
अरेरे, नंबर चुकला अन् रिचार्जचा खेळ बिघडला! पैसे परत मिळणार कसे? Jio, Airtel, Vi यूजर्ससाठी लागू आहेत 'हे' नियम
अशा परिस्थितीत नक्की काय करावं हे अनेकांना माहिती नसतं. आपण चुकून दुसऱ्याच्या नंबरवर जेव्हा रिचार्ज करतो, तेव्हा मनात येणारा सर्वात पहिला प्रश्न म्हणजेच आपले पैसे परत मिळणार की नाही? याची प्रोसेस प्रत्येक टेलिकॉम कंपनीसाठी वेगळी आहे. मात्र लक्षात ठेवा की, चुकीच्या पद्धतीने पूर्ण झालेल्या प्रत्येक रिचार्जसाठी परताव्याची (रिफंडची) हमी नसते, त्यामुळे त्वरित पावले उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
जिओ त्यांच्या यूजर्सना चुकीचा रिचार्ज रिवर्स करण्याची सुविधा ऑफर करतो. मात्र यासाठी काही नियम आणि अटी लागू आहेत. ही सुविधा केवळ मायजिओॲप किंवा जिओ.कॉम वरून करण्यात आलेल्या रिचार्जसाठी लागू आहे. रिचार्ज प्लॅन यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर 3 तासांत हा प्लॅन रद्द करण्याचा पर्याय मिळतो. यासाठी मायजिओ ॲपमध्ये रिचार्ज अँड हिस्ट्री पर्यायावर क्लिक करा. मायजिओ ॲपमध्ये संबंधित रिचार्ज निवडल्यानंतर कँसल प्लॅनचा पर्याय निवडा. रिफंड मायजिओ स्टोअर क्रेडिट किंवा मूळ पेमेंट माध्यमात ट्रांसफर केले जाईल. तथापि, चुकीच्या जिओ नंबरवर रिचार्ज केल्यास देखील नियम आणि पात्रता निकष लागू होतील.
जर तुम्ही चुकून एखाद्या दुसऱ्या एयरटेल नंबरवर रिचार्ज केला असेल तर तुमच्याकडे ती चूक सुधारण्यासाठी केवळ 2 ते 3 तसांचा कालावधी असेल, अर्थात, तो नंबर वापरणाऱ्या यूजरने डेटा किंवा कॉलिंग सेवांचा वापर केलेला नसावा. यासाठी सर्वात आधी एयरटेल थँक्स ॲप ओपन करा. ॲप ओपन करा आणि हेल्प अँड सपोर्ट सेक्शनमध्ये जा. यानंतर फेसिंग इशू विथ रिसेंट रिचार्जवर क्लिक करा. इथे तुम्हाला राँग रिचार्ज पर्याय दिसेल त्यावर टॅप करा आणि चॅटबोटद्वारे तुमची तक्रार नोंदवा.
व्हिआय त्यांच्या यूजर्सना एसएमएसद्वारे चुकीचा रिचार्ज सुधारण्याची सुविधा ऑफर करते. यासाठी रिचार्ज केल्यानंतर 24 तासांत तुम्हाला तुमच्या नंबरवरून एक एसएमएस पाठवावा लागणार आहे. एसएमएस स्वरूप: WRR <चुकीचा क्रमांक> <योग्य क्रमांक> <रिचार्जची रक्कम> <व्यवहार आयडी> असे टाईप करा आणि 144 वर पाठवा. ही प्रक्रिया पूर्ण करून देखील चूक सुधारली गेली नाही तर तुम्ही व्हिआय व्हिआय कस्टमर केयर 199 वर संपर्क करा किंवा customercare@vodafoneidea.com वर तक्रार नोंदवा. तथापि, जर रिचार्ज अयशस्वी झाले असेल आणि पैसे कापले गेले असतील, तर ती रक्कम 7 कामकाजाच्या दिवसांत परत केली जाईल, असे व्हिआयने स्पष्ट केले आहे.