
iPhone 17e: Apple चा मास्टरस्ट्रोक? या दिवशी लाँच होणार कंपनीचा सर्वात स्वस्त आयफोन! स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स आले समोर
लीक्सवर विश्वास ठेवला तर iPhone 17e हा कंपनीच्या आयफोन 17 सिरीजचा सर्वात स्वस्त फोन असणार आहे. भारतीय बाजारात हा आगामी आयफोन 64,900 रुपयांच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. तर जागतिक बाजारातील किंमतबद्दल बोलायाचं झालं तर आगामी आयफोनची किंंमत अमेरिकेत 699 डॉलर, दुबईमध्ये AED 2,499 आणि युनायटेड किंग्डममध्ये £519 असू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिपोर्ट्समध्ये सांगितलं आहे की, कंपनी फेब्रवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात iPhone 17e जागतिक बाजारात लाँच करू शकते. त्यानंतर काही दिवसांनी iPhone 17e भारतात देखील लाँच केला जाणार आहे.
iPhone 17e मध्ये 6.1-इंच सुपर रेटिना OLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यात आहे, जो उत्तम कलर आणि ब्राइटनेस ऑफर करेल. या व्हेरिअंटमध्ये देखील कंपनी हाय रिफ्रेश रेट देण्याची शक्यता आहे. परफॉर्मंससाठी या फोनमध्ये नवीन Apple A19 चिपसेट दिला जाऊ शकतो, ज्याला 8GB रॅमसह जोडले जाऊ शकते. यूजर्सना 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकते. बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 4000mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे, जी iOS ऑप्टिमाइजेशनसह चांगला बॅकअप ऑफर करणार आहे.
iPhone 17e चे कॅमेरा डिझाईन अतिशय साधे आहे. लीक्सनुसार, कंपनी या फोनमध्ये 48MP चा सिंगल रियर कॅमेरा देणार आहे, जो OIS सपोर्टसह येईल आणि हा सेंटर स्टेज फीचरला सपोर्ट करू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 18MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.
Google Translate चा खेळ खल्लास? OpenAI ने केला सायलेंट धमाका! ChatGPT साठी आणलं नवं फीचर
iPhone 17e मागील मॉडेल iPhone 16e प्रमाणेच मिनिमल आणि प्रीमियम लुक ऑफर करणार आहे. फोनचा बाहेरील फ्रेम आधीपेक्षा पातळ असेल आणि यामध्ये कंपनीचे सिग्नेचर फ्लॅट डिझाईन पाहायला मिळू शकते. कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचं झालं तर लाँचवेळी हा स्मार्टफोन काळ्या आणि सफेद अशा दोन रंगात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपनी यामध्ये आणखी दोन नवीन रंगाचा समावेश करू शकते.