नव्या अवतारात iQOO 13 लाँच, 50MP चे तीन कॅमेरे आणि 6000mAh बॅटरी... किती आहे किंमत?
iQOO ने नवीन लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन iQOO 13 नव्या कलर व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन डिसेंबर 2024 मध्ये लाँच करण्यात आला होता. आता या स्मार्टफोनचा नवीन व्हेरिअंट लाँच करण्यात आला आहे. नवीन रंग अधिक आकर्षक आहे, जो पाहता क्षणी अगदी कोणीही स्मार्टफोनच्या प्रेमात पडू शकते. डिसेंबर 2024 मध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनचा नवा व्हेरिअंट आता मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे.
Price Dropped: डिल मिस करू नका! 1.29 लाखांचा Samsung फोन झाला स्वस्त, असा घ्या सुवर्णसंधीचा फायदा
स्मार्टफोनचा रंग ग्रीन आहे. लेटेस्ट ग्रीन कलर ऑप्शन युजर्ससाठी फारच आकर्षक ठरत आहे. स्मार्टफोनच्या डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन ग्रीन कलर व्हेरिअंट स्मार्टफोन प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत 50 हजार रुपयांहून अधिक आहे. चला तर मग स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
iQOO 13 स्मार्टफोन नव्या ग्रीन कलर व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याची विक्री 4 जुलैपासून सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवरून खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनचा बेस व्हेरिअंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 54,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. तर या स्मार्टफोनचा टॉप व्हेरिअंट 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह 59,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.
iQOO 13 Special Edition (likely in Green) is coming to India 🇮🇳 pic.twitter.com/nouU0Gyk38
— Dhiraj Kumar🌐 (@ByteBlaze1) June 30, 2025
iQOO 13 स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 8 Elite चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये गेमिंग परफॉर्मेंस बूस्ट करण्यासाठी कंपनीने वेगळा Q2 चिप देखील दिला आहे. या फोनमध्ये 2K रेजोल्यूशन वाला 6.82-इंच 2K LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 144fps गेमिंग सपोर्टसह येतो. या स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 144Hz आणि पीक ब्राइटनेस 1800 निट्स आहे.
या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. यासोबतच थर्मल मॅनेजमेंटसाठी फोनमध्ये कूलिंगसाठी 7000 स्क्वायर एमएमचा वेपोर चेंबर सिस्टम देखील देण्यात आला आहे.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर iQOO 13 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल Sony IMX921 सेंसर आहे, ज्याच्यासोबत 50-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड लेंस आणि 50-मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे, जो 2x ऑप्टिकल जूम सपोर्ट आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.