Flipkart-Amazon Sale 2025: ही संधी चुकली तर पश्चाताप कराल! Smart TV च्या खरेदीवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध, मोठ्या ब्रँड्सचा समावेश
या यादीमध्ये सर्वात पहिलं नावं मोटोरोला स्मार्ट टिव्हीचं आहे. हा 65 इंच QLED अल्ट्रा HD 4K स्मार्ट टिव्ही आहे. या टिव्हीची किंमत 88,399 रुपये आहे. फ्लिपकार्ट बाय बाय सेलमध्ये हा स्मार्ट टिव्ही 40,499 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय या डिलमध्ये काही खास बँक ऑफर्सचा देखील समावेश करण्यात आला आहे. HDFC बँक क्रेडिट कार्ड ईएमआय ऑप्शनसह टिव्हीवर 1250 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जात आहे. तसेच ग्राहक त्यांचा जुना टिव्ही एक्सचेंज करून 6650 पर्यंत एक्सचेंज वॅल्यू मिळवू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
टीसीएलचा हा 65 इंच स्मार्ट टिव्ही सध्या अॅमेझॉनवर 62 टक्के फ्लॅट डिस्काऊंटसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. फ्लॅट डिस्काऊंटनंतर या स्मार्ट टिव्हीची किंमत 46,990 रुपये झाली आहे. एवढंच नाही तर कंपनी या स्मार्ट टिव्हीच्या खरेदीवर काही बँक ऑफर्स देखील देत आहे. ज्यामध्ये निवडक बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 1 हजार रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जाणार आहे. तर अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायासह 1250 रुपयांची सूट दिली जात आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायासह स्मार्ट टिव्हीच्या खरेदीवर 1500 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे.
या यादीमध्ये तिसरा टिव्ही रियलमी कंपनीचा आहे. हा टिव्ही फ्लिपकार्टवर आता 38,499 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. या टिव्हीवर फ्लॅट 55 टक्के डिस्काऊंट ऑफर केले जात आहे. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, एसबीआय क्रेडिट कार्ड आणि एसबीआय क्रेडिट कार्ड EMI पर्यायासह या टीव्हीवर 1 हजार रुपयांची सूट उपलब्ध आहे, तर एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड ईएमआयपर्यायासह या टीव्हीवर 1250 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे.
जर तुम्हाला सोनी ब्रँडसारखा प्रिमियम स्मार्ट टिव्ही खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही सोनी ब्राव्हिया 2 स्मार्ट टिव्हीची निवड करू शकता. या टिव्हीवर 39 टक्के डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ज्यामुळे या टिव्हीची किंमत 77,990 रुपये झाली आहे. कंपनी सर्व बँकांच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि UPI द्वारे केलेल्या पेमेंटवर 3 हजार रुपयांची अतिरिक्त सूट देत आहे, ज्यामुळे ही एक उत्तम ऑफर आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये, कंपनी 12,650 रुपयांपर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू आणि 6000 रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्सचेंज बोनस देखील देत आहे.
Ans: दोन्ही प्लॅटफॉर्मवर फेस्टिवल सेल, Big Billion Days, Great Indian Festival, Summer Sale, Republic Day Sale, तसेच Payday Sale मध्ये सर्वात मोठ्या ऑफर्स येतात.
Ans: हे ब्रँड आणि मॉडेलनुसार बदलते. काहीवेळा Flipkart वर स्मार्टफोन्सवर जास्त सूट मिळते, तर Amazon वर इलेक्ट्रॉनिक्स किंवा स्मार्टवॉचेसवर चांगले डील मिळतात.
Ans: सेल दरम्यान Flipkart–Amazon बँक पार्टनरशिप करतात. तुम्ही ज्या बँकेचा क्रेडिट/डेबिट कार्ड वापरता त्या बँकेचा Instant Discount, EMI Offer, किंवा Cashback लागू होतो.






