Happy Diwali Wishes: यंदा दिवाळीत WhatsApp वर द्या पर्सनलाइज्ड शुभेच्छा! तुमच्या फोटोसह तयार करा अनोखे स्टिकर्स, ही आहे प्रोसेस
आज सर्वत्र दिवाळीचा उत्सव साजरा केला जात आहे. दिवाळीनिमित्त सर्वजण आपल्या कुटुंबीयांना मित्र परिवाराला शुभेच्छा देत असतात. तुम्ही देखील तुमच्या मित्र परिवाराला आणि कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठीस्टिकर्स शोधत आहात का? आता व्हाट्सअपवर तुम्ही मित्रांना, कुटुंबीयांना अनोख्या पद्धतीने दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकतात. सगळ्यात विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अॅपचा वापर करण्याची देखील गरज नाही.
Diwali 2025: दिवाळीत झकास फोटो काढायचे आहेत? आजच खरेदी करा ‘हे’ बेस्ट कॅमेरावाले स्मार्टफोन्स
तुम्ही व्हाट्सअपमध्ये स्वतःचे फोटो पोस्ट करून वेगळे स्टिकर तयार करू शकता. स्टिकरच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्रांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकता. या स्टिकर्सवर तुम्ही तुम्हाला हवा असलेला मेसेज देखील लिहू शकता. स्टिकर्स बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि हे स्टिकर बनवण्यासाठी अगदी काही क्षणाचा कालावधी लागतो. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार स्टिकर सेंड करू शकता. यामुळे तुमचे मित्रपरिवार आणि कुटुंबीय नक्कीच खुश होतील. (फोटो सौजन्य – Pinterest)
व्हाट्सअपवर पर्सनलाईझ्ड स्टिकर क्रिएट करण्यासाठी कोणतेही बंधन नाही. व्हाट्सअपमधील कस्टमाईज्ड स्टिकर बनवण्यासाठी युजरना सर्वात आधी चॅट विंडो ओपन करावे लागेल. त्यानंतर स्टिकर सेक्शनमध्ये जाऊन प्लसवर क्लिक करावे लागेल. इथे तुम्हाला तुमचा आवडीचा फोटो ॲड करायचा आहे. यानंतर तुम्ही या स्टिकरवर मेसेज टाईप करू शकता. ही पद्धत अगदी सोपी आणि सुरक्षित आहे. यामध्ये स्टिकर डायरेक्ट व्हाट्सअपमधून अॅड केले जाऊ शकतात. यामध्ये युजर्सच्या प्रायव्हसीला कोणताही धोका नाही आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अॅपचा वापर करण्याची देखील गरज लागत नाही. तुम्ही तुमच्या मित्रपरिवारआणि कुटुंबीयांसाठी दिवाळी स्टिकर कसे बनवू शकता, याबाबत आता जाणून घेऊया, खरंतर ही प्रोसेस अगदी सोपी आणि सहज आहे.