Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 18 Leaks: कधी होणार लाँच? कसा असणार कॅमेरा? लीक्समधून समोर आली सर्व माहिती

Upcoming iPhone 18 Leaks: अ‍ॅपलच्या आगामी iPhone 18 सिरीजबाबत मोठी माहिती समोर आली आहे. यावेळी कंपनी स्टँडर्ड iPhone 18 मॉडेल सप्टेंबरऐवजी पुढील वर्षी लॉन्च करू शकते, अशी चर्चा सुरु आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 11, 2026 | 11:52 AM
iPhone 18 Leaks: कधी होणार लाँच? कसा असणार कॅमेरा? लीक्समधून समोर आली सर्व माहिती

iPhone 18 Leaks: कधी होणार लाँच? कसा असणार कॅमेरा? लीक्समधून समोर आली सर्व माहिती

Follow Us
Follow Us:
  • Apple पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये iPhone 18 लॉन्च करू शकते.
  • आगामी iPhone 18 मध्ये 12GB RAM आणि 120Hz ProMotion डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.
  • iPhone 18 मध्ये 48MP ड्युअल रिअर कॅमेरा आणि नवीन सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.
टेक कंपनी अ‍ॅपलच्या आगामी आयफोनची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. कंपनी आयफोन 18 सिरीजमधील मॉडेल्स कधी लाँच करणार, याबाबत आता यूजर्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. खरं तर प्रो मॉडेल्सपेक्षा यूजर्सना स्टँडर्ड मॉडेलची प्रतिक्षा सर्वात जास्त असते. कारण स्टँडर्ड मॉडेलची किंमती देखील कमी असते आणि यामध्ये नवीन फीचर्सचा देखील समावेश केला जातो. यावेळी देखील कंपनीच्या आगामी स्टँडर्ड मॉडेलमध्ये काही बदल पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे. तसेच सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे कंपनी आगामी आयफोन 18 सिरीजमधील स्टँडर्ड मॉडेल सप्टेंबर महिन्यात लाँच करणार नाही.

Jio Recharge Plan: यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?

मिळालेल्या माहितीनुसार, टेक कंपनी सप्टेंबर महिन्यात फोल्डेबल आयफोनसह आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स हे मॉडेल्स लाँच करणार आहे. तर स्टँडर्ड मॉडेल आयफोन 18 साठी ग्राहकांना थोडी प्रतिक्षा कराली लागणार आहे. कंपनी पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये आयफोन 18 लाँच करण्याची शक्यता आहे. आगामी स्टँडर्ड मॉडेलचे काही फीचर्स समोर आले आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

डिस्प्ले डाउनग्रेड होण्याची शक्यता

आयफोन 18 मध्ये 6.3 इंच 120Hz प्रोमोशन डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. आयफोन 17 मध्ये देखील हाच डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीच्या आगामी मॉडेलमध्ये एका जुन्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. अशी चर्चा सुरु आहे की, कंपनी यावेळी सॅमसंगचा M12+ OLED मटेरियल वापरू शकता. आयफोन 14 प्रो मध्ये देखील याच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. यामुळे बॅटरी कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. कारण अपेक्षित ब्राइटनेस पातळी गाठण्यासाठी अधिक ऊर्जेची आवश्यकता असेल.

आगामी मॉडेल 12GB रॅमने असू शकतो सुसज्ज

आगामी आयफोन 18 मध्ये सर्वात मोठे अपग्रेड रॅममध्ये पाहायला मिळू शकते. लीक्सनुसार, अ‍ॅपलच्या आगामी स्टँडर्ड मॉडेलमध्ये 12GB रॅम दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या स्टँडर्ड आयफोन मॉडेलमध्ये 8GB रॅम ऑफर केली जाते. खरं तर, अशी देखील चर्चा सुरु आहे की, कंपनी आगामी स्टँडर्ड मॉडेलमध्ये दमदार एआय फीचर्स देखील देऊ शकते, ज्यामुळे ऑन-डिवाइस प्रोसेसिंगची जास्त गरज असणार आहे. मेमरी चिप्सची कमतरता पाहता, हे होण्याची शक्यता कमी वाटते.

Power Bank Tips: फ्लाइटमध्ये पावर बँक वापरताय? सावधान… ‘या’ चुका ठरू शकतात धोकादायक

कसा असणार कॅमेरा?

आयफोन 18 चा कॅमेरा सेटअप सध्याच्या मॉडेलप्रमाणेच असू शकते. या स्मार्टफोनच्या रिअरमध्ये 48MP सेंसर वाला डुअल कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. प्रो मॉडेल्सप्रमाणे यामध्ये वेरिएबल अपर्चर मिळणार नाही. फ्रंट कॅमेऱ्यामध्ये देखील काही अपडेट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कंपनी त्यांच्या आगामी स्टँडर्ड मॉडेलमध्ये 24MP चा सेल्फी कॅमेरा देण्याची शक्यता आहे.

चिपसेट

आयफोन 17 मध्ये 5-कोर GPU वाला A19 चिपसेट दिला आहे. तर आगामी आयफोन 18 मध्ये 4-कोर GPU वाला चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: iPhone 18 कधी लॉन्च होऊ शकतो?

    Ans: लीक्सनुसार, Apple पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये iPhone 18 लॉन्च करू शकते.

  • Que: iPhone 18 मध्ये किती रॅम मिळू शकते?

    Ans: आगामी iPhone 18 मध्ये 12GB RAM दिली जाण्याची शक्यता आहे.

  • Que: iPhone 18 चा कॅमेरा सेटअप कसा असू शकतो?

    Ans: फोनमध्ये 48MP ड्युअल रिअर कॅमेरा आणि 24MP सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.

Web Title: Iphone 18 leaks when company will launch their next model what are the camera specifications read in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.