Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram New Logo: इंस्टाग्रामला मिळाली नवी ओळख! कंपनीने 10 वर्षांनी बदलला लोगो; काय म्हणाले यूजर्स?

इंस्टाग्रामने तब्बल 10 वर्षांनंतर आपल्या वर्डमार्कमध्ये मोठा बदल केला आहे. नव्या डिझाईनमध्ये आधुनिक आणि स्वच्छ लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, सोशल मीडियावर मात्र या बदलाची चर्चा रंगली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 15, 2026 | 01:20 PM
Instagram New Logo: इंस्टाग्रामला मिळाली नवी ओळख! कंपनीने 10 वर्षांनी बदलला लोगो; काय म्हणाले यूजर्स?

Instagram New Logo: इंस्टाग्रामला मिळाली नवी ओळख! कंपनीने 10 वर्षांनी बदलला लोगो; काय म्हणाले यूजर्स?

Follow Us
Follow Us:
  • 10 वर्षांनंतर बदल: इंस्टाग्रामने दशकभरानंतर आपल्या टेक्स्ट-ओनली वर्डमार्कला नवा लूक दिला आहे.
  • नवीन डिझाईन: नव्या वर्डमार्कमध्ये कर्सिव्ह आणि प्रिंट अक्षरांचा आधुनिक समतोल साधण्यात आला आहे.
  • यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया: काही यूजर्सनी नव्या लोगोचे कौतुक केले, तर काहींनी तो वाचण्यास कठीण असल्याचे म्हटले आहे.
टेक कंपनी मेटाने त्यांच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामसाठी एक नवीन वर्डमार्क लाँच केले आहे. हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा टेक्स्ट-ओनली लोगो आहे. इंस्टाग्रामचे प्रमुख एडम मोसेरी यांनी या बदलाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. एडम मोसेरी यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे की, अ‍ॅपच्या शीर्षस्थानी वर्डमार्क 10 वर्षांत बदलण्यात आले नव्हते. यामुळेच आता या वर्डमार्कला एक नवीन रुप देण्याची वेळ आली होती.

रोबोट म्हणावं की कॅमेरा? Honor ने लाँच केला जगातील पहिला Robot Phone; अनोख्या डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष

कशी आहे इंस्टाग्रामची नवीन ओळख?

एडम मोसेरी यांनी म्हटलं आहे की, नवीन वर्डमार्क पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ आणि आधुनिक आहे. यामध्ये मूळ डिझाइनचे सार, तसेच इंस्टाग्रामचा साधेपणा आणि कलात्मकता जपली गेली आहे. मेटाच्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, टिमने शेकडो डिझाईन पाहिले आणि त्यावर विचार केला. यामध्ये सर्व-कॅप्स अक्षरांपासून ते हस्तलिखित डिझाईनपर्यंत सर्वांचा समावेश होता. मात्र, अखेरीस टीमने प्रवाही स्ट्रोक असलेल्या स्क्रिप्ट फॉन्टची निवड केली. (फोटो सौजन्य – Pinterest)

इंस्टाग्रामच्या प्रॉडक्ट डिझाइनच्या संचालिका, जस्मिन प्रोब्स्ट यांनी 13 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात सांगितलं की, स्क्रिप्ट वैयक्तिक ओळख दर्शवते. त्यांनी सांगितलं की, नीवन वर्डमार्क जास्त बोल्ड आणि सरळ आहे, ज्यामध्ये अनपेक्षिततेचा स्पर्श आहे.

नव्या इंस्टाग्राम लोगोबाबत काय म्हणाले यूजर्स?

इंस्टाग्रामने सुमारे 10 वर्षांनी वर्डमार्क बदलले आहे. नवीन डिझाईन पूर्वीपेक्षा जास्त स्वच्छ आणि मॉडर्न बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असं असलं तरी देखील सोशल मीडियावर लोकांनी इंस्टाग्रामचा नवा लोगो ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही लोकांनी नव्या लोगोलो पसंती दर्शवली आहे मात्र काही यूजर्सनी या नव्या लोगोची खिल्ली उडवण्यास सुरुवात केले आहे.

एका यूजरने मोसेरी यांनी शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे की, नवीन लोकं स्वच्छ आणि मॉडर्न असण्यासोबतच मजेदार देखील आहे. तर दुसऱ्या यूजरने म्हटलं आहे की, या वर्डमार्कमध्ये एक चमक आहे. तर काही यूजर्स इंस्टाग्राम वर्डमार्कमधील ‘एस’ आणि ‘आर’ शब्दांमध्ये गोंधळले आहेत. तर आणखी एका यूजरने म्हटलं आहे की, हे वर्डमार्क वाचायला फार कठीण आहे.

BSNL Offer: हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना मिळणार तब्बल 412 दिवसांची व्हॅलिडीटी! स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनीची खास ऑफर

इंस्टाग्राम लोगोमध्ये काय बदलले?

जर तुम्ही दिर्घकाळापासून इंस्टाग्रामचा वापर करत असाल तर हा बदल तुम्हाला पाहताक्षणी लक्षात येईल. गेल्या एका दशकापासून इंस्टाग्रामचे नाव एक खास कर्सिव म्हणजेच हाताने लिहील्यासारखे भासत होते. मात्र आता इंस्टाग्रामने हीच स्टाईल बदलली आहे. नवीन ‘वर्डमार्क’च्या (शब्द-चिन्हाच्या) रचनेत जुनी वळणदार (कर्सिव्ह) शैली आणि नॉर्मल प्रिंट अक्षरे यांच्यातील समतोल साधणारी रचना दिसून येते.

Web Title: Instagram new wordmark instagram gets new logo after 10 years users react to modern design

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.