Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: कोण करतंय तुमच्या Wi-Fi चा वापर? या स्टेप्स फॉलो करा अन् 5 मिनिटांत शोधा अनोळखी डिव्हाईस

Wi-Fi Tips: तुमच्या घरात असलेल्या वायफायचा वापर कोण करतं तुम्हाला माहिती आहे का? घरातील वायफाय कोणत्या डिव्हाईसला कनेक्ट आहेत, हे शोधण्यासाठी तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करू शकता. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 19, 2026 | 07:47 PM
Tech Tips: कोण करतंय तुमच्या Wi-Fi चा वापर? या स्टेप्स फॉलो करा अन् 5 मिनिटांत शोधा अनोळखी डिव्हाईस

Tech Tips: कोण करतंय तुमच्या Wi-Fi चा वापर? या स्टेप्स फॉलो करा अन् 5 मिनिटांत शोधा अनोळखी डिव्हाईस

Follow Us
Follow Us:
  • इंटरनेटचा वेग अचानक कमी होणे, व्हिडिओ बफर होणे किंवा डेटा लवकर संपणे हे Wi-Fi चा अनधिकृत वापर होत असल्याचे संकेत असू शकतात.
  • राऊटरच्या अ‍ॅडमिन पॅनलमध्ये लॉगिन करून कनेक्टेड डिव्हाईसची यादी पाहून अनोळखी डिव्हाईस सहज ओळखता येतात.
  • संशयास्पद डिव्हाईस आढळल्यास त्वरित Wi-Fi पासवर्ड बदलून WPA3 सुरक्षा एन्क्रिप्शन सक्रिय करणे आवश्यक आहे.
स्मार्टफोन आणि इतर गॅझेट्सप्रमाणेच Wi-Fi देखील आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. ऑनलाईन क्लासेसपासून ऑफीसच्या कामांपर्यंत सर्वकाही वायफायवर अवलंबून असते. त्यामुळे ऑफीसप्रमाणेच अनेकजण हल्ली त्यांच्या घरात देखील वायफाय कनेक्शन घेतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, जर कोणतीही अनोळखी व्यक्ती तुमच्या वायफायचा वापर करत असेल तर?

Google ने रोलआऊट केलं Android 17 चे स्टेबल अपडेट! नव्या फीचर्समुळे बदलणार यूजर्सचा अनुभव… वाचा सविस्तर

कमकुवत पासवर्ड, जुन्या राऊटरची सुरक्षा सेटिंग्स किंवा कोणासोबत वायफाय पासवर्ड शेअर केल्यास कोणतीही व्यक्ती अगदी सहज तुमच्या वायफायचा वापर करू शकतात. यामुळे केवळ इंटरनेट स्पीडवरच नाही तर तुमची वैयक्तिक माहिती देखील धोक्यात येऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)

तुमच्या वायफायचा कोणी वापर करतंय का? हे आहेत संकेत

अचानक इंटरनेट स्पीड कमी होणं, व्हिडीओ वारंवार बफर होणं किंवा डेटा सामान्य वेळेपेक्षा लवकर संपणं, या संकेतांमुळे समजतं की तुमच्या वायफायचा वापर दुसरं कोणी करत आहे. अशा परिस्थितीत कोणतीही अनोळखी व्यक्ती तुमच्या नेटवर्क संबंधित ऑनलाइन अ‍ॅक्टिविटीवर नजर ठेऊ शकतात. सायबरसुरक्षा तज्ञांच्या मते, राउटर्स आणि स्मार्ट IoT उपकरणांमधील असुरक्षितता सातत्याने वाढत आहे, ज्यामुळे हा धोका आणखी गंभीर होत आहे.

कसं शोधाल वायफाय कोणत्या डिव्हाईसला कनेक्ट आहे?

तुमच्या वायफाय नेटवर्कला कोणते डिव्हाईस जोडले आहेत, हे शोधण्यासाठी तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करू शकता.

राऊटर अ‍ॅडमिन पॅनलमध्ये लॉगिन करा.

कोणत्याही कनेक्टेड डिव्हाईशवर ब्राऊझर ओपन करा आणि अ‍ॅड्रेस बारमध्ये राऊटरचा आयी अ‍ॅड्रेस एंटर करा. सहसा हा अ‍ॅड्रेस 192.168.1.1, 10.0.0.1 असू शकतो.

अ‍ॅडमिन यूजरनेम आणि पासवर्ड एंंटर करा

राऊटरच्या मागे असलेल्या स्टिकर किंवा इंटरनेट सर्विस प्रोवाइडरद्वारे दिलेल्या लॉगिन डिटेल्सचा वापर करा.

कनेक्टेड डिव्हाईसची यादी पाहा

लॉगिन केल्यानंतर तुम्हाला खालील पर्याय दिसतील.

  • कनेक्टेड डिव्हाईस
  • अटॅच डिव्हाईस
  • डीएचसीपी क्लायंट लिस्ट
इथे तुम्हाला अशा सर्व डिव्हाईसची यादी दिसेल जे सध्या तुमच्या वायफायसोबत जोडलेले आहेत.

यादीमध्ये असलेल्या डिव्हाईसची तुलना तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, टिव्ही, स्मार्ट स्पीकर आणि इतर गॅझेट्सची करा. जर या यादीमध्ये कोणतेही अनोळखी डिव्हाईस असेल तर ही चिंतेची गोष्ट असू शकते.

काही डिव्हाईस निर्मात्याच्या नावाने दिसू शकतात

  • Espressif: सहसा स्मार्ट होम डिवाइसेज जसे स्मार्ट प्लग
  • Murata: गेमिंग कंसोल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिवाइस.
जर तुम्हाला ही प्रोसेस कठीण वाटत असेल तर तुम्ही नेटवर्क स्कॅनिंग अ‍ॅप्सच्या मदतीने कनेक्ट केलेल्या डिव्हाईसची माहिती सहज मिळवू शकता.

पावरफुल OnePlus स्मार्टफोनचे नवे व्हेरिअंट लाँच! Snapdragon प्रोसेसर अन् 7400mAh बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

अनोळखी डिव्हाईस दिसल्यास काय करावे?

जर तुम्हाला कोणतेही अनोळखी किंवा संशयास्पद डिव्हाईस दिसले तर सर्वात आधी तुमच्या वायफायचा पासवर्ड बदला. यासोबतच राऊटरच्या सुरक्षा सेटिंगमध्ये जाऊन WPA3 एन्क्रिप्शन एक्टिव करा. हे एक अधिक आधुनिक आणि सुरक्षित वायरलेस सुरक्षा मानक मानले जाते, जे अनधिकृत प्रवेश रोखण्यास मदत करते.

Web Title: How to check who is using your wi fi network without permission follow these steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
1

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
2

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान
3

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
4

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.