Power Bank Tips: फ्लाइटमध्ये पावर बँक वापरताय? सावधान... ‘या’ चुका ठरू शकतात धोकादायक
पावर बँकमध्ये लिथियम-आयन बॅटरीचा वापर केला जातो. जर ही बॅटरी जास्त गरम झाली, ओवरचार्ज झाली, तसेच शॉर्ट सर्किट किंवा या बॅटरीची क्वालिटी खराब असेल तर यामध्ये थर्मल रनअवे नावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीत बॅटरी अतिशय वेगाने गरम होते आणि धूर, आग किंवा ब्लास्टसारख्या घटना घडतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
सहसा विमान कंपन्या प्रवाशांना त्यांच्या चेक-इन सामानात पावर बँक ठेवण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे पावर बँक नेहमी तुमच्या हँड लगेजमध्ये ठेवा. जेणेकरून एखादी समस्या निर्माण झाली तर तुम्ही वेळीच परिस्थितीतीवर नियंत्रण मिळवू शकता आणि कोणतीही दुर्घटना घडणार नाही.
जर तुम्ही स्वस्त आणि सेफ्टी सर्टिफिकेशनशिवाय उपलब्ध असणाऱ्या पावर बँकचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. तुमच्या या चुकीमुळे तुम्हाला फार मोठं नुकसान होऊ शकतं. कारण स्वस्त आणि लो क्वालिटीचे पावर बँक लवकर गरम होतात आणि याचा ब्लास्ट होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे नेहमी केवळ विश्वसनीय शाओमी, सॅमसंग किंवा इतर विश्वसनीय कंपन्यांचे पावर बँक खरेदी करा.
काही लोकं विमानात फोन आणि पावर बँकचा सतत वापर करतात. यामुळे बॅटरी गरम होते आणि दुर्घटना घडण्याची शक्यता असते. गरज नसल्यास पावर बँक सुरक्षितपणे बॅगमध्ये ठेवा. तसेच गरज नसल्यास सतत फोन आणि पावर बँकचा वापर करू नका.
जर पावर बँक जास्त गरम झाला असेल, किंवा बॅटरी फुल्ल चार्ज असेल किंवा पावर बँकमधून जळण्याचा वास येत असेल तर त्याचा वापर करणं त्वरित बंद करा. अन्यथा पावर बँकमुळे विमानात मोठी दुर्घटना घडू शकते.
अनेक विमान कंपन्या 100Wh म्हणजेच 27,000 mAh क्षमता असलेले पावर बॅक हँड लगेजमध्ये ठेवण्याची परवानगी देतात. यापेक्षा जास्त क्षमतेचे पॉवर बँक सोबत बाळगल्यास सुरक्षा तपासणीत तपासणी होऊ शकते.






