Flipkart वर Huawei च्या टॅब्लेट्सची धूम! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
यातील एक मॉडेल रोजच्या वापरासाठी तुलनेने परवडणारा पर्याय आहे, तर दुसऱ्या टॅब्लेटमध्ये मोठा डिस्प्ले, जास्त स्टोरेज आणि कामासाठी उपयोगी अतिरिक्त सुविधा देण्यात आल्या आहेत.
Huawei MatePad SE 11 ची भारतातील किंमत 25,999 रुपये ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे, MatePad 11.5 PaperMatte Edition ची किंमत 45,999 रुपये आहे. विशेष म्हणजे या महागड्या मॉडेलसोबत कीबोर्डही मिळतो. दोन्ही टॅब्लेट सध्या भारतात Flipkartच्या माध्यमातून खरेदी करता येतात.
ज्यांना टॅब्लेटवर चित्रपट पाहण्याबरोबरच काम आणि लिखाण करायचं आहे, त्यांच्यासाठी MatePad 11.5 PaperMatte Edition लक्ष वेधून घेतो. यात 11.5 इंचांचा 2.5K डिस्प्ले आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120Hz असल्यामुळे स्क्रोलिंग आणि इतर हालचाली अधिक सहज दिसतात.
या टॅब्लेटची खासियत म्हणजे PaperMatte स्क्रीन. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या स्क्रीनमुळे जास्त प्रकाश असताना वापरणं सोपं होतं आणि डोळ्यांवरील ताण कमी करण्यास मदत मिळते.
कॅमेऱ्याच्या बाबतीत मागील बाजूस 13MP सेन्सर, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. 1080p व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधाही मिळते.
Huawei ने या टॅब्लेटमध्ये Notes ॲपमध्ये काही उपयोगी सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी नोट्स लिहू शकतात, तर ऑफिसमध्ये काम करणारे लोक कागदपत्रे आणि इतर माहिती व्यवस्थित ठेवू शकतात.
परफॉर्मन्ससाठी यात Kirin T82B प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा चिपसेट 2.4GHz पर्यंतच्या वेगाने काम करतो. त्यासोबत 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. त्यामुळे फाइल्स, फोटो आणि इतर सामग्री साठवण्यासाठी जागेची कमतरता भासण्याची शक्यता कमी आहे बॅटरीही या मॉडेलची मोठी बाजू आहे. यात 10,100mAh क्षमतेची बॅटरी असून 40W SuperCharge फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
कमी बजेटमध्ये मोठा टॅब्लेट हवा असेल तर MatePad SE 11 हा पर्याय पाहता येतो. यात 11 इंचांची स्क्रीन असून 1900×1200 पिक्सेल रिझोल्यूशन मिळते. स्क्रीनची कमाल ब्राइटनेस 400 निट्स आहे.
या डिस्प्लेला TÜV Rheinland कडून लो-ब्लू-लाइट आणि फ्लिकर-फ्री प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपयोगी ठरू शकते. यामध्ये Kirin 710A चिप, 8GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. टॅब्लेटसोबत Huawei M-Pen Lite वापरता येतो. त्यामुळे हाताने नोट्स काढणे, लिहिणे किंवा काही साधं स्केचिंग करणे शक्य आहे.
Independence Day Special: देशभक्तीच्या कथा पाहण्याची Airtel आयपीटीव्हीवर रंगतदार मेजवानी
मनोरंजनासाठी चार स्पीकर्स आणि Huawei Histen 9.0 तंत्रज्ञानाचा आधार देण्यात आला आहे. मागील बाजूस 8MP आणि समोर 5MP कॅमेरा आहे. Wi-Fi आणि Bluetooth 5.1 हे कनेक्टिव्हिटी पर्याय मिळतात.
डिझाइनच्या बाबतीत हा टॅब्लेट सुमारे 475 ग्रॅम वजनाचा आणि 6.9mm जाडीचा आहे. यात 7,700mAh बॅटरी असून 22.5W फास्ट चार्जिंग मिळते.
एकूण पाहता, MatePad SE 11 हा विद्यार्थी आणि रोजच्या वापरासाठी लक्षात घेण्यासारखा पर्याय आहे. तर अधिक चांगली स्क्रीन, जास्त स्टोरेज आणि कामासाठी अतिरिक्त सुविधा हव्या असतील तर MatePad 11.5 PaperMatte Edition अधिक प्रीमियम पर्याय ठरतो. दोन्हींपैकी निवड करताना आपल्या वापराची गरज आणि बजेट पाहणं महत्त्वाचं ठरेल.



