
2 अब्ज डॉर्लसच्या ‘व्हाइट स्पेस’वर नजर! ICH NEXT- Peclers Paris कडून भारत-प्रथम ग्लोबल लोकल ट्रेंड इंटेलिजन्स सर्व्हिसची घोषणा
भारताचा फॅशन आणि लाइफस्टाइल बाजार 240 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि तो दरवर्षी 10% पेक्षा जास्त दराने वाढत आहे. असे असूनही, या उद्योगातील मोठा भाग अजूनही जागतिक ट्रेंड रिपोर्ट्सवर आधारित आहे. हे रिपोर्ट व्यापक प्रेरणा देतात, पण भारतातील सांस्कृतिक विविधता, हवामान, शिल्प परंपरा, शारीरिक बांधणी आणि उपभोग चक्र वगैरे संदर्भात मर्यादित औचित्य ठेवतात.
ICH NEXT x Peclers Paris च्या या भागीदारीचे ध्येय जागतिक दूरदृष्टीतील सखोलता आणि भारत-आधारित संशोधन यांची सांगड घालून ही परिस्थिती बदलणं असे आहे. ICH NEXT च्या सह-संस्थापक अनुराधा चंद्रशेखर आणि कनिका वोहरा म्हणाल्या, “भारतात ट्रेंड फोरकास्टिंगसाठी एक स्थानिक दृष्टिकोन गरजेचा आहे. कारण येथील बाजार एकसारखा नाही तसेच तो तत्परतेने पश्चिमचे अनुकरण करणारा नाही. इथे उपभोक्त्यांचे विविध वर्ग आहेत, सणवारांशी संबंधित मागणी चक्रं आहेत, प्रदीर्घ ग्रीष्मकाल आहे आणि रंग, सिल्यूट आणि प्रसंगांशी सखोल सांस्कृतिक संदर्भ जोडलेले आहेत, ज्यामुळे निश्चित होते की ट्रेंड्सचा अंगिकार कसा करावा. शिवाय, भारत आता केवळ जागतिक ट्रेंड्स स्वीकारणारा देश राहिलेला नाही, तर तो त्यांना सक्रियतेने नवा आकार बहाल करतो. टेक्नॉलॉजी आणि डिजिटल व्यवहारांपासून ब्यूटी रिचुअल्स आणि फॅशन एस्थेटिक्सपर्यंत आपला देश इनोव्हेशन आणि प्रभाव यांचा एक मोठा स्रोत बनत आहे, जेथे स्वदेशी ब्रँड्स, क्रिएटर्स आणि उपभोक्ता नवीन सांस्कृतिक संकेत घडवत आहेत.”
त्यांनी पुढे म्हटले, “याच कारणाने, भारतासाठी आता ट्रेंड फोरकास्टिंग केवळ अनुवादापुरते मर्यादित राहिलेले नसून त्यास मौलिक सर्जनाच्या दृष्टीने पुढे न्यावे लागणार आहे. इथे असलेला बाजार आता स्वतः स्वतःची मानके निर्धारित करण्यासाठी सज्ज आहे, जेणेकरून ब्रँड्स भारतीय मागणीचे उचित उत्तर देण्याबरोबरच हे देखील ओळखू शकेल की, जागतिक सांस्कृतिक आणि व्यावसायिक ट्रेंड्सच्या आगामी लाटेचे नेतृत्व भारत कसे आणि कुठून करेल. या उद्योगाला एका अशा संशोधन भिंगाची आवश्यकता आहे, जे स्थानिक संस्कृतीत रुजलेले असेल, डेटा द्वारा संचालित असेल आणि व्यवसायाच्या वास्तविक आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असेल. ही भागीदारी आम्हाला जागतिक संदर्भाची भारतीय संवेदनेशी सांगड घालण्याची संधी देते, जेणेकरून व्यवसाय अशा पद्धतीने भविष्याचे अनुमान करू शकेल, अनुकूलन करू शकेल आणि नेतृत्व करू शकेल जे या उद्योगाने यापूर्वी केलेले नाही.”
2022 मध्ये लॉन्च झालेला ICH NEXT, हा 100 पेक्षा जास्त ब्रँड्स आणि लेबल्ससाठी एक विश्वसनीय ट्रेंड इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म बनला आहे. यामध्ये आदित्य बिर्ला फॅशन अँड लाइफस्टाइलचे जयपोर, अमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट, रिलायन्स ट्रेंड्स, अजिओ,आणि टाटा ट्रेंट पोर्टफोलियोचे Westside आणि Samohसारखे ब्रँड्स सामील आहेत. या प्लॅटफॉर्मने 45% YoY सबस्क्राईबर वृद्धी आणि 90% रिन्यूअल दर नोंदला आहे. या प्लॅटफॉर्मच्या केंद्रस्थानी ICHNEXTLABS.ai आहे, जे एक स्वामित्व असलेले इंटेलिजन्स इंजिन असून ते AI, मशीन लर्निंग, इमेज इंटेलिजन्स आणि मानवी सांस्कृतिक नैपुण्य यांना एकत्र आणते.
