
वीज गेल्यावर इन्व्हर्टरवर इलेक्ट्रिक इंडक्शन चालवणं सुरक्षित आहे का? अनेकांना माहिती नाही हे सत्य
हाय पाॅवर डिव्हाईस
हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, इंडक्शन हे एक हाय पाॅवर उपकरण आहे. यात साधारणपणे १,२०० वॅट ते २,५०० वॅट वीजेची गरज लागते. पण घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामान्य इन्व्हर्टरची क्षमता तुलनेने फारच कमी असते. यावर आपण घरातील लाईट्स, पंखा यासारख्या कमी पाॅवरच्या उपकरणांचा वापर करु शकतो पण हाय पाॅवरसाठी ओळखल्या जाणाऱ्या इंडक्शन स्टोव्हचा मात्र यावर वापर करता येत नाही. असे केल्यास इनव्हरर्टरवर भार येऊ शकतो.
तज्ज्ञांचा सल्ला
याची माहिती सांगताना तज्ञ म्हणतात की, जर तुमच्याकडे 2kVA किंवा त्याहून अधिक क्षमतेचा इन्व्हर्टर आणि शक्तीशाली बॅटरी सेटअप असेल तर तुम्ही मर्यादित काळासाठी यावर पॉवर मोडमध्ये इंडक्शनचा वापर करु शकता पण याचा जर तुम्ही दिर्घकाळा वापर केला तर तुमच्या इनव्हर्टरची बॅटरी लवकर संपू शकते. याचा परिणाम इन्व्हर्टरच्या बॅटरी लाईफवर होऊ शकतो. शिवाय यामुळे इन्व्हर्टर ट्रिप देखील करु शकतो. हे तेव्हा घडते जेव्हा इन्व्हर्टर जास्त गरम होतो आणि त्याच्यावर जास्त लोड येतो. असे केल्याने तुमच्या इनव्हेर्टरचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते. एकंदरीत, योग्य क्षमतेशिवाय इन्व्हर्टरवर इंडक्शन स्टोव्ह चालवणे धोकादायक ठरू शकते.
AirPods Hidden Use: फक्त गाणीच नाही! अॅपल एअरपॉड्स करू शकतात ही कामं, वाचूम तुम्हीही व्हाल हैराण
इन्व्हर्टरची क्षमता ओळखा
इंडक्शन स्टोव्ह इन्व्हर्टरवर काही वेळ चालवता येऊ शकतो. पण यासाठी तुमच्या इन्व्हर्टरवरची क्षमता अधिक असायला हवी. जर तुमच्याकडे सामान्य पाॅवरचा इन्व्हर्टर असेल तर त्यावर इंडक्शनचा वापर करणे चुकीचे ठरु शकते. यामुळे इंडक्शन फार काळ तर तुम्हाला चालवता येणार नाहीच शिवाय तुमच्या इन्व्हर्टरच्या लाईफवरही याचा परिणाम होईल आणि तो लवकर खराब होईल.