Price Dropped: डिल मिस करू नका! 1.29 लाखांचा Samsung फोन झाला स्वस्त, असा घ्या सुवर्णसंधीचा फायदा
पुढील महिन्यात सॅमसंगचा Samsung Unpacked 2025 ईव्हेंट आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी अनेक नवीन डिव्हाईस लाँच करणार आहे. मात्र या ईव्हेंटपूर्वी कंपनीचा प्रिमियम स्मार्टफोन डिस्काऊंट आणि ऑफरसह खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. Samsung Galaxy S24 Ultra 5G स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत ऑफर केला जात आहे. फ्लिपकार्ट या डिव्हाईसवर जबरदस्त डील ऑफर करत आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना फ्लॅट आणि बँक डिस्काउंट ऑफर करत आहे.
जर तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल किंना जुना फोन अपग्रेड करायचा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 1,29,999 रुपयांना लाँच केला होता, मात्र आता या स्मार्टफोनवर डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. आता ग्राहकांना हा स्मार्टफोन 83 हजार रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Samsung)
फ्लिपकार्ट Samsung Galaxy s24 Ultra च्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर करत आहे. स्मार्टफोनचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंट 83,580 रुपयांत खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. म्हणजेच या स्मार्टफोनवर 46000 रुपयांहून अधिक डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. याशिवाय, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरण्यावर 4000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट देखील देत आहे, ज्यामुळे फोनची किंमत 80,000 रुपयांपेक्षा कमी होते.
याशिवाय, तुम्ही हा फोन नो कॉस्ट ईएमआय पर्यायासह देखील खरेदी करू शकता. फोनवर एक विशेष एक्सचेंज डिस्काऊंट देखील उपलब्ध आहे, जिथून तुम्ही तुमचे जुने डिव्हाइस एक्सचेंज करून स्मार्टफोनच्या खरेदीवर आणखी बचत करू शकता. एक्सचेंज डिस्काऊंट पूर्णपणे तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल, म्हणजेच तुमच्या फोनची स्थिती जितकी चांगली असेल तितके तुम्हाला जास्त एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकेल.
सॅमसंगच्या या डिव्हाईसमध्ये 6.8 इंच AMOLED LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच 12GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज ऑप्शन मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. डिव्हाईसमध्ये One UI 7 मिळणार आहे.
कॅमेराच्या बाबतीतही हा फोन खूपच प्रभावी आहे. यात 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर, 50 मेगापिक्सेलचा मॅक्रो लेन्स आणि 3X झूमसह 10 मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी या डिव्हाइसमध्ये 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.