Apple घेऊन आली सर्वात भारी ऑफर! स्वस्तात खरेदी करा मॅकबुक आणि आयफोन, ग्राहकांचा होणार फायदा
जर तुम्ही लेटेस्ट मॉडेल्सऐवजी जुने Apple डिव्हाईस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही असे डिव्हाईस Apple India साइटवर आधीपेक्षा कमी किंमतीत लिस्टेड असल्याचं पाहू शकणार आहात. Apple जेव्हा एखादे नवीन प्रोडक्ट लाँच करते तेव्हा कंपनी जुन्हा डिव्हाईसच्या किंमती कमी करते. ज्यामुळे ग्राहक ऑफर नसताना देखील Apple चे जुने प्रोडक्ट्स कमी किंमतीत खरेदी करू शकतात. एवढेच नाही तर, कंपनी Apple Watch खरेदीदारांना 3 महिन्यांचे मोफत Apple Music सबस्क्रिप्शन देत आहे. जर तुम्ही Apple.in वरून Apple डिव्हाइस खरेदी केले तर तुम्हाला 3 महिन्यांचे मोफत Apple TV सबस्क्रिप्शन देखील मिळेल. चला सर्व डील पाहूया.. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple ने भारतात हॉलिडे सीजन ऑफर्स सुरु केल्या आहेत. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना iPhone 17 सीरीज आणि MacBook Air M4 मॉडेलसह अनेक प्रोडक्ट्सवर कॅशबॅक आणि बँक डिस्काऊंट डील्स मिळणार आहे. 13-इंच MacBook Air M4 च्या खरेदीवर ग्राहकांना 10 हजार रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक मिळणार आहे. खरं तर हा लॅपटॉप 99,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता कॅशबॅक ऑफरनंतर या डिव्हाईसची किंमत 89,900 रुपये झाली आहे. ही ऑफर चेकआउटवेळी ऑटोमॅटिकली अप्लाय होते. कंपनीची ही ऑफर आयसीआयसीआय, अॅक्सिस आणि अमेरिकन एक्सप्रेस बँक कार्डसाठी व्हॅलिड असणार आहे.
Free Fire MAX: कसा बनला जगभरातील गेमर्सचा आवडता बॅटलरॉयल गेम? रोमांचक इतिहास माहिती आहे का?
अशीच ऑफर ग्राहकांना 14-इंच आणि 16-इंच MacBook Pro मॉडेलवर देखील मिळणार आहे. 14-इंच मॅकबुक प्रो एम 4 प्रो या डिव्हाईसची लाँच किंमत 1,69,900 रुपये होती. मात्र बँक ऑफरनंतर या डिव्हाईसची किंमत 1,59,900 रुपये झाली आहे. तसेच 16-इंच मॅकबुक प्रो एम 4 प्रो 2,49,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता कॅशबॅक ऑफरनंतर ग्राहक हे डिव्हाईस 2,39,900 रुपयांत खरेदी करू शकणार आहेत.
केवळ मॅकबूकच नाही तर कंपमी आयफोन 17 सिरीजच्या खरेदीवर देखील जबरदस्त डिस्काऊंट ऑफर करत आहे. जिथे तुम्हाला बँक कार्डने डिव्हाइस खरेदी केल्यावर 5 हजार रुपयांपर्यंत इन्स्टंट कॅशबॅक मिळू शकेल. मानक आयफोन 17 सध्या क्रोमा, अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि विजय सेल्स सारख्या प्लॅटफॉर्मवर स्टॉकबाहेर आहे. अशा परिस्थितीत Apple.in हा एक विश्वासार्ह पर्याय आहे. iPhone 17 Pro हे डिव्हाईस 1,34,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र बँक ऑफर्सनंतर या डिव्हाईसची किंमत कमी झाली आहे. कंपनी ICICI, अमेरिकन एक्सप्रेस आणि अॅक्सिस कार्ड यूजर्ससाठी 5,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक देत आहे, तर आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लसवर 4 हजार रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक ऑफर मिळत आहे.
Ans: नाही, Apple प्रॉडक्टवर ऑफर घेतली तरी 1 वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी तशीच मिळते.
Ans: काहीवेळा AppleCare+ वरही छोटासा डिस्काउंट किंवा बंडल ऑफर मिळते, पण हे क्वचितच असते.
Ans: साधारणतः मागील वर्षाचा फ्लॅगशिप मॉडेल (उदा. iPhone 14/15) ऑफरमध्ये सर्वात जास्त सूट मिळवतो.






