Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमचे WhatsApp अकाऊंट दुसरे कोणीतरी चालवत नाहीये ना? ताबडतोब तपासा आणि सेटिंग्ज बदला

कोणत्याही व्हॉट्सअॅप अकाउंटवर अनऑथराइज्ड एक्सेस अनेक प्रकारे केला जाऊ शकतो, जो गोपनीयतेसाठी गंभीर धोका असू शकतो. अश्यातच आता डिवाइस तपासण्याचा आणि काढून टाकण्याचा एक सोपा मार्ग मिळाला आहे. चला जाणून घेऊयात

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 12, 2025 | 01:32 PM
WHATSAPP (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)

WHATSAPP (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)

Follow Us
Close
Follow Us:

WhatsApp, हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. WhatsApp हा खाजगी चॅट, कॉल आणि महत्त्वाच्या संभाषणांसाठी वापरले जाते. कंपनी वापरकर्त्यांच्या सहभागासाठी अपडेट्स आणत राहते. त्याच्या लोकप्रियतेमुळे, गुन्हेगार देखील अ‍ॅप लक्ष ठेवतात. कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर अनऑथराइज्ड एक्सेस अनेक प्रकारे केला जाऊ शकतो, जो गोपनीयतेसाठी गंभीर धोका असू शकतो.

हे आहेत जगातील सर्वाधिक मोबाईल युजर्स असलेले टॉप 10 देश! भारत कितव्या क्रमांकावर?

मेटा (WhatsApp ची मूळ कंपनी) मेसेज आणि कॉलसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन देते, परंतु हॅकर्स किंवा अनधिकृत वापरकर्ते कधीकधी तुम्हाला फसवून तुमचे खाते अॅक्सेस करू शकतात. अश्यातच आता आपला डिवाइस तपासण्याचा आणि काढून टाकण्याचा एक सोपा मार्ग मिळाला आहे. चला जाणून घेऊयात

असा करा चेक….

तुमचे व्हॉट्सअ‍ॅप कोणीतरी वापरत आहे का हे तपासण्यासाठी कोणत्याही थर्ड-पार्टी अ‍ॅपची आवश्यकता नाही. व्हॉट्सअ‍ॅपचे इनबिल्ट लिंक्ड डिव्हाइसेस फीचर तुम्हाला तुमचे अकाउंट लिंक केलेले आणि सक्रिय असलेले सर्व डिव्हाइसेस दाखवते. जर कोणतेही अज्ञात डिव्हाइस दिसले तर तुम्ही ते ताबडतोब काढून टाकू शकता. तथापि, लक्षात ठेवा की लिंक्ड डिव्हाइसेस फीचरद्वारे फक्त तेच डिव्हाइसेस येथे दाखवले जातील जे दुसऱ्या डिव्हाइसवर सक्रिय आहेत. जर सिम स्वॅपिंग किंवा सोशल इंजिनिअरिंगसारख्या इतर कोणत्याही पद्धतीने डिव्हाइस अॅक्सेस केले गेले असेल तर ही पद्धत काम करणार नाही.

WhatsApp वरून अज्ञात डिव्हाइस असे चेक किंवा काढा

तुमच्या स्मार्टफोनवर WhatsApp उघडा.
वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन-बिंदू मेनूवर टॅप करा.
मेनूमधून लिंक्ड डिव्हाइस निवडा.
तुमच्या WhatsApp खात्यात लॉग इन केलेल्या डिव्हाइसची यादी दिसेल.
यामध्ये Android, Windows किंवा ब्राउझर सत्रांची माहिती असेल.
जर एखादे अज्ञात डिव्हाइस दिसले, तर त्यावर टॅप करा आणि ते सूचीमधून काढून टाका.

हे फीचर का महत्त्वाचे आहे?

WhatsApp लिंक्ड डिव्हाइसेस फीचर देते, जे वापरकर्त्यांना एकाच वेळी अनेक डिव्हाइसेसवर अकाउंट वापरण्याची परवानगी देते. हे फीचर उपयुक्त आहे, परंतु याचा अर्थ असा की जर एखाद्याला अनधिकृत प्रवेश मिळाला तर ते तुमच्या नकळत तुमचे व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकतात. लिंक्ड डिव्हाइसेस विभाग नियमितपणे तपासून तुम्ही तुमचे अकाउंट सुरक्षित ठेवू शकता.

WhatsApp वर सुरक्षित कसे राहायचे?

तुमचे WhatsApp खाते अधिक सुरक्षित करण्यासाठी:
WhatsApp सेटिंग्जमध्ये टू-फैक्टर ऑथेंटिकेशन इनेबल करा.
तुमचा OTP कधीही कोणाशीही शेअर करू नका.
तुम्ही आता वापरत नसलेल्या डिव्हाइसेसमधून लॉग आउट करा.
हे अनधिकृत प्रवेश रोखण्यास आणि तुमच्या चॅट्स खाजगी ठेवण्यास मदत करतील.

Amazon Prime Savings: स्मार्ट टीव्हीची किंमत ११ हजारांपासून सुरु, जाणून घ्या बेस्ट डील

Web Title: Is someone else running your whatsapp account check and change the settings immediately

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 01:05 PM

Topics:  

  • TECH TIPS
  • technology news
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
2

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश
3

ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा! सरकारने दिली चेतावणी, कारण वाचून उडतील तुमचे होश

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम
4

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.