स्मार्टफोन की बॅटरीचा पॉवरहाऊस? नव्या Vivo स्मार्टफोनची चीनमध्ये एंट्री, 90W चार्जिंग अन् 5000 निट्स डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स
iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
नवा विवो वाय 600के टर्बो 12GB+256GB या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिंअंटमध्ये उपलब्ध आहे. या व्हेरिअंटची किंमत 2,799 CNY म्हणजेच सुमारे 41 हजार रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन इलेक्ट्रिक ब्लू, ड्यून गोल्ड आणि मिलेनियल पिंक या तीन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये 6.83-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, या हँडसेटमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 130Hz पर्यंत टच सँपलिंग रेट देखील मिळणार आहे. फोनची लोकल पीक ब्राइटनेस 5000 निट्सपर्यंत जाऊ शकते. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 4 प्रोसेसर मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 12GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB यूएफएस 3.1 स्टोरेज मिळणार आहे.
फोनची विशेषत: म्हणजेच यामध्ये 9,020mAh टिपिकल-कॅपेसिटीवाली बॅटरी दिली आहे. जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या डिव्हाईसमध्ये कोणताही वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला नाही. हे डिव्हाईस यूएसबी टाइप-सी पोर्टद्वारे रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते.
स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा मिळणार आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर आणि 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. रिअर कॅमेरा 4K पर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकतो, तर फ्रंट कॅमेरा 1080p पर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. या डिव्हाईसमध्ये ओरिजिनओएस 6 वर आधारित अँड्रॉईड 16 मिळणार आहे.
कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये अंडर-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट स्कॅनर, डुअल स्पीकर, आयआर ब्लास्टर, एनएफसी, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2 सपोर्ट मिळणार आहे. पाणी आणि धूळीपासून संरक्षणासाठी IP68/IP69 रेटिंग दिली आहे. या फोनने आठ मिलिट्री-स्टँडर्ड एनवायरनमेंटल चाचण्या यशस्वीपणे पार केल्या आहेत, ज्यामुळे त्याच्या मजबुतीची कल्पना येते.






