Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या घरातील AC ची काळजी! वीजबिलही होईल कमी… वापरा या सोप्या ट्रिक्स

AC Tips: असे अनेक लोकं असतात जे उन्हाळ्याप्रमाणेच पावसाळ्यात देखील सतत एसीचा वापर करतात. पण पावसाळ्यात एसीचा वापर करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच वीजबिलात देखील वाढ होऊ शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 04, 2026 | 11:28 AM
Tech Tips: पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या घरातील AC ची काळजी! वीजबिलही होईल कमी... वापरा या सोप्या ट्रिक्स

Tech Tips: पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या घरातील AC ची काळजी! वीजबिलही होईल कमी... वापरा या सोप्या ट्रिक्स

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात एसीचा ‘ड्राय मोड’ वापरल्यास आर्द्रता कमी होते आणि वीजेची बचतही होते.
  • एसीचे एअर फिल्टर नियमित स्वच्छ ठेवल्यास कूलिंग सुधारते आणि वीजबिल कमी येण्यास मदत होते.
  • आउटडोअर युनिटभोवती पाणी साचू देऊ नका आणि एसीचे तापमान 24 ते 26°C दरम्यान ठेवा.
AC Care Tips: देशात पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळा सुरु झाला की उकाड्यापासून हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळतो. मात्र यासोबतच अनेक समस्या देखील निर्माण होतात. पावसाळ्यात तापमान अत्यंत कमी असते आणि वातावरणात गारवा पसरलेला असतो. मात्र अशा परिस्थितीत देखील अनेक लोकं त्यांच्या घरात एसीचा वापर करतात. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी आहात का?

बजेटचा बादशाह अन् फीचर्सचा सुपरस्टार! iQOO च्या नव्या स्मार्टफोनची सर्वांनाच पडली भुरळ; सुरुवातीची किंमत केवळ 18 हजार रुपये

पावसाळ्यात एसीचा वापर करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ज्यामध्ये ओलावा, तुंबलेल्या ड्रेनेज लाईन्स आणि बाहेरील युनिटजवळ कचरा साचणे इत्यादींचा समावेश आहे. पावसाळ्यात आर्द्रता वाढल्यामुळे घरांमध्ये उष्णता जाणवते. त्यामुळे अनेक लोकं एसीचा वापर करण्याला प्राधान्य देतात. मात्र पावसाळ्यात एसीचा वापर करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

एयर फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करा

तुमच्या घरातील एसीचा एयर फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं आहे. एयर फिल्टर खराब झाला असेल तर एसी योग्य पद्धतीने काम करत नाही आणि यामुळे विजेचे बिल देखील जास्त येते. कारण जर एसी योग्य पद्धतीने काम करत नसेल किंवा वेगाने थंड होत नसेल तर अशा परिस्थितीत एसी बराच काळ सुरु ठेवावा लागू शकतो. ज्यामुळे विजेचे बिल वाढू शकते.

ड्राय मोड

जर तुम्ही पावसाळ्यात एसी कूल मोडवर वापरत असाल तर आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी खोली गरजेपेक्षा जास्त थंड करावी लागेल. ज्यामुळे विजेचा वापर देखील खूप जास्त होईल आणि तुमच्या समस्येचे समाधान देखील मिळणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही ड्राय मोडचा वापर करू शकता. बाजारात उपलब्ध असणाऱ्या बऱ्याच नवीन एसीमध्ये आता ड्राय मोड ऑफर केला जातो. याचा वापर विशेषत: आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी केला जातो. या मोडमध्ये खोलीचे तापमान वेगाने कमी करण्याऐवजी अतिरिक्त आर्द्रता नियंत्रित करण्यावर अधिक लक्ष दिले जाते. यामध्ये कंप्रेसर सतत चालू राहण्याऐवजी चालू आणि बंद राहतो, ज्यामुळे कूलिंग मोडच्या तुलनेत कमी विज खर्च केली जाते.

आउटडोर यूनिटचे संरक्षण

पावसाळ्यात आउटडोर यूनिटमधून येणाऱ्या पाण्याची योग्य व्यवस्था करणं गरजेचं आहे. आउटडोर यूनिटच्या आजूबाजूला पावसाचे पाणी किंवा ओली पाने, नसतील याची खात्री करा. असे असल्यास पाण्याचा निचरा होण्यास अडथळे येऊ शकतात. अतिरिक्त आर्द्रतेमुळे विद्युत घटकांचे नुकसान होऊ शकते आणि एसीचे आयुष्य कमी होऊ शकते.

RCB फॅन्ससाठी Nothing चे अनोखे सरप्राईज! लवकरच लाँच होणार स्पेशल एडीशन स्मार्टफोन; डिझाईन पाहून व्हाल फिदा

एसी वापरताना वीज वाचवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

  • पावसाळ्यात एसीचा वापर करता शक्य तितका वेळ ड्राय मोड वापरा.
  • तसेच, एसीचे तापमान 24 ते 26 डिग्री सेल्सियस दरम्यान ठेवा.
  • खोलीचे दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित बंद करा, ज्यामुळे बाहेरील आर्द्रता आत येऊ नये.
  • वेळोवेळी एसीच्या फिल्टरची स्वच्छता करा, यामुळे कूलिंग व्यवस्थित राहते.
  • रात्रीच्या वेळेस एसीमधील स्लीप मोडचा वापर करा.

Web Title: How to take care of ac in rainy season here are some easy tricks and tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • AC Temperature
  • air conditioner
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: Smart TV वापरताय? आत्ताच बदला या 5 सेटिंग्स! चित्रपट, गेमिंग आणि साउंडचा अनुभव होईल आणखी भन्नाट
1

Tech Tips: Smart TV वापरताय? आत्ताच बदला या 5 सेटिंग्स! चित्रपट, गेमिंग आणि साउंडचा अनुभव होईल आणखी भन्नाट

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
2

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.