
Tech Tips: फोनवरच अडकलंय आयुष्य? फक्त या 5 सवयी बदला... 72 तासांत तुम्हालाही दिसेल चकित करणारा फरक
iPhone 20 मध्ये होणार सर्वात मोठा बदल! डिझाईन-फीचर्स ते किंमत… Apple यूजर्सना मिळणार खास सरप्राईज
अनेकांना तर सकाळी उठल्यावर स्मार्टफोन बघण्याची सवय असते पण ही अत्यंत वाईट सवय आहे. यामुळे आपल्या संपूर्ण दिवसावर, झोपेवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. तुम्ही काही सोप्या पद्धतीने आणि काही बदलांमुळे तुमची स्मार्टफोनची सवय सोडू शकता. सवय पूर्णपणे सोडणे तर शक्य नाही पण काही प्रमाणात स्मार्टफोनचा वापर कमी केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
यासाठी तुम्हाला डिजिटल डिटॉक्स करावं लागणार आहे. डिजिटल डिटॉक्स म्हणजे टेक्नॉलॉजीपासून पूर्णपणे दूर राहून आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आणि आपल्या आरोग्यवर लक्ष केंद्रित करणे. पण सध्याच्या काळात टेक्नॉलॉजी आणि स्मार्टफोनपासून पूर्णपणे दूर राहणं अशक्य झालं आहे. अशा परिस्थितीत तुम्ही या दोन गोष्टींचा वापर थोडा कमी करू शकता.
यासाठी सर्वात आधी तुम्हाला स्मार्टफोनपासून दूर राहण्याची सवय करावी लागेल. स्मार्टफोन पूर्णपणे सोडणं तर शक्य नाही पण तुम्ही गरज असेल तेव्हा स्मार्टफोनचा वापर करा. दिवसभर स्मार्टफोन हातात घेऊन स्क्रोल करत बसणं अत्यंत वाईट सवय बनले आहे. पण जर तुम्ही स्मार्टफोनपासून लांब राहण्याचा मार्ग निवडत असाल तर तुमचे मानसिक आरोग्य देखील सुधारेल.
यासोबतच फोनमध्ये उपलब्ध असलेल्या ॲप्सवर तुमचा कंट्रोल असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही लिमिटेड काळासाठी सोशल मीडियाचा वापर करू शकता. यामुळे तुम्हाला सोशल मीडियाची सवय लागणार नाही. तसेच तुमचं मानसिक आरोग्य देखील चांगले राहील. ठराविक काळानंतर तुमचा फोन बंद करून बाजूला ठेवा, यामुळे तुमची झोप देखील चांगली होईल आणि तुमच्या डोक्याला देखील आराम मिळेल.
फोनवर सतत नोटिफिकेशन येत असतील तर तुमचं लक्ष सतत फोनकडे जातं. त्यामुळे गरज नसेल तेव्हा फोनची नोटिफिकेशन बंद करा. तसेच तुम्ही काही तासांसाठी कीपॅड फोनचा देखील वापर करू शकता. यामुळे तुम्हाला केवळ महत्त्वाचे कॉल्स आणि मेसेज येतील. तसेच जर जास्तच गरज असेल तर तुम्ही स्मार्टवॉचचा वापर करून नोटिफिकेशन वाचू शकता. यामुळे तुम्हाला फोनचा वापर करण्याची देखील गरज नाही.
जर तुम्ही अत्यंत इमानदारीने काही नियम फॉलो केलेत तर तुम्हाला तीन दिवसांच्या आतच तुमच्यामध्ये फरक जाणवू लागेल. स्मार्टफोनपासून लांब राहणं आरोग्यासाठी चांगलं आहे. कारण स्मार्टफोन आपल्याला कंट्रोल करतो, असं अनेक तज्ञांनी सांगितलं आहे. स्मार्टफोनचा वापर आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम देखील करू शकतो.सतत स्क्रीनकडे पाहणे, सोशल मीडिया बघणे, नोटिफिकेशन्स वाचणे यामुळे आपले लक्ष विचलित होते. तुम्हाला सांगितलेल्या सवयी तुम्ही केवळ तीन दिवस फॉलो करून पाहिल्या तर तुम्हाला बदल जाणवेल आणि तुम्हाला स्मार्टफोनपासून दूर राहण्याची सवय देखील लागेल.
Ans: फोनचा अति वापर करूनही थांबवता न येणे.
Ans: डोळ्यांवर ताण, झोपेची समस्या आणि एकाग्रता कमी होते.
Ans: दिवसाला 2–3 तासांपर्यंत योग्य मानला जातो.