'मी मुस्लिम, पण मला भगवा रंग आवडला...', iPhone 17 खरेदी करताना भगव्या रंगाचा मोह ग्राहकाला आवरेना
Apple च्या लेटेस्ट आयफोन 17 सिरीजच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. नवीन आयफोन सिरीज खरेदी करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. iPhone Air च्या विक्रीला देखील आता सुरुवात झाली आहे. लेटेस्ट iPhones खरेदी करण्यासाठी Apple स्टोअर बाहेर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लोकं रात्रीपासून Apple स्टोअरच्या बाहेर रांगेत थांबले आहेत. सकाळी 8 वाजता Apple स्टोअर ओपन होताच ग्राहकांनी नवीन आयफोन 17 सिरीज खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.
यावेळी कंपनीने त्यांच्या प्रो सिरीजमध्ये एक नवीन कलर व्हेरिअंट लाँच केला आहे. हा कलर व्हेरिअंट म्हणजे कॉस्मिक ऑरेंज कलर. हा नवा व्हेरिअंट प्री-ऑर्डरदरम्यान आउट ऑफ स्टॉक झाला होता. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रंगाची ग्राहकांना भुरळ पडली आहे. या कलर व्हेरिअंटची सध्या मोठी मागणी आहे. आयफोन लाँच होताच ग्राहकांनी या नव्या कलर व्हेरिअंटला पसंती दर्शवली होती. (फोटो सौजन्य – X)
कंपनीने लाँच केलेल्या कॉस्मिक ऑरेंज कलरला लोकं भगव्या रंगाशी जोडत आहेत. या कलर व्हेरिअंटची भारतात मोठी मागणी आहे. दिल्लीतील साकेत येथील सिलेक्ट सिटी मॉलमधील Apple स्टोअरला भेट दिलेल्या एका व्यक्तीने कॉस्मिक ऑरेंज कलर आयफोन व्हेरिअंट खरेदी केला आहे. हा व्यक्ती आयफोन खरेदी करण्यासाठी संगम विहारहून आला होता. हा कलर व्हेरिअंट खरेदी केल्यानंतर त्या व्यक्तीने आनंद व्यक्त केला आणि तो म्हणाला की, मी मुस्लिम आहे, पण मला हा रंग आवडला. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे.
VIDEO | Delhi: After buying the iPhone 17 series phone, a customer says, “I was in the queue since morning, and I am excited to buy the iPhone of this colour. In India, this saffron-coloured phone will become very popular. I am a Muslim, but I love this colour…”#iPhone17… pic.twitter.com/jdMjvx4GVn
— Press Trust of India (@PTI_News) September 19, 2025
दरवर्षी Apple त्यांच्या आयफोन्समध्ये नवीन रंग सादर करते. यावेळी असाच एक पर्याय म्हणजे कॉस्मिक ऑरेंज. या कलर व्हेरिअंटची सध्या जोरदार चर्चा आहे. ग्राहकांना हा कलर व्हेरिअंट प्रचंड आवडला आहे. हा रंग केवळ iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max मध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, तुम्हाला सिल्व्हर आणि डीप ब्लू रंगाचा पर्याय मिळेल.
आयफोन 17 च्या बेस मॉडेलची किंमत 82,900 रुपये, आयफोन एयरची किंमत 1,19,900 रुपये, आयफोन 17 प्रो ची किंमत 1,34,900 रुपये आणि 17 प्रो मॅक्स ची किंमत 1,49,900 रुपये आहे. लेटेस्ट iPhone 17 सीरीज आणि iPhone Air कंपनीच्या ऑनलाईन ऑफिशियल वेबसाइटव्यतिरिक्त प्रमुख रिटेल स्टोअर आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी केला जाऊ शकतो. तसेच, आजपासून, नवीनतम Apple मॉडेल्स Apple च्या स्वतःच्या स्टोअर्स आणि भागीदार रिटेल स्टोअर्समधून ऑफलाइन खरेदी करता येतील.
Ingram Micro मध्ये नवीन आयफोन मॉडेल 24 महिन्यांच्या कॉस्ट ईएमआयवर खरेदी केला जाऊ शकतो. यासोबतच जुना आयफोन एक्सचेंज केल्यास 7000 रुपयांपर्यंतचे बोनस ऑफर केले जाणार आहे. यासोबतच 6000 रुपयांपर्यंतचा इन्स्टंट कॅशबॅक देखील दिला जात आहे. Croma देखील नवीन आयफोनच्या खरेदीवर 6 महिन्यांचा नो-कॉस्ट ईएमआई आणि 6000 रुपयांचे डिस्काउंट ऑफर करत आहे. विजय सेल्स आयफोन 17 वर 6000 रुपयांचे डिस्काउंट देत आहे आणि प्रो सीरीज आणि एअर मॉडेल्सवर 4000 रुपयांचे इंस्टेंट डिस्काउंट ऑफर करत आहे.