Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Huawei चा धमाका! जगातील पहिला वाईड-स्क्रीन हँडसेट लाँच… टॅब्लेटसारखा डिस्प्ले अन् असे आहेत पावरफुल फीचर्स

Huawei Pura X View Launched: टेक जगात पुन्हा एक मोठा धमाका झाला आहे. Huawei ने जगातील पहिला वाईड स्क्रीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 7,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने या डिव्हाईसची किंमत अद्याप जाहीर केली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 21, 2026 | 11:59 AM
Huawei चा धमाका! जगातील पहिला वाईड-स्क्रीन हँडसेट लाँच... टॅब्लेटसारखा डिस्प्ले अन् असे आहेत पावरफुल फीचर्स

Huawei चा धमाका! जगातील पहिला वाईड-स्क्रीन हँडसेट लाँच... टॅब्लेटसारखा डिस्प्ले अन् असे आहेत पावरफुल फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • Huawei Pura X View मध्ये 6.39-इंचाचा 16:9.5 वाइड डिस्प्ले असून, 6,500 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो.
  • फोनमध्ये 7,000mAh बॅटरी, हार्मनीओएस 7.0 आणि 12GB रॅमसह 256GB, 512GB व 1TB स्टोरेज पर्याय आहेत.
  • चीनमध्ये फोनची विक्री 28 ऑगस्टपासून सुरू होणार असून, कंपनीने अद्याप किंमत आणि रिअर कॅमेरा तपशील जाहीर केलेले नाहीत.
Huawei Wide Screen Smartphone Launched: गेल्या काही दिवसांपासून टेक कंपनी Huawei च्या नॉन-फोल्डिंग स्मार्टफोनबाबत प्रचंड चर्चा सुरु होती. या स्मार्टफोनमध्ये वाईड आस्पेक्ट रेशिओ असू शकतो, असं सांगितलं जात होतं. त्यामुळे या अनोख्या स्मार्टफोनसाठी सर्वजण प्रचंड उत्सुक होते. आता अखेर सर्वांची प्रतिक्षा संपली असून कंपनीने जगातील पहिला वाईड-स्क्रीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Huawei Pura X View या नावाने सादर करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये वाईड फॉर्म फॅक्टर आणि 16:9.5 आस्पेक्ट रेशिओवाला टॅब्लेट सारखा डिस्प्ले देण्यात आला आहे. Huawei Pura X View हा जगातील पहिला असा नॉन-फोल्डिंग स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये वाइड डिस्प्ले देण्यात आला आहे. डिझाईनच्या बाबतीत हा फोन Pura X सारखाच दिसतो.

आर्क्टिकमध्ये मोठा वैज्ञानिक शोध! समुद्री बर्फाजवळ ढगनिर्मिती करणारे कण अचानक 50 पट वाढले

स्मार्टफोनसाठी प्री-ऑर्डर सुरु

कंपनीने चीनमध्ये या नवीन वाईड स्क्रीन स्मार्टफोनसाठी प्री-ऑर्डर सुरु केल्या आहेत. एका Weibo पोस्टद्वारे, Huawei चे एग्जीक्यूटिव डायरेक्टर Yu Chengdong यांनी सांगितलं की, या डिव्हाईसची विक्री 28 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. कंपनीने त्यांचा नवीन वाईड स्क्रीन स्मार्टफोन 12GB + 256GB, 12GB + 512GB आणि 12GB + 1TB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. ग्राहक हा स्मार्टफोन 4 रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. ज्यामध्ये फोन फँटम नाइट ब्लॅक, लीपिंग शॅडो रेड, लिनन ग्रे आणि जीरो डिग्री व्हाइट शेड्स यांचा समावेश आहे.  (फोटो सौजन्य: X) 

नवीन वाईड स्क्रीन स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, Huawei Pura X View मध्ये 6.39-इंच डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1,320×2,232 पिक्सेल रेजोल्यूशन, 6,500 निट्स पीक ब्राइटनेस आणि 2,160 Hz PWM डिमिंगसह येतो. याचा पॅनल 16:9.5 चा वाइड आस्पेक्ट रेशियो आणि 96.1 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो ऑफर करतो. स्क्रीनच्या चारही बाजूला केवळ 1.05mm चे पातळ बेजल्स दिले आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, रुंद डिस्प्ले व्हिडीओ पाहणं, गेमिंग करणं आणि पुस्तक वाचताना अधिक चांगला व्यूइंग अनुभव ऑफर करणार आहे.

सरकारची सोशल मीडियावर नजर! पाच महिन्यांत तब्बल 1.95 लाख पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश, वाचा सविस्तर

Huawei Pura X View ची जाडी केवळ 6.68mm आहे आणि याचे वजन 201 ग्रॅम आहे. या फोनमध्ये 7,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे आणि हे नवीन HarmonyOS 7.0 वर काम करते. सध्या कंपनीने त्यांच्या या नवीन स्मार्टफोनची किंमत आणि रिअर कॅमेरा डिटेल्सचा खुलासा केला नाही. मात्र समोर आलेल्या काही लिक्सनुसार, या डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी सेंसर आणि टेलीफोटो लेंससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.

Web Title: Huawei pura x view released in china it is first wide screen handset in the world tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी
1

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
2

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
3

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स
4

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.