हे आहेत जगातील सर्वाधिक मोबाईल युजर्स असलेले टॉप 10 देश! भारत कितव्या क्रमांकावर?
आपण आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी मोबाईलचा वापर करतो. फोटोग्राफी, कॉलिंग, मेसेजिंग, तर कधी गुगलवर सर्च करण्यासाठी आपण स्मार्टफोनचा वापर करतो. याशिवाय स्मार्टफोनवरील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. जगातील प्रत्येक देशात करोडो मोबाईल युजर्स आहेत. या मोबाईल युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चला तर मग जाणून घेऊया, जगातील सर्वाधिक मोबाईल युजर्स कोणत्या देशात आहेत. या यादीमध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे, जाणून घेऊया.
चीन जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. याशिवाय या देशात मोबाईल युजर्सची संख्या सर्वात जास्त आहे. येथे, शहरांपासून ते खेड्यांपर्यंत सर्वत्र मोबाईलचा वापर अगदी सामान्य आहे. चीनमधील सर्वात मोठी मोबाईल सेवा कंपनी चायना मोबाईल आहे, ज्याचे कोट्यवधी युजर्स आहेत. म्हणजेच चीन केवळ लोकसंख्येतच नाही तर मोबाईल युजर्सच्या संख्येत देखील अव्वल स्थानावर आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मोबाईल युजर्सच्या बाबातीत भारत देखील सर्वात पुढ आहे. भारतात मोबाईलची प्रचंड क्रेझ आहे. इथे गाव असो किंवा शहर, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मोबाईल युजर्स पाहायला मिळणार आहेत. पण प्रत्येकाकडे स्मार्टफोन असेलच असं नाही. भारतातील बहुतेक लोकं फीचर फोनचा देखील वापर करतात. व्होडाफोन आयडिया, जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या म्हणून ओळखल्या जातात.
अमेरिकेत देखील बहुतेक लोकं मोबाईलचा वापर करतात. टेक्नोलॉजीच्या बाबतीत हा देश इतरांपेक्षा पुढारलेला आहे. म्हणूनच येथे मोबाईल आणि इंटरनेट दोन्हीचा वापर जास्त होतो.
दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा देश ब्राझीलमध्ये देखील मोबाईल युजर्सची संख्या खूप जास्त आहे. इथे लोकं अँड्रॉईड स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर करतात. विवो नावाची कंपनी येथे सर्वात मोठी दूरसंचार सेवा प्रदान करते.
रशियामध्ये देखील मोबाईलची प्रचंड क्रेझ आहे. येथील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये MTS, Beeline आणि MegaFon यांचा समावेश आहे.
IRCTC बंद करणार या युजर्सचे अकाऊंट; पुढचा नंबर तुमचा तर नाही ना… तात्काळ करा हे काम
स्मार्टफोन किंवा मोबाईल फोन एक असं डिव्हाईस आहे, ज्याच्या मदतीने आपण अगदी कमी वेळात आपली कामं पूर्ण करू शकतो. फोटोग्राफी असो किंवा कॉलिंग, चॅटिंग असो किंवा ऑनलाईन पेमेंट, हल्ली प्रत्येक गोष्ट स्मार्टफोनच्या मदतीने अगदी सहज पूर्ण केली जाऊ शकते. याच कारणामुळे मोबाईल युजर्सच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.