पावरफुल OnePlus स्मार्टफोनचे नवे व्हेरिअंट लाँच! Snapdragon प्रोसेसर अन् 7400mAh बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत
यापूर्वी कंपनीने हा स्मार्टफोन 12GB+256GB आणि 12GB + 512GB अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता. आता यामध्ये 16GB + 512GB या नवीन व्हेरिअंटचा समावेश करण्यात आला आहे. 16GB + 512GB या नवीन व्हेरिअंटची किंमत 61,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 54,999 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 59,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन भारतात वनप्लस ऑनलाइन स्टोअर आणि ॲमेझॉन प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक चारकोल ब्लॅक, मिंट ब्रीज आणि इलेक्ट्रिक वॉयलेट कलर ऑप्शन्समध्ये हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – OnePlus)
डुअल सिम सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर बेस्ड ऑक्सिजनओएस 16 सह लाँच करण्यात आला आहे. वनप्लस 15 आर मध्ये 6.83 इंच फुल-एचडी+ (1,272×2,800 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 165Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 450 पीपीआय पिक्सेल डेंसिटी, 100 टक्के डिसीआय-P3 कलर गॅमट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन ऑफर करतो. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP66 + IP68 + IP69 + IP69K रेटिंग दिली आहे.
फोनमध्ये क्वालकॉमचा 3nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चिपसेट आहे, जो 3.8GHz पर्यंतचा पीक क्लॉक स्पीड देतो. ग्राफिक्ससाठी या हँडसेटमध्ये अॅड्रेनो 8 सीरीज जीपीयू, 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 4.1 इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. हे हँडसेट नवीन G2 वायफाय चिप आणि टच रिस्पॉन्स चिपने सुसज्ज आहे.
वनप्लस 15 आर मध्ये 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,400mAh बॅटरी दिली आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, वनप्लस 15 आर मध्ये डिटेलमॅक्स इंजिन पावर्ड डुअल रियर कॅमेरा सिस्टिम मिळणार आहे. याचा मेन शूटर OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेल (f/1.8) चा आहे, ज्यासोबत 112-डिग्री फील्ड-ऑफ-व्यू वाला 8-मेगापिक्सेल (f/2.2) चा अल्ट्रावाइड कॅमेरा जोडण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये समोरील बाजूला 32-मेगापिक्सेल (f/2.0) चा कॅमेरा दिला आहे. हँडसेटमध्ये 4K/120 fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड केले जाऊ शकतात.






