दिवाळी धमाका! केवळ 3578 रुपयांत घरी घेऊन या नवा 'iPhone 17', कंपनीची ऑफर वाचून तुमचाही विश्वास बसणार नाही
टेक जायंट कंपनी Apple ने सप्टेंबर महिन्यात नवीन आयफोन 17 सिरीज लाँच केली होती. या सिरीजमध्ये कंपनीने काही बदल केले होते. तसेच नवीन मॉडेल देखील अॅड करण्यात आले होते. नवीन आयफोन 17 खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी अॅपल स्टोअर बाहेर प्रचंड गर्दी केली होती. नव्या आयफोनची सर्वत्र क्रेझ निर्माण झाली आहे. आता तुम्ही देखील नवीन आयफोन 17 खरेदी करण्याचा विचार करताय का? पण बजेट कमी आहे? मग आता आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आलो आहोत. आयफोन 17 खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी ही ऑफर म्हणजे ‘ड्रीम डील’ आहे.
आता तुम्ही केवळ 3,578 रुपये प्रति महिना खर्च करून नवीन आयफोन 17 खरेदी करू शकता. म्हणजेच केवळ 3,578 रुपये प्रति महिना खर्च करा आणि आयफोन 17 घरी घेऊन जा. दिवाळीच्या निमित्ताने या मॉडेलवर उत्तम डिल ऑफर केली जात आहे. या आयफोन 17 मधील फीचर्स देखील अत्यंत कमाल आहेत. यावेळी कंपनीने बेस व्हेरिअंट 256GB स्टोरेजसह लाँच केला आहे. चला तर मग आयफोन 17 वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म विजय सेल्स आणि इतर ऑनलाइन साइट्सवर दिवाळीच्या सणानिमित्त आयफोन 17 वर जबरदस्त ऑफर उपलब्ध आहे. खरं तर आयफोन 17 चे 256GB व्हेरिअंट 82,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता या मॉडेलवर 6,000 रुपयांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ज्यामुळे या आयफोन मॉडेलची किंमत 76,900 रुपये होते. जर तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला आयफोन 17 खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही EMI पर्याय देखील वापरू शकता.
तुम्ही आयफोन 17 चे 256GB व्हेरिअंट 3,578 रुपये प्रति महिनाच्या EMI वर देखील खरेदी करू शकता. नो-कॉस्ट EMI पर्याय देखील उपलब्ध आहेत या डिव्हाईसची खरेदी केले जाऊ शकते. हा फोन 6 महिन्यांच्या प्लॅनवर 12,816 रुपये/महिना मध्ये खरेदी करता येतो. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे आणि Amazon Great Indian Festival सारख्या फेस्टिव सेल्स दरम्यान त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
आयफोन 17 मध्ये केवळ डिझाईनच नाही तर इतर परफॉर्मेंस देखील पूर्णपणे अपग्रेड करण्यात आला आहे. या व्हेरिअंटमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.3-इंच Super Retina OLED पॅनल देण्यात आला आहे. या फोनमध्ये लेटेस्ट A19 Bionic चिपसेट देण्यात आला आहे, जो AI-सक्षम प्रोसेसिंग ऑफर करतो. फोनमध्ये 48MP + 48MP चा डुअल रियर कॅमेरा आणि 18MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आाल आहे. दीर्घ बॅकअपसाठी पॉवर-कार्यक्षम बॅटरी आणि जलद चार्जिंग सपोर्ट. फोन iOS 26 वर चालतो, ज्यामध्ये नवीन AI-फीचर्स देण्यात आले आहेत.