Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 18 Pro आणि iPhone 17e मॉडेलचे डिझाईन कसं असणार? समोर आली माहिती, जाणून घ्या सविस्तर

आगामी आयफोनच्या लाँचिंगसाठी सर्वजण प्रचंड उत्सुक आहेत. आगामी आयफोनबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. आता पुन्हा आगामी आयफोन 18 सिरीजमधील प्रो मॉडेल्सबाबत काही माहिती समोर आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 28, 2025 | 01:40 PM
iPhone 18 Pro आणि iPhone 17e मॉडेलचे डिझाईन कसं असणार? समोर आली माहिती, जाणून घ्या सविस्तर

iPhone 18 Pro आणि iPhone 17e मॉडेलचे डिझाईन कसं असणार? समोर आली माहिती, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • iPhone 18 Pro मॉडेल्समध्ये मिळणार सॅटेलाइट 5G सपोर्ट
  • iPhone 18 Pro आणि iPhone 17e मॉडेलचे डिझाईन लीक
  • फेब्रुवारी-मार्चमध्ये iPhone 17e लाँच होण्याची शक्यता

अ‍ॅपलच्या आगामी आयफोन 18 सिरीजबद्दल चर्चा सुरु झाली आहे. ही आयफोन सिरीज 2026 मध्ये लाँच केली जाणार आहे. मात्र याबाबतचे अपडेट्स लीक होण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी आगामी आयफोन 18 सिरीजमधील प्रो मॉडेल्सबाबत एक मोठी अपडेट आली होती. असं सांगितलं जात आहे की, आयफोन 18 प्रो मॉडल्समध्ये सॅटेलाइट 5G सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय नवीन सिरीजमध्ये अ‍ॅपलच्या अ‍ॅडव्हांस A20/A20 Pro चिपसेटचा वापर केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

एलन मस्कचा नवा धमाका! Grokipedia च्या एंट्रीने वाढवली Wikipedia ची धाकधूक, टेक वर्ल्डमध्ये उडवली खळबळ

या सर्व अपडेट्सव्यतिरीक्त आता प्रो मॉडेलच्या डिझाईनबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रो मॉडेलचे डिझाईन कसे असणार, त्यामध्ये कोणता बदल केला जाणार आहे, याबाबत अपडेट्स लीक झाले आहेत. एवढंच नाही तर आयफोन 17e चे डिझाईन देखील लीक झाले आहेत. हे दोन्ही आयफोन येत्या वर्षात लाँच केले जाणार आहेत. (फोटो सौजन्य – X) 

कसे असणार आयफोन 18 प्रो मॉडेल्सचे डिझाइन?

डिजिटल चॅट स्टेशनने आयफोन 18 प्रो मॉडेल्स आणि आयफोन 17e बाबत माहिती दिली आहे. चाइनीज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये डिजिटल चॅट स्टेशनने सांगितलं आहे की, टेक जायंट कंपनीने 18 प्रो मॉडेल्सच्या डिझाईनमध्ये कोणताही बदल केला नाही. आगामी आयफोन सिरीजमधील प्रो मॉडेल्स 17 प्रो मॉडेल्सप्रमाणेच दिसणार आहेत. याचा अर्थ असा आहे की, अपकमिंग सीरीजमध्ये अ‍ॅपलचा मोठा हॉरिजेंटल कॅमेरा मॉड्यूल दिला जाण्याची शक्यता आहे. या लीकवर विश्वास ठेवणं यासाठी शक्य आहे कारण, अ‍ॅपलने आयफोन 17 प्रो मॉडेल्स नवीन डिझाइनसह लाँच केले आणि कंपनी काही वर्षे एकाच डिझाइनला चिकटून राहते. म्हणजेच कंपनी एकच डिझाईन त्यांच्या आगामी मॉडेल्समध्ये देखील देते.

भारतीय विद्यार्थ्यांचा ChatGPT वापर पाहून OpenAI सुद्धा झालं चकित! उघड झालं मोठं गुपित, चॅटबोटला विचारले जातात हे प्रश्न

iPhone 17e मध्ये मिळू शकते डायनामिक आयलँड

पुढील वर्षाच्या सुरुवातीला आयफोन 17 सिरीजमधील परवडणारे व्हेरिअंट 17e लाँच केले जाणार आहे. या आयफोनमध्ये डायनामिक आईलँड दिला जाण्याची शक्यता आहे. तथापी, या आयफोनच्या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट वाली प्रोमोशन टेक्नोलॉजी दिली जाणार नाही. मात्र डायनामिक आईलँडच्या रुपात ग्राहकांना कमी किंमतीत प्रो मॉडेलवाला एक फीचर मिळणार आहे. आयफोन 17e ला देखील लेटेस्ट लाइनअपच्या डिझाईन लँग्वेजसह लाँच केला जाणार आहे. यामध्ये डायनामिक आईलँडसह 6.1 इंचचा OLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. हा आयफोन पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये 60,000-65,0000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो.

Web Title: Iphone 18 pro and iphone 17e design details leak know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 01:40 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

एलन मस्कचा नवा धमाका! Grokipedia च्या एंट्रीने वाढवली Wikipedia ची धाकधूक, टेक वर्ल्डमध्ये उडवली खळबळ
1

एलन मस्कचा नवा धमाका! Grokipedia च्या एंट्रीने वाढवली Wikipedia ची धाकधूक, टेक वर्ल्डमध्ये उडवली खळबळ

Gmail Data Leak: 183 मिलियन ईमेल पासवर्ड्स लीक! हॅकर्सपासून कसं सुरक्षित ठेवाल तुमचं अकाऊंट? आत्ताच फॉलो करा या Tech Tips
2

Gmail Data Leak: 183 मिलियन ईमेल पासवर्ड्स लीक! हॅकर्सपासून कसं सुरक्षित ठेवाल तुमचं अकाऊंट? आत्ताच फॉलो करा या Tech Tips

Jio Recharge Plan: केवळ 198 रुपयांत मिळणार दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… जिओचा हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट
3

Jio Recharge Plan: केवळ 198 रुपयांत मिळणार दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… जिओचा हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट

Tech Tips: एकाचवेळी 4 डिव्हाईसवर वापरू शकता तुमचं WhatsApp अकाऊंट, 99% लोकांना माहिती नाही ही स्मार्ट ट्रिक
4

Tech Tips: एकाचवेळी 4 डिव्हाईसवर वापरू शकता तुमचं WhatsApp अकाऊंट, 99% लोकांना माहिती नाही ही स्मार्ट ट्रिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.