Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp नंतर आता सरकारची Telegram वर नजर; या कारणांसाठी पाठवली नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Telegram Username Feature: अलीकडेच व्हॉट्सॲपवर यूजर्सना यूजरनेम रिझर्व करण्याचा पर्याय उपलब्ध झाला होता. मात्र या फीचरवरून मोठा गोंधळ उडाला आहे. सरकारने या फीचरबाबत स्पष्टिकरण मागत व्हॉट्सॲपला आधीच नोटीस पाठवली होती. यानंतर आता यूजरनेम फीचरबाबत टेलिग्रामला देखील नोटीस पाठवण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 03, 2026 | 11:44 AM
WhatsApp नंतर आता सरकारची Telegram वर नजर; या कारणांसाठी पाठवली नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

WhatsApp नंतर आता सरकारची Telegram वर नजर; या कारणांसाठी पाठवली नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सॲपनंतर आता टेलिग्राम आणि सिग्नललाही यूजरनेम फीचरबाबत सरकारची नोटीस पाठवण्यात आली आहे.
  • बनावट यूजरनेम, ओळख चोरी आणि ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी कंपन्यांकडे कोणते सुरक्षा उपाय आहेत, याची माहिती मागवण्यात आली आहे.
  • सरकारच्या आक्षेपानंतर व्हॉट्सॲपने यूजरनेम फीचरचे रोलआउट तात्पुरते थांबवले असून सध्या फक्त यूजरनेम रिझर्व करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
Telegram Updates: मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपच्या यूजरनेम फीचरवर सरकारने तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता सरकार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नलवर देखील कारवाई करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरं तर या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर आधीपासूनच यूजरनेम फीचर उपलब्ध आहे. आता माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या दोन्ही प्लॅटफॉर्म्सना नोटीस पाठवली असून या फीचरबाबत उत्तर मागितलं आहे.

Recharge Plans: मुसळधार पावसात Wi-Fi ठप्प? चिंता नको… इंटरनेट सुरू ठेवण्यासाठी ‘हे’ टेलिकॉम प्लॅन्स ठरतील बेस्ट

यूजरनेम फीचरमध्ये यूजरची खरी ओळख कशी सुरक्षित राहते, याबाबत आता सरकारने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. तसेच, कोणताही व्यक्ती दुसऱ्या यूजरच्या नावाने खोटे अकाऊंट तयार करून लोकांची फसवणूक करू शकत नाही का, याबाबत आता सरकारला जाणून घ्यायचे आहे. अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम सारखेच आहेत. यामुळेच आता टेलिग्राम आणि सिग्नलला देखील नोटीस पाठवण्यात आली आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

या प्रश्नांसाठी उत्तरं शोधण्यासाठी पाठवली नोटीस

  • यूजरनेम तयार करण्याची प्रक्रिया काय आहे?
  • खोटे, बनावट किंवा काही प्रमाणात एकसारख्याच असलेल्या यूजरनेमला थांबवण्यासाठी कोणते सुरक्षा उपाय आहेत?
  • एखाद्या सरकारी संस्था, सेलिब्रिटी किंवा सामान्य व्यक्तीच्या ओळखीची नक्कल म्हणजेच त्यांच्या नावांचे खोटे अकाऊंट कसे थांबवले जाऊ शकतात?
  • तक्रार दाखल झाल्यानंतर खोटे यूजरनेम हटवण्यासाठी किंवा ब्लॉक करण्यासाठी काय प्रक्रिया आहे?
  • गरज पडल्यास कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांशी सहकार्य कसे केले जाते?

