक तपासण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे EPF वेबसाइट
  • यासाठी https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वेबसाइटवर जावे लागेल
  • तुम्ही EPFO ​​वेबसाइटला पहिल्यांदा भेट दिली असेल, तर प्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर क्लिक करून UAN ॲक्टिव्ह करा
  • तुम्हाला मुख्य वेबसाइटवर ‘Services’ पर्याय मिळेल, त्यामध्ये दिलेल्या ‘For Employees’ सेक्शनमध्ये क्लिक करा
  • ते तुम्हाला एका नवीन वेब पेजवर घेऊन जाईल, इथेही ‘Services’ एक पर्याय देखील असेल, ज्यामध्ये ‘Member Passbook’ पर्याय निवडावा लागेल
  • यानंतर तुम्हाला पुन्हा एका पेजवर रीडायरेक्‍ट केले जाईल
  • आता तुम्हाला UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे
  • यानंतर तुमच्या फोन नंबरवर 6 अंकी OTP येईल जो तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे
    OTP टाकल्यानंतर आणि Verify वर क्लिक केल्यानंतर तुमचा PF बॅलन्स स्क्रीनवर दिसू लागेल

या गोष्टी ध्यानात असूद्यात?

जेव्हा तुमचा UAN ॲक्टिव्ह होईल आणि जेव्हा तुम्ही वेबसाइटवर रजिस्‍टर्ड करता तेव्हाच तुम्ही EPFO ​​वेबसाइटवर तुमची PF बॅलन्स चेक करू शकता. जर तुम्हाला तुमचे पासबुक पहायचे असेल तर ते नोंदणीनंतर 6 तासांनंतर दिसेल. ज्या कंपन्यांचा पीएफ ट्रस्ट अंतर्गत येतो ते EPFO पोर्टलवर त्यांचा बॅलन्स चेक करू शकत नाहीत.

YouTube ला मिळालं मोठं अपडेट, Netflix आणि Prime Video सारखा दिसणार आता व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लेटफॉर्म

UMANG ॲपवरूनही करता येईल PF चेक

  • ज्यांना त्यांच्या स्मार्टफोनवर पीएफ बॅलन्स तपासायचा आहे ते सरकारचे उमंग ॲप डाउनलोड करू शकतात. हे ॲप प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे
  • पीएफ बॅलन्स तपासण्याव्यतिरिक्त, ॲपवर इतर अनेक गोष्टी करता येतात. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला लॉग इन करून सर्व्हिसेस पर्यायावर जावे लागेल
  • इथे तुम्हाला ‘Security’ चा पर्याय दिसेल. तुम्हाला तिथे जाऊन ‘EPFO’ चा पर्याय निवडावा लागेल. ‘Employee Centric Service’ वर गेल्यावर पासबुक पाहण्यासाठी UAN क्रमांक टाकण्याचा पर्याय दिसेल
  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. हा नंबर एंटर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. इथून तुम्ही तुम्ही पासबुक देखील डाउनलोड करू शकाल.

Web Title: How to check pf balance online know step by step process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 12:12 PM

Topics:  

  • EPFO
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

EPFO कडून मोठी घोषणा! PF मधील रक्कम आता सहजपणे मिळणार, कर्मचाऱ्यांना 100 टक्के पैसे काढण्याची मुभा
1

EPFO कडून मोठी घोषणा! PF मधील रक्कम आता सहजपणे मिळणार, कर्मचाऱ्यांना 100 टक्के पैसे काढण्याची मुभा

BSNL युजर्सची समस्या संपली! इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी हि आहे बूस्टर ट्रिक! 100 पैकी 80 लोकांना माहिती नाही….
2

BSNL युजर्सची समस्या संपली! इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी हि आहे बूस्टर ट्रिक! 100 पैकी 80 लोकांना माहिती नाही….

भारतात बनवले अन् जगभर विकले! 6 महिन्यांत अ‍ॅपलची मोठी कामगिरी, विदेशात निर्यात केले कोट्यावधींचे iPhone
3

भारतात बनवले अन् जगभर विकले! 6 महिन्यांत अ‍ॅपलची मोठी कामगिरी, विदेशात निर्यात केले कोट्यावधींचे iPhone

दिवाळी धमाका! केवळ 3578 रुपयांत घरी घेऊन या नवा ‘iPhone 17’, कंपनीची ऑफर वाचून तुमचाही विश्वास बसणार नाही
4

दिवाळी धमाका! केवळ 3578 रुपयांत घरी घेऊन या नवा ‘iPhone 17’, कंपनीची ऑफर वाचून तुमचाही विश्वास बसणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.