
CNAP Caller (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
रोज कोणाचा तरी अनोळखी कॉल येतो आणि आपण विचार करत बसतो, हा कोण आहे? उचलू की नको? अनेकदा बँकेच्या नावाने, कुरियरच्या नावाने फसवणुकीचे कॉल येतात. आता या सगळ्याला ब्रेक लागणार. सरकारने एक मोठा निर्णय घेतला.१ नोव्हेंबरपासून तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या प्रत्येक कॉलवर समोरच्या व्यक्तीचे नाव दिसणार आहे. यासाठी सरकारने CNAP म्हणजे Calling Name Presentation ही सिस्टम सक्तीची केली. CNAP Caller
दूरसंचार विभाग म्हणजे DoT ने सगळ्या टेलिकॉम कंपन्यांना म्हणजे Jio, Airtel, Vi, BSNL सगळ्यांना स्पष्ट आदेश दिला आहे. १ नोव्हेंबरपासून देशातील सगळ्या 4G आणि 5G नेटवर्कवर CNAP चालू करावेच लागेल. यात कोणतीही सूट नाही. सध्या कंपन्या वेगवेगळ्या सर्कलमध्ये याची टेस्टिंग करत आहेत. काही लोकांना आधीच कॉलवर नाव दिसायला लागले आहे.
DoT ने सांगितले आहे की, सध्या हा नियम फक्त 4G आणि 5G साठी आहे. 2G, 3G आणि लँडलाईन नंबरसाठी याचा वेगळा आदेश नंतर येईल. कारण त्यांचे तंत्रज्ञान वेगळे आहे.
अनेकांना वाटेल हे Truecaller सारखंच आहे का? तर अजिबात नाही. Truecaller हे एक App आहे, जे लोकांनी सेव्ह केलेल्या नावावरून नाव दाखवते. त्यात अनेकदा चुकीचे नाव पण दाखवते. कोणी तुमचे नाव काहीही सेव्ह केले तरी तेच दिसते.
पण CNAP हे सरकारी सिस्टम आहे. यात तुम्ही सिम घेताना जे नाव दिले होते, जे KYC कागदपत्रांवर आहे, जसे आधार कार्डवर नाव आहे, तेच नाव समोरच्याला दिसेल. याला CAF म्हणजे Customer Application Form मधले नाव म्हणतात.
उदारणार्थ समजा तुम्ही राहुल पाटील या नावाने सिम घेतले असेल, तर तुम्ही कोणाला कॉल केला की त्याच्या फोनवर Rahul Patil असेच नाव येईल. तुम्ही नाव बदलू शकत नाही, लपवू शकत नाही. त्यामुळे फसवणूक करणे खूप कठीण होईल.
याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे स्पॅम आणि फ्रॉड कॉल बंद होतील. आजकाल बघा, कॉल येतो आणि समोरचा म्हणतो मी बँकेतून बोलतोय, तुमचे KYC अपडेट करायचे आहे. पण तो कोण आहे हेच कळत नाही. CNAP आल्यावर त्याचे खरे नाव दिसेल. जर नाव वेगळे असेल आणि तो बँकेचे नाव सांगत असेल तर लगेच लक्षात येईल की हा फ्रॉड आहे.
अनोळखी नंबर आला तरी कोणाचा आहे हे आधीच कळेल. महत्वाचा कॉल असेल तर उचलता येईल, नसेल तर टाळता येईल. महत्वाचे कॉल मिस होणार नाहीत.
महिलांसाठी पण हे खूप सुरक्षित होणार आहे. अनेकदा अनोळखी नंबरवरून कॉल करुन देतात. आता नाव दिसल्यामुळे अशा लोकांवर लगेच कारवाई करणे सोपे होईल.
सावधान! फक्त ५ रुपयांत विकला जातो तुमचा मोबाईल नंबर? सायबर फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
सरकारने निर्णय घेतला असला तरी यात काही प्रश्न पण आहेत. जसे की जर एखाद्याने दुसऱ्याच्या नावाने सिम घेतले असेल तर? किंवा कंपनीच्या नावाने घेतलेले सिम असतील तर कोणाचे नाव दिसणार? यावर अजून स्पष्टता यायची आहे.
तसेच काही लोकांना आपले नाव सगळ्यांना दाखवायचे नसेल, त्यांच्या प्रायव्हसीचा काय? यावर पण चर्चा चालू आहे. पण सरकारचे म्हणणे आहे की सुरक्षेसाठी हे पाऊल गरजेचे आहे.
एकंदरीत बघायला गेले तर १ नोव्हेंबरपासून Truecaller सारख्या App ची गरजच संपून जाईल. फोनमध्येच सरकारी पद्धतीने खरे नाव दिसेल. ही गोष्ट सामान्य मोबाईल वापरणाऱ्यांसाठी खूप दिला.
Ans: CNAP म्हणजे Calling Name Presentation; कॉल करणाऱ्याचे नाव दाखवणारी प्रणाली.
Ans: 1 नोव्हेंबरपासून.
Ans: 4G आणि 5G नेटवर्कवर.