Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kitchen Appliances : किचनसाठी स्मार्ट सोल्यूशन! INALSA ने आणला ‘न्युट्रि फ्राय ड्युओस्लिम’ प्रोफेशनल एअर फ्रायर, किंमत फक्त…

भारतातील अग्रगण्य होम अप्लायन्सेस ब्रँड INALSA ने 14 लिटर क्षमतेचा ‘न्युट्रि फ्राय ड्युओस्लिम’ प्रोफेशनल एअर फ्रायर लॉन्च केला आहे. वापरकर्त्यांना एकाचवेळी वेगवेगळे पदार्थ स्वतंत्र तापमान व टाइमर सेटिंगसह शिजवता येणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 21, 2026 | 02:38 PM
किचनसाठी स्मार्ट सोल्यूशन! INALSA ने आणला ‘न्युट्रि फ्राय ड्युओस्लिम’ प्रोफेशनल एअर फ्रायर, किंमत फक्त...

किचनसाठी स्मार्ट सोल्यूशन! INALSA ने आणला ‘न्युट्रि फ्राय ड्युओस्लिम’ प्रोफेशनल एअर फ्रायर, किंमत फक्त...

Follow Us
Follow Us:

मुंबई : इनाल्सा (INALSA) या भारतातील अग्रगण्य होम अप्लायन्सेस ब्रँडने न्‍यूट्रि फ्राय ड्युओस्लिम: द ड्युओ-स्टॅक १४ लिटर प्रोफेशनल एअर फ्रायरच्‍या लाँचची घोषणा केली आहे. १३,९९९ रूपये किंमत असलेले हे उत्पादन आता अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि तुमच्या जवळच्या स्टोअर्ससह सर्व सामान्य व्यापारी आउटलेट्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

आजकाल आधुनिक कुटुंबं वेगवेगळ्या कामांचे वेळापत्रक, वैयक्तिक खाद्यपदार्थांच्या आवडीनिवडी आणि वेगवान जीवनशैली यांमध्ये ताळमेळ राखत आहेत. त्यामुळे आजच्या किचनकडून एकाच वेळी केवळ एकच जेवण तयार करण्यापेक्षा खूप जास्त गोष्टींची अपेक्षा केली जाते. स्वयंपाकाच्या या बदलत्या पद्धती लक्षात घेऊनच, न्यूट्रि फ्राय ड्युओस्लिम हे एक स्मार्ट मल्टी-डिश कुकिंग सोल्यूशन म्हणून डिझाइन करण्‍यात आले आहे, जे कुटुंबांना एकाच वेळी वेगवेगळे पदार्थ तयार करण्यास मदत करते आणि जेवणाच्या नियोजनातील गुंतागुंत कमी करते.

6G Prototype : स्मार्टफोन युजर्ससाठी गुड न्यूज; जपानमध्ये 6G चा प्रयोग यशस्वी, 5G च्या तुलनेत २० पट अधिक स्पीड

हे अप्‍लायन्‍स स्वतंत्र ड्युअल-झोन कुकिंग तंत्रज्ञानाला स्लिम-प्रोफाइल व्हर्टिकल ड्युअल-स्टॅक डिझाइनसह एकत्र आणते. यामुळे वापरकर्त्यांना प्रत्येक बास्केटसाठी स्वतंत्र तापमान आणि टाइमर नियंत्रणासह एकाच वेळी वेगवेगळे पदार्थ शिजवण्याची सुविधा मिळते. याचे कॉम्पॅक्ट व्हर्टिकल डिझाइन पारंपारिक सिंगल-बास्केट एअर फ्रायरइतकीच काउंटरटॉपवर जागा व्यापते, ज्यामुळे जागेचे योग्य नियोजन आवश्यक असलेल्या शहरी किचनसाठी हे अत्यंत योग्य ठरते.

न्यूट्रि फ्राय ड्युओस्लिम एकूण १४ लिटरची क्षमता प्रदान करते. ज्यामध्ये स्वतंत्र १४०० वॅट हिटिंग सिस्टमद्वारे समर्थित दोन ७ लिटरचे कुकिंग बास्केट्स आहेत, जे एकत्र मिळून २८०० वॅटचा आउटपुट देतात. ८० अंश सेल्सिअस ते २०० अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमान सेटिंग्जसह प्रत्येक बास्केट एक स्वतंत्र कुकिंग चेंबर म्हणून काम करते. यामुळे पदार्थांची चव एकमेकांत न मिसळता किंवा तापमानाचा एकमेकांवर परिणाम न होता तुम्हाला एकाच वेळी वेगवेगळ्या डिशेस तयार करण्याची सुविधा मिळते.

या अप्‍लायन्‍समध्‍ये एक इनबिल्ट रोस्टिंग रॅक सिस्टम देखील समाविष्ट आहे, जी एकाच कूकिंग सायकलमध्ये चार वेगवेगळ्या खाद्यघटकांपर्यंतचे पदार्थ तयार करण्यास मदत करते. जेवणाचे नियोजन अधिक सुलभ करण्यासाठी इनाल्साने यात सिंक फिनिश टेक्नॉलॉजी समाविष्ट केली आहे. हे तंत्रज्ञान दोन्ही बास्केट्समधील पदार्थांचे शिजणे एकाच वेळी पूर्ण होईल अशा प्रकारे वेळ जुळवून आणते, दोन्ही पदार्थांसाठी वेगवेगळे तापमान किंवा कालावधी असले तरीही उत्तम सुविधा देते.

याचा वापर अधिक सोपा करण्यासाठी, यात प्रबळ व्ह्यूइंग विंडोज (पारदर्शक खिडक्या) आणि अंतर्गत बास्केट लायटिंग देण्यात आले आहे, ज्यामुळे वापरकर्ते ड्रॉवर न उघडता आणि आतील उष्णतेचा प्रवाह खंडित न करता पदार्थ शिजण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवू शकतात. याव्यतिरिक्त, न्यूट्रि फ्राय ड्युओस्लिममध्ये १० प्रीसेट कूकिंग मेनू, तीन स्क्रीन पोझीशन्ससह अॅडजस्टेबल स्मार्ट डिस्प्ले आणि भारतातील सुसंगत किचनसाठी खास डिझाइन केलेले कॅबिनेट-फ्रेंडली व्हर्टिकल डिझाइन समाविष्ट आहे.

Airtel चा मोठा निर्णय! भारतात प्रथमच प्रगत 5G स्लाइसिंग तंत्रज्ञानाची होणार एंट्री; गर्दीच्या ठिकाणीही मिळणार सुपरफास्ट नेटवर्क

Web Title: Inalsa launches nutri fry duoslim 14l professional air fryer india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?
1

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर
2

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
3

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

चीनला बसणार मोठा धक्का! India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan ; ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा
4

चीनला बसणार मोठा धक्का! India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan ; ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.