YouTube ला मिळालं मोठं अपडेट, Netflix आणि Prime Video सारखा दिसणार आता व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लेटफॉर्म
YouTube हे जगातील लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रिंमिग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. युट्यूबचे 491 मिलियनहून अधिक युजर्स आहेत. युट्यूब त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स सादर करत असतो. आता देखील कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन अपडेट सादर केलं आहे. या अपडेटमुळे युट्यूबचं इंटरफेस बदलणार आहे. रिपोर्ट्सनुसार, YouTube आता नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइम व्हिडिओप्रमाणे थर्ड-पार्टी कंटेंटचा समावेश त्यांच्या प्लॅटफॉर्मवर करण्याची योजना आखत आहे.
BGMI Pro Tips: तुम्हालाही गेमप्ले सुधारून PUBG चा प्रो प्लेअर व्हायचंय? आत्ताच करा या 5 ढासू सेटिंग
YouTube वर लवकरच थर्ड-पार्टी कंटेंट आणि एक नवीन डिझाइन सादर केली जाणार आहे. त्यामुळे युट्यूबचा लूकच आता बदलणार आहे. टेक रिपोर्ट्सनुसार, YouTube लवकरच त्यांच्या प्लॅटफॉर्मवर Paramount आणि Max सारख्या थर्ड-पार्टी पेड सेवा जोडणार आहे. यामुळे यूजर्सना त्यांचे आवडते शो आणि चित्रपट YouTube वरच पाहता येतील. (फोटो सौजन्य – Pinterest)
तथापि, ही एक नवीन संकल्पना नाही. 2022 मध्ये, YouTube ने त्यांच्या चित्रपट आणि टीव्ही विभागात ‘Primetime Channels’ फीचर लाँच केले होते. या फीचरअंतर्गत, SHOWTIME, STARZ, Paramount Plus, Vix Plus आणि AMC Plus सारख्या 30 हून अधिक सेवांमधील कंटेंट उपलब्ध करून देण्यात आला. परंतु, कमी युजर्सच्या इंटरेक्शनमुळे हे वैशिष्ट्य फारसे लोकप्रिय झाले नाही.आता, YouTube पुन्हा एकदा त्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये थर्ड-पार्टी कंटेट एकत्रित करण्याची योजना आखत आहे, परंतु यावेळी ते एका नवीन आणि आकर्षक डिझाइनसह सादर केलं जाणार आहे.
आता YouTube चा लूक Prime Video आणि Disney+ सारखा असेल. एका नवीन अहवालात असे समोर आले आहे की YouTube आपला इंटरफेस पूर्णपणे बदलण्याची योजना आखत आहे. त्याची नवीन रचना अशी असेल की ती Amazon Prime Video आणि Disney+ सारख्या प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करू शकेल.
नवीन इंटरफेसमध्ये, शो आणि चित्रपट वेगवेगळ्या ओळींमध्ये दाखवले जातील, ज्यामुळे यूजर्सना कंटेंट शोधणे सोपे होईल. YouTube च्या Primetime Channels सेक्शनला देखील पूर्णपणे नवीन रूप मिळेल, जिथे सर्व पेड कंटेंट एकाच ठिकाणी एक्सेस करता येईल. यासोबतच, YouTube मध्ये आणखी एक नवीन वैशिष्ट्य जोडण्याची योजना आखली जात आहे, ज्याद्वारे क्रिएटर्स वेगवेगळ्या शो पेजमध्ये त्यांचा कंटेट मॅनेज करू शकतील. यामुळे वेब सिरीज आणि एपिसोडवर आधारित कंटेंट शोधणे सोपे होईल.
अहवालानुसार, YouTube आणि थर्ड-पार्टी कंटेंट इंटिग्रेशनची ही नवीन डिझाइन येत्या काही महिन्यांत लाँच केली जाईल. त्याच्या मदतीने, युजर्सना एक चांगला स्ट्रीमिंग अनुभव मिळेल आणि YouTube ला एक ऑल-इन-वन व्हिडिओ प्लॅटफॉर्म बनवले जाणार आहे. त्यामुळे आता युट्यूब युजर्सना एक नवीन अनुभव मिळणार आहे.
YouTube ने म्हटले आहे की 12 मे पासून, व्हिडिओंमध्ये नैसर्गिक ब्रेकपॉइंट्सवर जाहिराती दिसतील. याचा अर्थ असा की, आत्ताच, व्हिडिओच्या मध्यभागी कुठेही जाहिराती सुरू होतात. हे बदलून, आता कंपनी कोणत्याही सीन किंवा डायलॉगच्यामध्ये जाहिराती दाखवणार नाही. आता या जाहिराती सीनच्या ट्रांजिशनदरम्यान थांबवल्या जातील. यामुळे व्हिडिओ पाहण्याचा अनुभव सुधारेल आणि निर्मात्यांच्या कमाईतही वाढ होईल.