Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple Event 2026: मुहूर्त ठरला… या दिवशी कंपनी करणार मोठा धमाका, iPhone 17e पासून स्वस्त MacBook पर्यंत हे डिव्हाईस करणार एंट्री

टिम कुक यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत यूजर्सना एक खास सरप्राईज दिले आहे. आगामी अ‍ॅपल ईव्हेंट 2 मार्चपासून 4 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. अ‍ॅपलने हळूहळू प्रोडक्ट्स लाँच करण्याचा दृष्टिकोन स्वीकारला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 28, 2026 | 11:23 AM
Apple Event 2026: मुहूर्त ठरला... या दिवशी कंपनी करणार मोठा धमाका, iPhone 17e पासून स्वस्त MacBook पर्यंत हे डिव्हाईस करणार एंट्री

Apple Event 2026: मुहूर्त ठरला... या दिवशी कंपनी करणार मोठा धमाका, iPhone 17e पासून स्वस्त MacBook पर्यंत हे डिव्हाईस करणार एंट्री

Follow Us
Close
Follow Us:
  • 2 मार्चपासून अनेक प्रोडक्ट्स जाहीर केले जाण्याची शक्यता
  • अ‍ॅपलने हळूहळू प्रोडक्ट्स लाँच करण्याचा दृष्टिकोन स्वीकारला आहे
  • Apple हँडसेटचे डिझाईन मागील मॉडेलसारखेच असू शकते
मार्च महिन्याचा पहिला आठवडा अतिशय खास होणार आहे. कारण मार्च महिन्यात टेक कंपनी अ‍ॅपल मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अ‍ॅपल ईव्हेंट 2026 आयोजित केला जाणार आहे. याबाबत अ‍ॅपलचे सिईओ टिम कुक यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. टिम कूक यांनी शेअर केलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे.
A big week ahead. It all starts Monday morning! #AppleLaunch pic.twitter.com/PQ9gM2Gl2r — Tim Cook (@tim_cook) February 26, 2026

पोस्ट शेअर करत टिम कूक यांनी लिहीले आहे की, ‘बिग वीकेंड अहेड’. 2 मार्चपासून अनेक प्रोडक्ट्स जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. तथापी, क्यूपर्टिनो बेस्ड टेक कंपनीने अद्याप तारीख अधिकृतपणे घोषित केली नाही. मात्र समोर आलेल्या रिपोर्ट्स मागील रिपोर्टसोबत जुळत आहे. सर्वात प्रतीक्षित लाँचमध्ये आयफोन 17e, एक स्वस्त मॅकबुक आणि नवीनतम अ‍ॅपल सिलिकॉनद्वारे समर्थित नवीन मॅकबुक प्रो मॉडेल्सचा समावेश आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Upcoming Smartphones: आता राडा तर होणारच… Nothing पासून iPhone पर्यंत, मार्च महिन्यात एंट्री करणार हे स्मार्टफोन्स

एक्स पोस्टमध्ये टिम कुक यांनी लिहीले आहे की, पुढील आठवडा अतिशय मोठा आहे. या पोस्टवरून असा अंदाज लावला जात आहे की, अ‍ॅपल मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीला ईव्हेंटची घोषणा करण्याची शक्यता आहे. मागील रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, टेक कंपनीचा ‘स्पेशल अ‍ॅपल एक्सपीरियंस’ तीन दिवसांपर्यंत सुरु राहणार आहे. हा ईव्हेंट 2 मार्चपासून 4 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. असं सांगितलं जात आहे की, शेवटच्या दिवशी हा अनुभव लंडन, न्यूयॉर्क आणि शंघाईमध्ये अनुभवायला मिळणार आहे. ईव्हेंटमध्ये उपस्थित राहणाऱ्यांना नवीन लाँच केलेल्या उत्पादनांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळू शकते.