ते दर महिन्याला 60,000 पेक्षा जास्त सामाजिक आणि सांस्कृतिक संकेतांचे तसेच 3000+ मॅक्रो आर्टिकल्सचे विश्लेषण करते, जेणेकरून रंग, कापड, सिल्यूट, पॅटर्न्स आणि प्रोसेसिंगशी संबंधित उचित मार्गदर्शन प्रदान करता यावे. या प्लॅटफॉर्मचा उपयोग करणाऱ्या ब्रँड्सनी जलद डिझाईन सायकल्स, अधिक चांगले सेल-थ्रू आणि सशक्त कॅटेगरी परफॉर्मन्स नोंदविला आहे. तसेच काहींनी ट्रेंडशी सुसंगत लॉन्चच्या माध्यमातून प्रति स्टाइल 4-7 पट अधिक उत्पन्न मिळवले आहे.
20 अब्ज अमेरिकन डॉलरच्या WPP नेटवर्कचा भाग असलेल्या Peclers Paris कडे फॉरवर्ड-लुकिंग ब्रँड व्हिजनला आकार देण्याचा पाच दशकांपेक्षा मोठा अनुभव आहे आणि फॅशन, एस्थेटिक्स आणि डिझाईन इनोव्हेशनमध्ये त्यांची मोठी परंपरा आहे. धोरणात्मक कन्सल्टिंग आणि मोसमी ट्रेंड प्रकाशनांच्या माध्यमातून ही एजन्सी फॅशन, ब्यूटी, डिझाईन, लाइफस्टाइल, हॉस्पिटॅलिटी आणि फुडसकट अनेक उद्योगांमध्ये जागतिक क्लायंट्सना त्यांच्या भविष्यास आकार देण्यात, त्यांची वैशिष्ट्ये ठळकपणे पुढे आणण्यात आणि अधिक आकर्षक उत्पादने, सेवा आणि अनुभव घडवण्यात मदत करते.
Peclers Paris च्या CEO अॅन एटीएन-रेबूल म्हणाल्या, “आज भारत जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रभावशाली बाजारपेठांपैकी एक आहे. त्याच्या सांस्कृतिक सखोलता, क्रिएटिव्हिटी आणि आत्मविश्वास फोरकास्टिंगसाठी एक वेगळा दृष्टिकोन आवश्यक ही. या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही आमची जागतिक पार्श्वभूमी आणिICH NEXT ची सखोल स्थानिक समज यांची सांगड घालण्यास उत्सुक आहोत. या मिश्रणातून एक असा इंटेलिजन्स तयार करता येऊ शकेल, जो दूरदर्शी तर असेलच, शिवाय भारतीय ब्रँड्ससाठी संबद्ध असेल.”
ICH NEXT x Peclers Paris ट्रेंड फोररकास्ट रिपोर्ट फॅशन आणि लाइफस्टाइल सेगमेन्ट्समध्ये भारत-केंद्रित इनसाइट्स प्रदान करतो. तो भविष्यातील उपभोक्त्यांच्या मागणीला आकार देणाऱ्या राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांना डिकोड करतो. ज्यामुळे ब्रँड्सना जोखीम कमी करण्यास आणि अधिक अचूक डिझाईन निर्णय घेण्यास मदत होते. ICH NEXT ला आशा आहे की, त्यांचे वर्तमान आर्थिक वर्ष 0.4 मिलियन अमेरिकन डॉलरच्या उत्पन्नासह समाप्त होईल आणि आगामी तीन वर्षांत कंपनी आपला टर्नओव्हर दुप्पट करण्याची योजना आखत आहे. तसेच आगामी तीन वर्षांमध्ये आपले तंत्रज्ञान वाढवण्यासाठी आणि कॅटेगरी कव्हरेजचा विस्तार करण्यासाठी 1.5 मिलियन अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. भारत ट्रेंड-फॉलोइंगकडून ट्रेंड-शॉपिंग बाजाराकडे वळत असताना ही भागीदारी एका नवीन टप्प्याचा संकेत देते, जेथे स्वदेशी, संशोधन-आधारित इंटेलिजन्स अधिक चांगल्या व्यावसायिक परिणामांना वेग देईल.