Recharge Plans: मुसळधार पावसात Wi-Fi ठप्प? चिंता नको... इंटरनेट सुरू ठेवण्यासाठी 'हे' टेलिकॉम प्लॅन्स ठरतील बेस्ट
रिलायंस जियो आणि भारती एयरटेल सारखे देशातील खाजगी टेलिकॉम ऑपरेटर्स त्यांच्या यूजर्सना शॉर्ट-टर्म डेटा पॅक ऑफर करतात. या प्लॅनची सर्वात मोठी विशेषत: म्हणजेच तुम्हाला अत्यंत कमी पैसे खर्च करून डेटा मिळतो. सहसा एक दिवसाची व्हॅलिडीटी ऑफर करणाऱ्या डेटा प्लॅनची किंमत सुमारे 20 रुपये असते. यामध्ये तुम्ही दिवसभरात तुमची महत्त्वाची कामं पूर्ण करू शकता. अशाच काही प्लॅन्सबद्दल आता जाणून घेऊया, जे तुम्हाला पावसाळ्यात फायदेशीर ठरू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 19 रुपयांचा डेटा प्लॅन उपलब्ध आहे. ज्याची व्हॅलिडीटी एका दिवसाची असून यामध्ये 1.5GB डेटा ऑफर केला जातो. तर एयरटेलकडे देखील 19 रुपयांचा डेटा प्लॅन उपलब्ध आहे. ज्यामध्ये 1GB डेटा ऑफर केला जातो, पण त्याचे 5जी (5G) नेटवर्क बऱ्यापैकी व्यापक आहे. वोडाफोन आइडियाच्या पोर्टफोलिओमध्ये 24 रुपयांचा डेटा प्लॅन उपलब्ध आहे. ज्यामध्ये एका तासासाठी अनलिमिटेड डेटा ऑफर केला जातो. जर विज नसेल किंवा ब्रॉडबँड कनेक्शन ठप्प झाले आणि तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं काम असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे.
तसेच पावसात घरी बसून जर तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टार किंवा नेटफ्लिक्स सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून चित्रपट किंवा सिरीज पाहण्याची मजा घ्यायची असेल तर तुम्ही एयरटेलचा 148 रुपयांचा प्लॅन खरेदी करू शकता. ज्यामध्ये 15GB डेटासह अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा ॲक्सेस ऑफर केला जातो. तसेत जर तुमच्या परिसरात फायबर लाईन तुटण्याची समस्या निर्माण झाली असेल तर तुमच्यासाठी जियो एयरफाइबर सारखे फिक्स्ड वायरलेस एक्सेस एक चांगला पर्याय ठरणार आहे. ही सिस्टिम कोणत्याही तारीशिवाय काम करते. यामुळे बाहेरील नुकसानामुळे एयरफाइबरवर कोणताही परिणाम होणार नाही.
लॅपटॉपवर काम करण्यासाठी स्मार्टफोन हॉटस्पॉट नेहमी तयार ठेवा. जर ब्रॉडबँड लाईनमध्ये काही समस्या आली तर त्वरित लोकल हेल्पलाइनवर संपर्क करा. आजकाल 5G चा वेग घरगुती वाय-फायच्या तोडीस तोड असतो, ज्यामुळे हे ‘बूस्टर पॅक्स’ अत्यंत प्रभावी ठरतात. येत्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज पाहता, 7 दिवसांचा बूस्टर पॅक घेणे तुमच्यासाठी एक विश्वासार्ह ‘बॅकअप’ ठरू शकेल.