व्हॉट्सॲपच्या यूजरनेम फीचरवर तात्पुरती बंदी

कंपनीने यूजरची प्रायव्हसी आणि सुरक्षा अधिक मजबूत व्हावी यासाठी यूजरनेम फीचर सादर केले होते. खरं तर या फीचरची सुरुवात या वर्षाच्या अखेरीस होणार होती. कंपनीने आता केवळ यूजर्सनी त्यांचे यूजरनेम सेव्ह करून ठेवावे, यासाठी हे फीचर जारी केले होते. मात्र आता सरकारने यावर आक्षेप घेत या फीचरवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारने मेटाला यूजरनेम फीचर रोलआऊट न करण्यासाठी नोटीस पाठवली असून तीन दिवसांत याबाबत उत्तर मागितलं आहे. फ्रॉड आणि सायबर क्राईमच्या घटना लक्षात घेऊन सरकारने या फीचरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रकरणी उत्तर देताना व्हॉट्सॲपने म्हटलं आहे की, हे फीचर आता रोलआऊट केले जात नाही आणि कंपनीने यामध्ये अनेक सुरक्षा उपाय देखील जोडले आहेत. आता केवळ यूजर्स या फीचरमध्ये त्यांचे यूजरनेम रिजर्व करू शकतात. त्याचा इतर कोणत्याही कारणासाठी वापर करू शकत नाही.

Free Fire Max: नव्या ईव्हेंटमुळे वाढणार गेमिंगची मजा! प्लेअर्सना मिळणार ऑग ब्लेझिंग फ्रॅक्चर गन स्किन आणि बरंच काही…

सरकारने व्यक्त केली चिंता

व्हॉट्सॲपला पाठवलेल्या नोटिसमध्ये सरकारने म्हटलं आहे की, या फीचरमुळे ऑनलाईन फ्रॉड, फिशिंग, डिजिटल अरेस्ट आणि ओळख चोरीसारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. तसेच या फीचरचा दुरुपयोग करून लोकं एखादी व्यक्ती, सरकारी संस्था, वित्तीय संस्था आणि सरकारी एजन्सी यांच्या नावांसारखी यूजरनेम रिजर्व करू शकतात, अशी चिंता सरकारने व्यक्त केली आहे. यामुळे खरे आणि खोटे अकाऊंट यामध्ये फरक करणं कठीण होऊ शकतं.

Web Title: Indian government send notice to telegram and signal after whatsapp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Tech News
  • Telegram
  • Telegram App
  • WhatsApp

संबंधित बातम्या

AI चा नवा चमत्कार! चीनने तयार केला मानवी भावना ओळखणारा ह्युमनॉइड रोबोट; माणसांशी साधणार नैसर्गिक संवाद
1

AI चा नवा चमत्कार! चीनने तयार केला मानवी भावना ओळखणारा ह्युमनॉइड रोबोट; माणसांशी साधणार नैसर्गिक संवाद

Free Fire Max: नव्या ईव्हेंटमुळे वाढणार गेमिंगची मजा! प्लेअर्सना मिळणार ऑग ब्लेझिंग फ्रॅक्चर गन स्किन आणि बरंच काही…
2

Free Fire Max: नव्या ईव्हेंटमुळे वाढणार गेमिंगची मजा! प्लेअर्सना मिळणार ऑग ब्लेझिंग फ्रॅक्चर गन स्किन आणि बरंच काही…

Online Sale : खरेदी करण्याची मोठी संधी! स्मार्टफोन, लॅपटॉप ते स्मार्ट होम डिव्हाइस; 4 जुलैच्या मेगा सेलमध्ये मिळणार जबरदस्त ऑफर्स
3

Online Sale : खरेदी करण्याची मोठी संधी! स्मार्टफोन, लॅपटॉप ते स्मार्ट होम डिव्हाइस; 4 जुलैच्या मेगा सेलमध्ये मिळणार जबरदस्त ऑफर्स

WhatsApp आणि Instagram वरून एखाद्याचे लोकेशन कसं पाहाल? जाणून घ्या सर्वात सोपी आणि सुरक्षित पद्धत
4

WhatsApp आणि Instagram वरून एखाद्याचे लोकेशन कसं पाहाल? जाणून घ्या सर्वात सोपी आणि सुरक्षित पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.