Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram Update: भारतीय यूजर्ससाठी नवं फीचर; आता एकाच पोस्टमध्ये लिहा अनेक कॅप्शन्स… जाणून घ्या कसं कराल वापर

Instagram Multiple Captions Feature: इंस्टाग्राम पुन्हा एकदा एक नवीन फीचर घेऊन आला आहे. या फीचरमध्ये यूजर्स एकाच पोस्टमध्ये विविध कॅप्शन्स जोडू शकणार आहेत. विशेष म्हणजेच पोस्टवर एखादी गोष्ट किंवा ईव्हेंट्स शेअर करणाऱ्यांसाठी हे नवीन फीचर अतिशय फायद्याचे ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 20, 2026 | 10:23 AM
Instagram Update: भारतीय यूजर्ससाठी नवं फीचर; आता एकाच पोस्टमध्ये लिहा अनेक कॅप्शन्स... जाणून घ्या कसं कराल वापर

Instagram Update: भारतीय यूजर्ससाठी नवं फीचर; आता एकाच पोस्टमध्ये लिहा अनेक कॅप्शन्स... जाणून घ्या कसं कराल वापर

Follow Us
Follow Us:
  • इंस्टाग्रामच्या नव्या ‘मल्टिपल कॅप्शन्स ऑन कॅरोसेल’ फीचरमुळे प्रत्येक स्लाईडसाठी वेगळे कॅप्शन जोडता येणार आहे.
  • हे फीचर वापरण्यासाठी पोस्ट तयार करताना ‘मल्टिपल कॅप्शन’ पर्याय निवडावा लागणार आहे.
  • ट्यूटोरियल्स, ट्रॅव्हल पोस्ट्स, प्रोडक्ट शोकेस आणि स्टोरीटेलिंग कंटेंटसाठी हे फीचर विशेष उपयुक्त ठरणार आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram च्या भारतीय यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन आणि बहुप्रतिक्षित फीचर रोलआऊट केलं आहे. आता यूजर्स पोस्ट शेअर करताना प्रत्येक स्लाईडसाठी वेगवेगळे कॅप्शन्स जोडू शकणार आहेत. हे नवीन अपडेट ‘मल्टिपल कॅप्शन्स ऑन कॅरोसेल’ या नावाने रोलआऊट करण्यात आले आहे. या नवीन फीचरमुळे आता क्रिएटर्स आणि सामान्य यूजर्सचा इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. आता कॅरोसेल पोस्टमधील सर्व स्लाईड्ससाठी यूजर्सना केवळ एकच कॅप्शन शेअर करण्याचा पर्याय होता. मात्र आता यूजर्स नव्या फीचरमुळे पोस्टमधील प्रत्येक स्लाईडसाठी वेगळे कॅप्शन जोडू शकणार आहेत.

iPhone Price Hike: नवा आयफोन ग्राहकांच्या खिशाला लावणार कात्री? लाँचपूर्वीच Tim Cook यांनी दिली मोठी हिंट

आता एकाच पोस्टमध्ये लिहा अनेक कॅप्शन्स

इंस्टाग्रामचे हेड एडम मोसेरी (@mosseri) आणि प्लॅटफॉर्मच्या @creators अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, आता यूजर्स एक कॅरोसेल पोस्ट क्रिएट करताना नवीन फीचर अ‍ॅक्सेस करू शकतात. पोस्ट करण्यासाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सिलेक्ट केल्यानंतर, यूजर्सना कॅप्शन फील्डवर टॅप करावे लागणार आहेत. इथे सिंगल कॅप्शन किंवा मल्टिपल कॅप्शन असे दोन पर्याय दिसतील. यापैकी मल्टिपल कॅप्शन पर्याय निवडावा लागणार आहे. यानंतर यूजर्स आता पोस्टमधील प्रत्येक फोटो आणि व्हिडीओसाठी वेगवेगळे कॅप्शन्स जोडू शकणार आहेत. हे फीचर रोलआऊट होण्यास सुरुवात झाली आहे आणि भारतातील यूजर्ससाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

क्रिएटर्स आणि सामान्य यूजर्सचा अनुभव बदलणार

या नव्या फीचरमुळे आता यूजर्स एकाच पोस्टमध्ये अनेक फोटो आणि व्हिडीओ जोडून प्रत्येकासाठी एक वेगळे कॅप्शन लिहू शकणार आहेत. यामुळे आता क्रिएटर्स आणि सामान्य यूजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. आता संपूर्ण पोस्टसाठी टेक्स्टचा एक सिंगल ब्लॉक दिसण्याऐवजी, इंस्टाग्राम आता स्लाइड-स्पेसिफिक कॅप्शन सादर करू शकते. यामुळे स्क्रीनवर दिसणाऱ्या ईमेजच्या हिशोबाने कॅप्शन देखील बदलणार आहे.

Father’s Day Gift: शर्ट किंवा चॉकलेट नाही… यंदा तुमच्या बाबांना द्या हे बेस्ट गॅझेट्स, दिवस बनेल अधिक संस्मरणीय

अशा कंटेटसाठी फायदेशीर ठरणार नवं फीचर

इंस्टाग्रामचं असं म्हणणं आहे की, हे अपडेट कॅरोसेलमध्ये पर्सनल फोटो आणि व्हिडीओसह विविध माहिती अतिशय सोप्या पद्धतीने सादर करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. हे क्रिएटर्सना कंटेटचे नियोजन करण्यासाठी जास्त फ्लेक्सिबिलिटी देतो, जो सीक्वेंशियल स्टोरीटेलिंग किंवा विजुअल एक्सप्लेनेशनवर आधारित आहे. हा कंटेट बदल विशेषत: अशा कंटेंट फॉर्मेट्ससाठी फायदेशीर ठरू शकतो, जे टप्प्याटप्प्याने पोस्ट शेअर करत एखाद्या गोष्टीचे वर्णन करत असतात. हे फीचर ट्यूटोरियल्स, ट्रॅवल पोस्ट्स, प्रोडक्ट शोकेस आणि दुसऱ्या कंटेटसाठी फायदेशीर मानला जातो.

Web Title: Instagram roll out new feature for indian users you add many captions in one post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

स्मार्टफोनला पर्याय शोधताय? ‘हे’ आहेत 3 हजारांहून कमी किंमतीत मिळणारे बेस्ट 4G फीचर फोन, पाहा संपूर्ण यादी
1

स्मार्टफोनला पर्याय शोधताय? ‘हे’ आहेत 3 हजारांहून कमी किंमतीत मिळणारे बेस्ट 4G फीचर फोन, पाहा संपूर्ण यादी

नवा ट्रेंड की प्रायव्हसीचा धोका? कॅमेरा असलेल्या Smart Glasses ठरले चर्चेचा विषय, डेटा सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह
2

नवा ट्रेंड की प्रायव्हसीचा धोका? कॅमेरा असलेल्या Smart Glasses ठरले चर्चेचा विषय, डेटा सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह

Tech Tips: घरातील जुन्या USB केबल कचऱ्यात फेकताय? थांबा… जाणून घ्या विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत
3

Tech Tips: घरातील जुन्या USB केबल कचऱ्यात फेकताय? थांबा… जाणून घ्या विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत

Smartphone Tips: 0.5X पासून टेलिफोटोपर्यंत… काय आहे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचं खरं काम? जाणून घ्या सविस्तर
4

Smartphone Tips: 0.5X पासून टेलिफोटोपर्यंत… काय आहे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचं खरं काम? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.