Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram चं नवं Instants बनलंय डोक्याला ताप? कसं कराल बंद? फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

How To Turn Off Instants: इंस्टाग्रामने अलीकडेच सुरु केलेलं इंस्टंट यूजर्ससाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे अनेक यूजर्स हा पर्याय बंद करण्याची प्रोसेस शोधत आहेत. हीच प्रोसेस आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 16, 2026 | 08:12 AM
Instagram चं नवं Instants बनलंय डोक्याला ताप? कसं कराल बंद? फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Instagram चं नवं Instants बनलंय डोक्याला ताप? कसं कराल बंद? फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • Instagram चे नवीन Instants डिसअपीयरिंग फोटो शेअरिंगसाठी लाँच करण्यात आले आहे.
  • इन्स्टंटची प्रोसेस स्पष्ट नसल्याने अनेक यूजर्सचे फोटो चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचत असल्याचा दावा केला जात आहे.
  • “Hide Instants in Inbox” पर्याय ऑन करून यूजर्स हा पर्याय सहज बंद करू शकतात.
नुकतंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने Instants नावाचे एक नवीन ॲप लाँच केलं आहे. फोटो शेअरिंगचा अनुभव आणखी मजेदार व्हावा आणि स्नॅपचॅटला टक्कर देण्यासाठी इंस्टाग्राम इन्स्टंट घेऊन आले आहे. तुम्ही इंस्टाग्राममधून इन्स्टंट अ‍ॅक्सेस करू शकता किंवा याचे स्वतंत्र अ‍ॅप देखील उपलब्ध आहे. खरे आणि डिसअपीयरिंग फोटो शेयर करण्यासाठी हे अ‍ॅप डिझाईन करण्यात आले आहे. इन्स्टंट रोल आउट केल्यानंतर अनेक युजर्सनी तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांना हा नवीन बदल फारसा आवडला नाही. तुम्हाला देखील इंस्टाग्रामचे नवीन इन्स्टंट प्लॅटफॉर्म आवडले नसेल तर तुम्ही ते बंद करू शकता. यासाठी तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.

फोटो शेअरिंगचा गेम बदलणार? Instagram च्या Instants अ‍ॅपची सर्वत्र चर्चा, Snapchat ला टक्कर देणार?

कसं काम करत इंस्टंट?

इंस्टाग्राम पॉप-अप नोटिफिकेशनद्वारे इंस्टंटबाबत माहिती देत आहे. इंस्टाग्राम इनबॉक्समध्ये इंस्टंट एक मिनी फोटो स्टॅकप्रमाणे दिसत आहे. या मिनी फोटो स्टॅकवर टॅप केल्यानंतर यूजर्सना नव्या फीचरबाबत माहिती शेअर केली जात आहे. जसे की, फीचर कसे काम करते, इत्यादी. इंस्टंट ओपन केल्यानंतर तुम्हाला कॅमेऱ्याच्या खालील बाजूला एक शटर बटन दिसणार आहे आणि त्याखाली तुम्ही फ्रेंड्स आणि क्लोज फ्रेंड्सपैकी एक पर्याय निवडू शकता. इंस्टंट बाय डिफॉल्ट फ्रेंड्सवर सेट करण्यात आले आहे. जेव्हा तुम्ही शटर बटनवर क्लिक करता, त्यावेळी कॅप्चर झालेला फोटो तुमच्या मित्रांकडे पाठवला जातो. जर तुम्ही क्लोज फ्रेंडसोबत फोटो शेअर करत असाल तर तुम्हाला मॅन्युअल क्लोज फ्रेंड निवडावी लागणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

यूजर्सचा गोंधळ उडाला

इंस्टाग्रामने इंस्टंटद्वारे फोटो पाठवण्याची प्रोसेस स्पष्ट केली नाही. त्यामुळे यूजर्स इंस्टाग्रामवरील फ्रेंड लिस्टमधील अशा लोकांसोबत देखील फोटो शेअर करत आहेत, ज्यांच्यासोबत त्यांना फोटो शेअर करायचे नाहीत. यामध्ये अनडू चा पर्याय देखील देण्यात आला आहे. मात्र हा पर्याय जोपर्यंत समोरील यूजर तुम्ही पाठवलेला फोटो ओपन करत नाही, तोपर्यंतच काम करतो. अनेक यूजर्सनी तक्रार केली आहे की, त्यांना समजत देखील नाही की इंस्टंटमध्ये फोटो कधी शेअर केला जातो. यामुळे यूजर्सचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. अनेकजण आता हा पर्याय बंद करण्याचा मार्ग शोधत आहेत.

Jio vs Airtel: किंमत एकच पण फायदे वेगळे… व्हॅलिडीटी अन् डेटासह कोण ठरणार खरा किंग? जाणून घ्या

अशी आहे इंस्टंट बंद करण्याची प्रोसेस

इंस्टाग्राममध्ये इंस्टंट बंद करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या प्रोफाईलवर जा आणि स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या थ्री-लाइन मेनूवर टॅप करा. आता सेटिंग ओपन करा. आता कंटेट प्रेफरेंस सेक्शनमध्ये जा. इथे तुम्हाला “Hide Instants in Inbox” पर्याय दिसेल. आता यासमोरील टॉगल ऑन करा. आता तुम्हाला इनबॉक्समध्ये इंस्टंट पाहायला मिळणार नाही. लक्षात ठेवा की, टॉगल ऑन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मित्रांकडून देखील इंस्टंट पाठवले जाणार नाहीत.

Web Title: How to turn off instants option in instagram follow this step by step process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 08:12 AM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

WhatsApp Username फीचर अडचणीत? सुरक्षा आणि फसवणुकीच्या मुद्द्यावर सरकार सतर्क
1

WhatsApp Username फीचर अडचणीत? सुरक्षा आणि फसवणुकीच्या मुद्द्यावर सरकार सतर्क

Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे
2

Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे

Tech Tips: अचानक हँग होतोय स्मार्टफोन? ही असू शकतात कारणं… जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: अचानक हँग होतोय स्मार्टफोन? ही असू शकतात कारणं… जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: अँड्रॉईडमध्ये Battery Saver ऑन करताच फोनमध्ये काय बदल होतो? चुकीच्या वापरामुळे परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम
4

Tech Tips: अँड्रॉईडमध्ये Battery Saver ऑन करताच फोनमध्ये काय बदल होतो? चुकीच्या वापरामुळे परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.