Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: सोशल मीडियावर व्हायरल होणारा Video खरा की खोटा? अशा पद्धतीने घ्या शोध

Fake Videos On Social Media: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात रिअल टाइम लष्करी हालचाली, ड्रोन हल्ले आणि सरकारी सूचना दाखवल्याचा दावा केला जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 11, 2025 | 12:42 PM
Tech Tips: सोशल मीडियावर व्हायरल होणारा Video खरा की खोटा? अशा पद्धतीने घ्या शोध

Tech Tips: सोशल मीडियावर व्हायरल होणारा Video खरा की खोटा? अशा पद्धतीने घ्या शोध

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान सोशल मीडियावर अनेक फेक पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कधी ड्रोन अटॅक तर कधी सरकारी अलर्ट्स दाखवण्यासाठी खोटे आणि जुने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. यातील अनेक व्हिडीओ तर गेममधील होते. हे गेममधील व्हिडीओ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाचा असल्याचं दावा करत सोशल मीडियावर शेअर केले जात होते. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ खरे आहेत कि खोटे याचा शोध घेणं फार कठीण आहे. कारण हे व्हिडीओ इतके खरे वाटतात की अगदी कोणीही त्याच्यावर विश्वास ठेऊ शकतो.

India Pakistan War: भारतीयांसाठी आयटी मंत्रालयाने जारी केली अ‍ॅडवायझरी, X वर पोस्ट करत दिल्या सूचना

सोशल मीडियावर या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंबाबत सरकार वेळोवेळी अलर्ट शेअर करत होते आणि नागरिकांनी या फेक व्हिडीओंवर विश्वास ठेऊ नये असं आवााहन देखील केलं जात होतं. नागरिकांमध्ये भिती आणि दहशत निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे फेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. पण तुम्ही काही सोप्या पद्धतीने हे व्हिडीओ खरे आहेत की खोटे याचा शोध घेऊ शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

व्हिडीओचा ओरिजिन तपासा

व्हायरल होणारा व्हिडीओ कोणत्या अकाऊंटवरून सर्वात आधी शेअर करण्यात आला आहे, याचा शोध घ्या. जर व्हिडीओ अननोन अकाउंटवरून शेअर करण्यात आला असेल तर संशयास्पद असू शकतं. सीमा तणावासारख्या संवेदनशील काळात, ऑफिशियल न्यूज सोर्सेज किंवा सरकारी संस्था नेहमीच पुष्टीकृत विजुअल्स प्रसिद्ध करतात.

रिवर्स सर्च टूल्सचा वापर करा

InVID किंवा Google Reverse Image Search सारख्या फ्री ऑनलाइन टूल्सवर तुमच्या व्हिडीओचा स्क्रीनशॉट अपलोड करा आणि इथे तुम्हाला माहिती मिळेल की हा व्हिडीओ कुठून आला आहे. सध्या, युद्धभूमीच्या नावाखाली प्रसारित होणारे बहुतेक व्हिडिओ जुने आहेत, जे इतर देशांचे किंवा जुन्या घटनांमधील आहेत, परंतु हे व्हिडीओ अलीकडील युद्धाचे असल्याचा दावा करत सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.

फॅक्ट-चेकिंग अलर्ट्स सर्च करा

PIB Fact Check सारख्या सरकारी एजेंसीची मदत घ्या. ही एजंसी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या खोट्या व्हिडीओंवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

दिशाभूल करणाऱ्या हेडलाइन्सपासून सावध रहा

अनेकदा असं होतं की एखादा फेक व्हिडीओ योग्य हेडलाइनसह शेअर केला जातो. त्यामुळे परिस्थितीत व्हिजीओची सत्यता तपासल्याशिवाय तो शेअर करू नका.

India Pakistan War: ड्रोन हल्ल्यांदरम्यान स्मार्टफोनची लोकेशन सर्विस बंद ठेवण्याचा दिला जातोय सल्ला! व्हायरल दावा योग्य की अयोग्य

अनवेरिफाइड व्हिडीओ शेअर करू नका

युद्धाच्या काळात दहशत निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर अनेक फेक व्हिडीओ सतत शेअर केले जात असतात. पण जर हे व्हिडीओ अनवेरिफाइड असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका आणि असे व्हिडीओ शेअर देखील करू नका.

Web Title: How to know that viral video on social media is fake or real know some important tips tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 12:42 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
1

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
2

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Flipkart Big Festival Dhamaka 2025: बिग बिलीयन डेजमधून शॉपिंग करून थकलात? फ्लिपकार्ट करणार पुन्हा नवा धमाका
3

Flipkart Big Festival Dhamaka 2025: बिग बिलीयन डेजमधून शॉपिंग करून थकलात? फ्लिपकार्ट करणार पुन्हा नवा धमाका

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स
4

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.