चीनला मागे टाकत भारत अव्वल स्थानावर! अमेरिकेत एक्सपोर्ट केले तब्बल इतके स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली. यावेळी भारताने चीनला मागे टाकत अव्वल स्थान गाठले आहे. अशी माहिती मिळाली आहे की, यावेळी भारताने चीनला मागे टाकत स्मार्टफोन निर्यात करण्यात अमेरिकेतील बाजारात अव्वल स्थान गाठलं आहे. ही संपूर्ण माहिती PIB द्वारे शेअर करण्यात आली आहे. ही माहिती शेअर करताना Canalys च्या रिपोर्टचा संदर्भ देण्यात आला आहे. भारताची हि झेप मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील एक मोठी प्रगती मानली जात आहे.
शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, मेक इन इंडिया आणि प्रोडक्शन लिंक्ड इंसेंटिव (PLI) स्कीमने इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर पूर्णपणे बदलले आहे. या योजनांमुळे, भारताने अशा क्षेत्रांमध्येही वेगाने प्रगती केली आहे, जिथे पूर्वी तो मोठा उत्पादक मानला जात नव्हता. भारताने केलेल्या या प्रगतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. भारताची ही कामगिरी अतिशय अभिमानास्पद आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Canalys ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, एप्रिल-जून 2025 (Q2) मध्ये भारताने अमेरिकेला स्मार्टफोन निर्यात करण्यात चीनला मागे टाकलं आहे. या काळात, अमेरिकेतील आयातीत मेड इन इंडिया स्मार्टफोनचा वाटा 44% पर्यंत पोहोचला, जो गेल्या वर्षी (2024) याच तिमाहीत फक्त 13% होता. त्याच वेळी, चीनचा वाटा 61% वरून 25% पर्यंत घसरला. त्यामुळे गेल्या 1 वर्षात भारताने प्रचंड प्रगती केली आहे.
भारतातील ही वाढ कोणताही योगायोग नाही. गेल्या काही वर्षात इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल उद्यागोत मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन 2014-15 मध्ये 1.9 लाख करोडने वाढून 2024-25 मध्ये 11.3 लाख करोड रुपये झाले आहे. म्हणजेच सुमारे 6 पट वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. मोबाईल फोनचे उत्पादन 18,000 कोटी रुपयांवरून 5.45 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. मोबाईल निर्यातीत विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. 2014-15 मध्ये ही वाढ केवळ 1,500 कोटी रुपये होती, ती आता 2024-25 मध्ये 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे ही वाढ अतिशय अभिमानास्पद आहे.
मॅन्युफॅक्चरिंग यूनिट्समध्ये धमाका 2014-15 मध्ये फक्त 2 मोबाईल उत्पादन कारखाने होते, मात्र 2024-25 पर्यंत या क्षेत्रात 300 युनिट्सपर्यंत वाढले. म्हणजेच 150 पट वाढ नोंदवण्यात आली आहे. भारताने केवळ उत्पादन आणि निर्यात वाढवली नाही तर आयातीवरील अवलंबित्व देखील जवळजवळ संपवले. 2014-15 मध्ये, एकूण मागणीपैकी 75% आयातित फोनद्वारे पूर्ण केले जात होते. परंतु 2024-25 पर्यंत हा आकडा फक्त 0.02% पर्यंत घसरला आहे.