
नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स
सर्व ऑफर्सनंतर या नव्या इन्फिनिक्स स्मार्ट 20 एचडी स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये होणार आहे. स्मार्टफोनची ही किंमत 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज या व्हेरिअंटसाठी आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर 6 महिन्यांचा नो-कॉस्ट ईएआय पर्याय देखील देणार आहे. हा स्मार्टफोन सनलाइक ऑरेंज, सिल्व्हर डान्सर आणि नाईट पल्स या रंगांच्या पर्यायांत उपलब्ध आहे.
Infinix Smart 20 HD Launched in India With 120Hz Display, 5,000mAh Battery. Price : Infinix Smart 20 HD is priced at Rs. 10,999 in India, inclusive of all offers, for its sole 3GB + 64GB. https://t.co/Ct78MuSNmu — 𝑺𝒂𝒎𝒂𝒓𝒕𝒉 𝑨𝒓𝒐𝒓𝒂 (@techfryerr) October 6, 2026
इन्फिनिक्स स्मार्ट 20 एचडीमध्ये 6.67 इंच एचडी प्लस पंच-होल डिस्प्ले दिला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. डिस्प्लेची पीक एचबीएम ब्राइटनेस 700 निट्सपर्यंत आहे. परफॉर्मंससाठी या स्मार्टफोनमध्ये यूनिसॉक टी 7250 ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळणार आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये 3GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे. फोनचे रॅम वर्चुअल रॅमच्या मदतीने 6GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. तर, स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवले जाऊ शकते. डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 15 वर आधारित एक्सओएस 15.1 मिळणार आहे.
स्मार्टफोनच्या मागील बाजूला आणि समोरील बाजूला दोन्हीकडे 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळणार आहे. रिअर कॅमेऱ्यामध्ये ऑटोफोकस देखील मिळणार आहे आणि 2K रिजॉल्यूशनमध्ये 30fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी सक्षम आहे. फोनच्या कॅमेऱ्याने सुपर नाईट, ड्युअल व्हिडिओ, व्लॉग, डॉक्युमेंट्स, प्रो, पॅनोरमा आणि टाईम-लॅप्ससारख्या मोडमध्ये रेकॉर्ड केले जाऊ शकते.
नव्या स्मार्टफोनमध्ये 15W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी मिळणार आहे. बॉक्समध्ये 10W चार्जर मिळणार आहे. फोनमधील डुअल स्पीकर 300 टक्क्यांपर्यंत अल्ट्रा व्हॉल्यूम मोड आणि डीटीएस ऑडिओला सपोर्ट करतो.
इन्फिनिक्सने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा लिंक फीचर देण्यात आले आहे, जे ब्लूटूथ बेस्ड कनेक्टिविटीचा वापर करते. याद्वारे तुम्ही मोबाईल नेटवर्कशिवाय सुमारे 200 मीटरपर्यंत कॉल, मेसेज, व्हॉईस नोट आणि फोटो पाठवू शकणार आहात. याशिवाय यामध्ये प्युअर व्हॉईस टेक्नोलॉजीसह तीन नॉइज कँसलेशन मोड देखील मिळणार आहेत.