Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sora अ‍ॅप बंद होणार? OpenAI चा व्हिडीओ जनरेशन प्लॅटफॉर्मबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

तुम्ही देखील व्हिडीओ जनरेशन प्लॅटफॉर्म सोरा अ‍ॅपचा वापर करता का? तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. कंपनीने सोरा अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एक्सवर पोस्ट देखील करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 27, 2026 | 12:48 PM
Sora अ‍ॅप बंद होणार? OpenAI चा व्हिडीओ जनरेशन प्लॅटफॉर्मबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

Sora अ‍ॅप बंद होणार? OpenAI चा व्हिडीओ जनरेशन प्लॅटफॉर्मबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • व्हिडीओ बनवणाऱ्या Sora अ‍ॅपवर बंदीची घंटा; OpenAI कडून मोठी घोषणा
  • Sora अ‍ॅप बंद होणार, पण AI मॉडेल सुरूच राहणार; OpenAI ने दिली मोठी अपडेट
  • ChatGPT मध्ये फीचर्स येण्याच्या चर्चेतच OpenAI ने Sora अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय घेतला
टेक कंपनी ओपनएआयने मंगळवारी लोकप्रिय Sora अ‍ॅप बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनीने सोरा अ‍ॅप बंद केल्यानंतर याचा परिणाम मोबाईल अ‍ॅप आणि अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) दोन्हीवर होणार आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील या आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्षेत्रातील दिग्गज कंपनीने सोरा अ‍ॅप बंद करण्याचे कोणतेही कारण अधिकृतपणे जाहीर केले नाही. तसेच हे अ‍ॅप कधीपासून बंद केले जाणार आहे, याबाबत देखील कोणतीही माहिती देण्यात आली नाही. सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे अ‍ॅप बंद करण्याची घोषणा अशावेळी करण्यात आली आहे, जेव्हा अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की, कंपनी सोरा अ‍ॅपचे वैशिष्ट्ये चॅटजीपीटीमध्ये इंटीग्रेट करणार आहे. कंपनी येत्या काही दिवसांमध्ये या घोषणेबाबत अधिक माहिती शेअर करणार आहे.

OpenAI चा मोठा धमाका! GPT-5.4 लाँच; आता AI स्वतः संगणक चालवणार, फोन आणि वेबवर सपोर्ट

OpenAI ने घेतला सोरा अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय

सोराच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये AI-पावर्ड व्हिडीओ जनरेशन प्लॅटफॉर्म बंद करण्याची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ‘आम्ही सोरा ॲपला निरोप देत आहोत. ज्यांनी सोरा वापरून व्हिडीओ बनवले आहेत, ते शेअर केले आणि त्याभोवती एक समुदाय तयार केला, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. तुम्ही सोरा वापरून जे काही तयार केले ते महत्त्वाचे होते, आणि आम्हाला माहित आहे की ही बातमी निराशाजनक आहे. आम्ही लवकरच अधिक माहिती देऊ, ज्यामध्ये ॲप आणि API साठीची कालमर्यादा आणि तुमचे काम जतन करण्याच्या तपशिलांचा समावेश असेल.’ (फोटो सौजन्य – Pinterest)

We’re saying goodbye to the Sora app. To everyone who created with Sora, shared it, and built community around it: thank you. What you made with Sora mattered, and we know this news is disappointing. We’ll share more soon, including timelines for the app and API and details on… — Sora (@soraofficialapp) March 24, 2026

पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे यूजर्सनी जे व्हिडीओ सोरा अ‍ॅपच्या मदतीने तयार केले आहेत, असे व्हिडीओ सुरक्षित ठेवण्याची पद्धत देखील कंपनी यूजर्ससोबत शेअर करणार आहे. यामुळे प्लॅटफॉर्म बंद झाले तरी देखील यूजर्सकडे त्यांनी तयार केलेले व्हिडीओ सुरक्षित राहतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने सोरा अ‍ॅप आणि एपीआय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोरा एआय मॉडेलवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. हे AI मॉडेल टेक्स्ट प्रॉम्प्ट आणि फोटोपासून व्हिडीओ तयार करण्यामागील तंत्रज्ञानाचे मूळ आहे.

Vivo ने केला धमाका! Y स्मार्टफोन सीरीजची भारतात धुरंधर एंट्री, 6,500mAh बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेमुळे वाढली उत्सुकता

गेल्या काही दिवसांपासून अशा चर्चा सुरु होत्या की, ओपनएआय सोराच्या व्हिडिओ बनवण्याच्या क्षमता चॅटजीपीटीमध्ये जोडण्याचा विचार करत आहे. मात्र अशातच आता सोरा अ‍ॅप आणि एपीआय बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सोरा अ‍ॅप बंद करण्यामागील कारण अद्याप सांगितलं नाही. एका निवेदनात, ओपनएआयने म्हटले आहे की, आता कंपनी रोबोटिक्सला प्रगत करण्यासाठी जागतिक सिम्युलेशन संशोधनावर आपले लक्ष केंद्रित करत आहे. जसजसे आम्ही AGI (आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स) रोडमॅपवर आणि एजेंटिक AI क्षमता प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या कंप्यूटिंग संसाधनांवर लक्ष केंद्रित करत अहोत, त्याच पद्धतीने आम्ही सोराला ग्राहक ॲप आणि API म्हणून समर्थन देणे थांबवण्याचा कठीण निर्णय घेत आहोत.

Web Title: Is openai planning to shut down video generation platform sora know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • openai
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे
1

Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे

Tech Tips: अचानक हँग होतोय स्मार्टफोन? ही असू शकतात कारणं… जाणून घ्या सविस्तर
2

Tech Tips: अचानक हँग होतोय स्मार्टफोन? ही असू शकतात कारणं… जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: अँड्रॉईडमध्ये Battery Saver ऑन करताच फोनमध्ये काय बदल होतो? चुकीच्या वापरामुळे परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम
3

Tech Tips: अँड्रॉईडमध्ये Battery Saver ऑन करताच फोनमध्ये काय बदल होतो? चुकीच्या वापरामुळे परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम

Aadhaar Update: एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही! घरबसल्या आधार कार्डसोबत लिंक करा ई-मेल; फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस
4

Aadhaar Update: एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही! घरबसल्या आधार कार्डसोबत लिंक करा ई-मेल; फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.