
Second Hand iPhone: सेकंड हँड किंवा रिफर्बिशड आयफोन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, खरेदीपूर्वी असा तपासा वॉरंटी स्टेटस
अनेकजण वॉरंटी स्टेटस न बघता सेकंड हँड किंवा रिफर्बिशड आयफोन खरेदी करतात आणि नंतर डिव्हाईसच्या हार्डवेअर समस्येसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. त्यामुळे सेकंड हँड किंवा रिफर्बिशड आयफोन खरेदी करताना डिव्हाईसची वॉरंटी आणि ॲपल केअर स्टेटस योग्य पद्धतीने तपासणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला नंतर कोणताही पश्चाताप होणार नाही. आयफोनची वॉरंटी कशी तपासायची, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
आयफोनचा वॉरंटी स्टेटस तपासण्याची सर्वात सोपी पद्धत जाणून घेऊया. सर्वात आधी आयफोनची सेटिंग ओपन करा. यानंतर खाली स्क्रोल करा आणि जनरल पर्याय निवडा. इथे तुम्हाला ॲपलकेयर अँड वॉरंटी ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुमच्या समोर स्क्रीनवर डिव्हाईसचे सर्व डिटेल्स दिसतील. तुम्ही किंवा जुन्या यूजरने आयफोनमध्ये ॲपल अकाऊंटद्वारे साईन ईन केलं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला फोनची अधिकृत वॉरंटी किंवा एक्सटेंडेड प्लॅन कधीपर्यंत व्हॅलिड आहे, हे डिटेल्स दिसतील. सेकंड हँड किंवा रिफर्बिशड आयफोन खरेदी करताना डिव्हाईसची वॉरंटी तपासण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे.
अनेकदा असं घडतं की, तुम्हाला आयफोनची सेटिंग ओपन करून वॉरंटी स्टेटस तपासण्याची संधीच मिळत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही सिरीअल नंबरचा वापर करून आयफोनचा वॉरंटी स्टेटस तपासू शकता. यासाठी तुम्हाला ब्राऊझरमध्ये ॲपलच्या अधिकृत चेक कव्हरेज वेबसाईटवर जावे लागेल. इथे तुम्हाला एक बॉक्स दिसेल, जिथे तुम्हाला आयफोनचा यूनिक सीरियल नंबर पेस्ट करावा लागणार आहे. हा यूनिक सीरियल नंबर तुम्हाला आयफोनच्या अबाऊट सेक्शनमध्ये दिसणार आहे.
बॉक्समध्ये यूनिक सीरियल नंबर एंटर केल्यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरा आणि सबमिट करा. यानंतर ॲपल तुम्हाला माहिती देणार आहे की, डिव्हाईस वॉरंटीमध्ये आहे की नाही. ही पद्धत अशा लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, जे ऑनलाइन मार्केटप्लेसमधून सामान ऑर्डर करतात आणि पेमेंट करण्यापूर्वी त्यांना डिव्हाईसची वॉरंटी तपासायची असते.