या स्मार्टफोन युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता WhatsApp वर होणार सॅटेलाइट नेटवर्क कॉलिंग, 28 ऑगस्टपासून रोलआऊट होणार फीचर या स्मार्टफोन युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता WhatsApp वर होणार सॅटेलाइट नेटवर्क कॉलिंग, 28 ऑगस्टपासून रोलआऊट होणार फीचर
20 ऑगस्ट रोजी गुगलचा Made by Google ईव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांचे अनेक डिव्हाईस लाँच केले आहे. ज्यामध्ये फ्लॅगशिप Pixel 10 सीरीजचा देखील समावेश आहे. या सिरीजची युजर्सना गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा होती. आता अखेर ही सिरीज लाँच करण्यात आली आहे. आता कंपनीने या सिरीजसाठी एक नवीन फीचर जारी करणार असल्याची घोषणा केली आहे.
गुगलने घोषणा केली आहे की, Pixel 10 सीरीजमधील WhatsApp साठी एक नवीन फीचर रिलीज केलं जाणार आहे. हे फीचर WhatsApp मधील व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी असणार आहे. हे फीचर सॅटेलाइट नेटवर्कद्वारे काम करणार आहे. याचा अर्थ असा की तुमच्याकडे मोबाईल नेटवर्क किंवा वाय-फाय कनेक्शन नसतानाही तुम्ही कॉल करू शकाल. (फोटो सौजन्य – Pinterest)
गूगलने या सॅटेलाइट -बेस्ड कम्युनिकेशन फीचरबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर घोषणा केली आहे. Pixel 10 सीरीजमधील फोन्सवर 28 ऑगस्टपासून WhatsApp व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल सॅटेलाइट नेटवर्कद्वारे सपोर्ट करणार आहेत. 28 ऑगस्ट रोजी Pixel 10 सीरीज स्मार्टफोन्स बाजारात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत.
एक्सवर एक टिझर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, हे फीचर कसं काम करणार आहे. जेव्हा तुम्हाला सॅटेलाइट नेटवर्कवर WhatsApp कॉल येतो तेव्हा स्टेटस बारमध्ये सॅटेलाइट आयकॉन दिसेल. यानंतर, यूजर्स सामान्य पद्धतीने व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल प्राप्त करू शकतील, फरक एवढाच असेल की हा कॉल मोबाइल नेटवर्क किंवा वाय-फाय ऐवजी सॅटेलाइट नेटवर्कवर कनेक्ट केला जाईल. तसेच, गुगलने स्पष्ट केलं आहे की, यासाठी काही अटी आणि शर्ती लागू होतील. सर्वप्रथम, हे वैशिष्ट्य फक्त पार्टिसिपेटिंग कॅरियर्ससह कार्य करेल. याशिवाय, यूजर्सना ही सेवा वापरण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते.
कंपनीने हे फीचर रिलीज केल्यानंतर गुगल Pixel 10 सीरीज ही जगातील पहिला अशी स्मार्टफोन सीरीज असणार आहे, जी WhatsApp वर सॅटेलाइट-बेस्ड कॉलिंग सपोर्ट करणार आहे. WhatsApp सॅटेलाइट नेटवर्कद्वारे टेक्स्ट मेसेज पाठवण्याची सुविधा देखील देईल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र या सॅटेलाईट नेटवर्कद्वारे युजर्स व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग करू शकणार आहेत. सध्या हे स्पष्ट आहे की मेसेजिंग सेवा सॅटेलाइट-आधारित कम्युनिकेशनद्वारे अशा ठिकाणी काम करतात जिथे मोबाईल नेटवर्क किंवा वाय-फाय नाही.
हे फीचर Pixel 10 मधील लेटेस्ट सॅटेलाइट-बेस्ड कम्युनिकेशन अपडेटवर आधारित आहे, जे मेड बाय गुगल इव्हेंटमध्ये सादर करण्यात आले होते. कंपनीच्या मते, Pixel 10 युजर्स फाइंड हब किंवा गुगल मॅप्सद्वारे सॅटेलाइटद्वारे त्यांचे स्थान देखील शेअर करू शकतात. Skylo नावाच्या नॉन-टेरेस्टेरियल प्रोवाइडर कंपनीसह गुगलच्या पार्टनरशिपमुळे हे वैशिष्ट्य काम करत आहे.