13.2-इंच स्क्रीनवाला नवा OnePlus टॅब्लेट लाँच! स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह असे आहेत पावरफुल फीचर्स, जाणून घ्या किंमत
Census 2027: सावधान! जनगणनेच्या नावाखाली तुमचीही होऊ शकते फसवणूक… चुकूनही शेअर करू नका ही माहिती
वनप्लस पॅड 4 टॅब्लेट 8GB+256GB आणि 12GB+512GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. डिव्हाईसच्या 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत 59,999 रुपये आणि 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 64,999 रुपये ठेवण्यात आली आहे. लाँच ऑफर अंतर्गत कंपनी या टॅब्लेटच्या खरेदीवर 5,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काऊंट ऑफर करत आहे. यामुळे वनप्लस पॅड 4 ची किंमत केवळ 54,999 रुपये होणार आहे. (फोटो सौजन्य – OnePlus)
याशिवाय कंपनी या डिव्हाईसवर लिमिटेड-टाइम बंडल ऑफर देखील देत आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला वनप्लस स्टायलो प्रो स्टाइलस जास्तीचे पैसे खर्च न करता मिळू शकते. डिव्हाईस वनप्लस इंडियाच्या वेबसाईटवर लिस्ट झाला आहे. अशी आहे की, येत्या काही दिवसांत डिव्हाईस खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. डिव्हाईसची विक्री 5 मे पासून सुरु होणार आहे.
वनप्लसने लाँच केलेल्या नव्या डिव्हाईसच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, टॅब्लेटच्या समोरील बाजूला 13.2-इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच टॅब्लेट 144Hz पर्यंत अडॅप्टिव रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. टॅब्लेटमध्ये 12-बिट कलर डेप्थ आणि DCI-P3 कलर गॅमटचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. वनप्लस पॅड 4 क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ज्यासोबत 12GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 4.1 स्टोरेज मिळणार आहे.
विशलिस्ट तयार केली का? ‘या’ महिन्यात सुरु होणार Amazon Prime Day Sale… या यूजर्सना होणार मोठा फायदा
टॅब्लेटमध्ये 80W सुपरवुक फास्ट चार्जिंग सपोर्टसह 13,380mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर 20 तासांपर्यंत व्हिडीओ पाहू शकता. वनप्लस पॅड 4 मध्ये 8 स्पीकर देण्यात आले आहेत, ज्यामुळे इमर्सिव साउंड एक्सपीरियंस ऑफर केला जाणार आहे. उत्तम वायरलेस ऑडियो क्वालिटीसाठी एपीटीएक्स अॅडॅप्टिव्ह आणि एलडीएसी सारख्या एडवांस्ड ब्लूटूथ कोडेक्सचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.