अ‍ॅपलने हळूहळू प्रोडक्ट्स लाँच करण्याचा दृष्टिकोन स्वीकारला आहे, विशेषतः हार्डवेअर रिफ्रेशसाठी, पारंपारिक स्टेज इव्हेंट्सऐवजी प्रेस रिलीज आणि ऑनलाइन अपडेट्सचा वापर करून प्रोडक्ट्स लाँच करण्यावर कंपनी भर देत आहे. तथापि, त्यांनी अद्याप अशा योजनांची पुष्टी केलेली नाही. मात्र अद्यापही कंपनीची एक्सपेक्टेड अनाउंसमेंट्स सीक्रेट आहे. मात्र यूजर्सना सर्वाधिक ज्या प्रोडक्ट्सची प्रतिक्षा आहे, यापैकी एक iPhone 17e आहे. Apple हँडसेटचे डिझाईन मागील मॉडेलसारखेच असू शकते. तथापी, संभाव्य अपग्रेडमध्ये जलद नेटवर्किंगसाठी C1X मॉडेम आणि मॅगसेफ चार्जिंग सपोर्टचा समावेश असू शकतो.

आयफोन 17 प्रोपासून विवो एक्स 300 प्रोपर्यंत… हे आहेत Galaxy S25 Ultra साठी बेस्ट पर्याय, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

ईव्हेंटमध्ये लाँच केले जाणारे पुढील प्रोडक्ट कंपनीचे स्वस्त MacBook असू शकते. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, 1,000 डॉलर म्हणजेच सुमारे 90,700 रुपयांच्या किंमतीत हे डिव्हाईस लाँच केले जाण्याची शक्यता आहे. जर खरंच कंपनीने या किंमतीत मॅकबुक लाँच केला, तर हे बाजारातील सर्वात स्वस्त मॅकबुक असणार आहे. किंमत कमी राहावी यासाठी Apple कथितपणे मशीनमध्ये A18 Pro चिपसेट लावत आहे. हा तोच प्रोसेसर आहे जो iPhone 16 Pro मॉडेलमध्ये आहे. याव्यतिरिक्त, असं सांगितलं जात आहे की, हे डिव्हाईस एअर आणि प्रो व्हेरिअंटच्या तुलनेत थोडे छोटे, 13 इंचाहून थोड्या कमी डिस्प्लेसह लाँच केला जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, टेक कंपनी M5 Pro आणि M5 Max चिपसेट वाले नवीन MacBook Pro मॉडेल्स लाँच करू शकते. M5 Max किंवा Ultra-पावर्ड Mac Studio बाबत देखील चर्चा सुरु झाल्या आहेत.

Web Title: Apple event will organize from 2 march to 4 march 2026 which device will launch know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • tech event

संबंधित बातम्या

Tech Tips: कोण वापरतंय तुमच्या iPhone चा हॉटस्पॉट डेटा? क्षणार्धात लावा शोध, फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: कोण वापरतंय तुमच्या iPhone चा हॉटस्पॉट डेटा? क्षणार्धात लावा शोध, फॉलो करा ही सोपी प्रोसेस

स्मार्टफोन यूजर्सची Privacy धोक्यात? फोन वापरत नसतानाही Apple आणि Google ट्रॅक करतायत डेटा? अहवालात मोठा खुलासा
2

स्मार्टफोन यूजर्सची Privacy धोक्यात? फोन वापरत नसतानाही Apple आणि Google ट्रॅक करतायत डेटा? अहवालात मोठा खुलासा

iCloud स्कॅमने उडवली iPhone यूजर्सची झोप! अशी होतेय फसवणूक, सावध राहण्यासाठी वाचा एक्सपर्टचा सल्ला
3

iCloud स्कॅमने उडवली iPhone यूजर्सची झोप! अशी होतेय फसवणूक, सावध राहण्यासाठी वाचा एक्सपर्टचा सल्ला

iPhone Secret Codes: नेटवर्क स्ट्रेंथपासून आयफोन हिडन फीचर्सपर्यंत… केवळ एक कोड डायल करा आणि मिळवा संपूर्ण माहिती
4

iPhone Secret Codes: नेटवर्क स्ट्रेंथपासून आयफोन हिडन फीचर्सपर्यंत… केवळ एक कोड डायल करा आणि मिळवा संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.