AirPods Hidden Use: फक्त गाणीच नाही! अॅपल एअरपॉड्स करू शकतात ही कामं, वाचूम तुम्हीही व्हाल हैराण
लाईव्ह लिसन हे एक फायदेशीर ॲक्सेसिबिलिटी फीचर आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयफोन किंवा आयपॅडचा माइक्रोफोनप्रमाणे वापर करू शकता. तुम्ही गोंगाटाच्या वातावरणात असाल आणि समोरील व्यक्तीचे बोलणे तुम्हाला ऐकू येत नसेल तर अशावेळी तुम्ही या फीचरचा वापर करू शकणार आहात. हे फीचर ऑन केल्यानंतर तुम्ही अगदी सहज समजू शकता की समोरील व्यक्ती काय बोलत आहे. यासाठी तुम्हाला आयफोन समोरील व्यक्तीकडे द्यावा लागणार आहे आणि एअरपॉड्स तुमच्याकडे ठेवावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला समोरील व्यक्तीचे बोलणं अगदी स्पष्टपणे ऐकू येणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
टेक कंपनीने आयओएस 26 सह लाईव्ह ट्रांसलेशन फीचर सादर केले होते. कंपनीने सादर केलेले हे फीचर H2 चिप वाल्या एयरपॉड्समध्ये उपलब्ध आहे. हे फीचर ऑन केल्यानंतर तुम्हाला दोन्ही एअरपॉड्सची दांडी दाबून ठेवावी लागणार आहे. यानंतर एयरपॉड्स संभाषण लाईव्ह ट्रांसलेट करणार आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या फोनद्वारे देखील दुसऱ्या व्यक्तिला त्याच्या भाषेत सांगू शकता की तुम्हाला काय बोलायचं आहे. हे फीचर इंग्लिश, फ्रेंच, जर्मनी, इटैलियन आणि स्पॅनिशसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.
अॅपलने एयरपॉड्स प्रो 3 मध्ये हार्ट-रेट सेंसर जोडले होते, ज्याच्या मदतीने तुम्ही केवळ तुमचा वर्कआउट डेटा ट्रॅक करू शकता. जेव्हा तुम्ही रनिंग करायला जाता, त्यावेळी तुमचा आयफोन मार्ग ट्रॅक करणार आहे, तर एयरपॉड्स हार्ट-रेटवर नजर ठेवणार आहेत. अशा पद्धतीने तुम्ही अॅपल वॉचचा वापर न करता देखील धावताना किती कॅलरीज बर्न झाल्या आणि तुमच्या हृदयाची गती किती आहे हे ट्रॅक करू शकता.
Android यूजर्स सावधान! या स्मार्टफोन्सवर लवकरच बंद होणार WhatsApp! आत्ताच करा हे काम
जर तुम्ही कॉन्सर्ट किंवा एखाद्या अशा ठिकाणी जात असाल जिथे खूप गोंधळ आणि आवाज आहे, तर काहीवेळातच तुमचे कामन दुखू लागतात. अशा परिस्थितीत एयरपॉड्स तुमची मदत करू शकता. गोंधळाच्या ठिकाणी एयरपॉड्स तुमच्या कानांची सुरक्षा करतात आणि तुम्हाला यावेळी गाणी ऐकण्याची देखील मजा येईल. यासाठी एअरपॉड्स प्रो 2, एअरपॉड्स प्रो 3, आणि एअरपॉड्स मॅक्स 2 मध्ये अॅडॅप्टिव्ह ट्रान्सपरन्सी ऑन करा. या फीचरमुळे, एअरपॉड्स आजूबाजूचा आवाज कमी करतात आणि तुम्ही तुमच्या कानांना कोणताही त्रास न होता लाईव्ह म्युझिकचा आनंद घेऊ शकता.






