iPhone 20 मध्ये होणार सर्वात मोठा बदल! डिझाईन-फीचर्स ते किंमत... Apple यूजर्सना मिळणार खास सरप्राईज
कंपनीची आयफोन 18 सिरीज लाँच होण्यासाठी अद्याप काही काळ शिल्लक आहे. मात्र अशातच आता आयफोन 20 बाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. इंटरनेटवर समोर आलेल्या रिपोर्टनुसार, आयफोन 20 मध्ये आयफोन च्या इतिहासातील सर्वात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आयफोन 20 ही आतापर्यंतची सर्वात खास सिरीज ठरणार आहे. याच्या डिझाईनबाबत देखील काही लिक्स समोर आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने अद्याप आगामी आयफोन 20 बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. मात्र या आयफोन सिरीजबाबत सोशल मीडियावर अनेक लिक्स समोर आले आहेत. हे लिक्स पाहून यूजर्स प्रचंड उत्साहित आहेत. रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जास आहे की, आयफोन 20 च्या डिस्प्लेमध्ये देखील बदल केला जाणार आहे. iPhone 20 मध्ये कर्व्ड डिस्प्ले डिझाईन दिले जाणार असल्याची शक्यता आहे. असं देखील सांगितलं जात आहे की, ही स्क्रीन चारी बाजूंनी कर्व्ड असणार आहे, ज्यामुळे आयफोन 20 मध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. या बदलामुळे आगामी आयफोन 20 ला अधिक प्रीमियम आणि फ्यूचरिस्टिक लुक मिळणार आहे.
एका रिपोर्टनुसार, कंपन कदाचित आयफोन 19 स्किप करण्याची शक्यता आहे. कारण 2026 मध्ये आयफोन 18 लाँच केला जाणार आहे आणि त्यानंतर 2027 मध्ये आयफोन 20 लाँच केला जाण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहोत. त्यामुळे कंपनी आयफोन 19 ला स्किप करण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जात आहे की, या निर्णयाचे मुख्य कारणं कंपनीटचा 20 वा वर्धापनदिन आहे. कंपनीने यापूर्वी देखील आयफोन 9 स्किप करून आयफोन X लाँच केला होता.
Year Ender 2025: फक्त एक चूक आणि अकाऊंट… 2025 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची यादी समोर, जाणून घ्या
केवळ डिझाईनचं नाही तर कंपनी iPhone 20 मधून फिजिकल बटन हटविण्याची देखील तयारी करत आहे. रिपोर्टनुसार, कंपनी पावर आणि वॉल्यूम बटनला टच आणि प्रेशर-सेंसिटिव कंट्रोलमध्ये बदलण्याची शक्यता आहे. फोनच्या फ्रंट डिझाइनमध्येही मोठा बदल होण्याची अपेक्षा आहे, कंपनी अंडर-डिस्प्ले फ्रंट कॅमेरा सादर करण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर स्क्रीनवरील कोणताही नॉच किंवा कटआउट पूर्णपणे काढून टाकेल.
Ans: iOS ही Apple ची सुरक्षित आणि स्मूथ ऑपरेटिंग सिस्टीम आहे.
Ans: iPhone मध्ये जास्त सिक्युरिटी, स्मूथ परफॉर्मन्स आणि लॉन्ग अपडेट्स मिळतात.
Ans: साधारण 5–6 वर्षे सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतात.






