iPhone 17 Series: भारतीय युजर्सची फसवणूक की Apple ची खेळी? आयफोन 17 सिरीजमधील हे मॉडेल अमेरिकेपेक्षा असणार वेगळं, जाणून घ्या फरक
9 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या Awe-Dropping 2025 ईव्हेंटमध्ये टेक जायंट कंपनी Apple ने iPhone 17 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. म्हणजेच कंपनीने लाँच केलेल्या आधीच्या सिरीजचा विचार केला तर नवीन आणि लेटेस्ट आयफोन सिरीज ग्राहकांची मन जिंकू शकते. या सिरीजमधील डिझाईन आणि बॅटरी स्पेसिफिकेशन्स चर्चेचा विषय ठरत आहे.
कंपनीने या नव्या सिरीजमध्ये मोठी बॅटरी दिली आहे, ज्यामुळे ग्राहकांना दिर्घकाळापर्यंत फोनचा वापर करता येईल. आजपासून या सिरीजची विक्री सुरु होणार आहे. कंपनीचे सीईओ टिम कुकने देखील याबाबत त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. मात्र आयफोन 17 सिरीजची पहिली विक्री सुरु होण्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. खरं तर या अपडेटमुळे भारतातील आयफोन ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत विकले जाणारे आयफोन 17 सीरीजचे प्रो मॉडेल भारतापेक्षा वेगळे असणार आहे. यामधील मोठं अंतर म्हणजे आयफोनमधील बॅटरी. (फोटो सौजन्य – chatgpt)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोन 17 सिरीजमधील प्रो मॉडेलमध्ये मोठी बॅटरी दिली जाणार आहे. अमेरिकेत, 17 प्रो मॉडेलची बॅटरी 30 तास व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि 33 तास लोकल व्हिडिओ प्लेबॅकला सपोर्ट करणार आहे, तर भारतीय व्हेरिअंट 28 तास व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि 31 तास लोकल व्हिडिओ प्लेबॅक ऑफर करणार आहे.
कंपनीने हा निर्णय का घेतला, दोन्ही व्हेरिअंटमधील बॅटरीमध्ये इतकं अंतर का, याबाबत कोणतेही कारण देण्यात आले नाही. मात्र असं सांगितलं जात आहे की, अमेरिकेत उपलब्ध असलेल्या मॉडेल्समध्ये फक्त ई-सिम सपोर्ट दिला जाणार आहे, तर भारतासह इतर देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या आयफोन मॉडेल्समध्ये फिजिकल सिम कार्ड स्लॉट देखील असेल. यामुळे बॅटरी क्षमतेत थोडा फरक पडू शकतो. मात्र कंपनीने याबाबत कोणतंही अधिकृत कारण जाहीर केलं नाही.
आईफोन 17 मध्ये 3,692 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी आयफोन 16 च्या तुलनेत 3.7 टक्के मोठी आहे. आयफोन 17 एयरमध्ये 3,149 mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 22 तास व्हिडीओ स्ट्रिमिंग आणि 27 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक ऑफर करते. 17 प्रो मध्ये 4,252 mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी आयफोन 16 प्रो मॉडेलच्या तुलनेत 19 टक्के मोठी आहे. आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये लाइनअपमधील सर्वात मोठी बॅटरी (5,088 mAh) आहे, जी 16 प्रो मॅक्सपेक्षा सुमारे 9 टक्के मोठी आहे.
आयफोन 17 सिरीज भारतात कधी लाँच करण्यात आली?
9 सप्टेंबर 2025
आयफोन 17 च्या बेस मॉडेलची किंमत किती आहे?
आयफोन 17 च्या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत 82,900 रुपये आहे
आयफोन 17 च्या बेस मॉडेलचे डिस्प्ले स्पेसिफिकेशन्स काय आहेत?
iPhone 17 मध्ये 6.3 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे