
iPhone Fold Leaks: लेट पण थेट! पहिल्या फोल्डेबल आयफोनमध्ये SIM स्लॉटच नसणार? कंपनी करणार हा महत्वाचा बदल
एक्सपर्ट्सने सांगितलं आहे की, हा रिपोर्ट योग्य असण्याची शक्यता आहे. कारण कंपनीने Phone 17 सीरीज ग्लोबली eSIM सह लाँच केली होती. त्यामुळे कंपनी त्यांच्या पहिल्या फोल्डेबल आयफोनमध्ये देखील हाच बदल करण्याची शक्यता आहे. चीनी टिपस्टर इंस्टेंट डिजिटलने वीबोवर सांगितलं आहे की, iPhone Fold कोणत्याही SIM कार्ड स्लॉटशिवाय लाँच केला जाऊ शकतो आणि हा आयफोन केवळ eSIM ला सपोर्ट करणार आहे. एवढच नाही या आगामी फोल्डबेल आयफोनचे अनेक फीचर्स लाँचपूर्वीच लीक झाले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
केवळ eSIM सपोर्टच नाही तर आगामी iPhone Fold बाबत इतर अनेक फीचर्स देखील समोर आले आहेत. असं सांगितलं जात आहे की, Apple चा हा फोल्डेबल डिव्हाईस कंपनीच्या सर्वात मोठ्या हार्डवेयर प्रोजेक्ट्सपैकी एक असल्याचे म्हटलं जात आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की, या आगामी डिव्हाईसमध्ये 5.5-इंचाचा एक्सटर्नल डिस्प्ले आणि 7.8-इंच फोल्डेबल इनर स्क्रीन दिली जाऊ शकते.
Apple घेऊन आली सर्वात भारी ऑफर! स्वस्तात खरेदी करा मॅकबुक आणि आयफोन, ग्राहकांचा होणार फायदा
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच हल्लीच्या अनेक फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये आढळणारी क्रीज संपवण्याचा पर्याय शोधला आहे. जर हा रिपोर्ट खरा असेल तर या स्पर्धेत आयफोन फोल्ड नक्कीच वेगळा ठरणार आहे. कारण फोनच्या स्क्रीनवर न दिसणारी क्रीजमुळे डिस्प्ले स्मूद आणि सीमलेस अनुभव ऑफर करतो. हा फोल्ड आयफोन आगामी आयफोन 18 सिरीजसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
Apple Fold मध्ये नेक्स्ट जेनरेशन A20 Pro चिप दिली जाण्याची शक्यता आहे, जी TSMC च्या नवीन 2nm प्रोसेसद्वारे तयार करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची सर्वात एफिशिएंट आणि पावरफुल मोबाइल प्रोसेसरपैकी एक आहे. फोनमध्ये सिलिकॉन-कार्बन बॅटरी देखील दिली जाण्याची शक्यता आहे. हे एक असं तंत्रज्ञान आहे जे वजन किंवा बल्क न वाढवता फोनमध्ये अधिक बॅटरी क्षमता प्रदान करू शकते. या डिव्हाईसमध्ये कंपनी 24-मेगापिक्सेलचा अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा देण्याची शक्यता आहे.
Ans: नवीन लीक्सनुसार Apple चा पहिला Foldable iPhone फक्त eSIM सपोर्टसह येऊ शकतो.
Ans: कंपनी डिझाइन स्लिम करणे, वॉटरप्रूफिंग वाढवणे आणि ग्लोबल eSIM ट्रान्सिशनकडे लक्ष देत आहे.
Ans: अंदाजानुसार मोठा OLED/AMOLED फोल्डेबल स्क्रीन आणि बाहेरील सेकंडरी डिस्प्ले मिळू शकतो.