तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित
हल्ली लोकं सुट्ट्या पैशांची कटकट नको म्हणून ऑनलाईन पेमेंटचा वापर करतात. ऑनलाईन पेमेंटसाठी वापरलं जाणारं सर्वात लोकप्रिय ॲप म्हणजेच गुगल पे. गुगल पेच्या मदतीने तुम्ही अगदी कोणत्याही व्यक्तीला पेमेंट करू शकतात. गूगल पे भारतात प्रचंड लोकप्रिय असं ऑनलाईन डिजिटल पेमेंट ॲप आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मचे करोडो युअर्स आहेत.
UPI च्या मदतीने पैसे पाठवण्यासाठी, रिसिव्ह करण्यासाठी, बिल भरण्यासाठी, मोबाईल रिचार्ज करण्यासाठी आणि अशी अनेक वेगवेगळी पेमेंट करण्यासाठी गुगल पेचा वापर केला जातो. ऑनलाईन पेमेंट करण्याची सिंपल, फास्ट आणि सिक्योर प्रोसेस म्हणजेच गुगल पे असा अनेक युजर्सचा विश्वास आहे. तुम्ही देखील गुगल पेचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. गुगल पेमध्ये केवळ पेमेंटच करता येत नाहीत तर गुगल पेमधे इतर अनेक फीचर्स उपलब्ध आहेत, ज्याबद्दल युजर्सना माहितच नाही. आता आम्ही तुम्हाला अशाच काही फेचर्सबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – Pinterest)
गुगल पेमध्ये मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह बिल स्प्लिट करण्यासाठी इनबिल्ट फीचर देण्यात आलं आहे. तुम्ही एक ग्रुप तयार करू शकता आणि लोकांना ॲड करू शकता, यामध्ये ॲप स्वतः ट्रॅक करणे आहे की कोणी पेमेंट केला आहे आणि कोणी नाही केला. यामुळे तुम्हाला New Payment > New Group वर टॅप करा आणि लोकांना ॲड करा.
प्रत्येक पेमेंटवर गुगल पे रिवार्ड देत नाही, मात्र काही ट्रान्सेक्शनवर काही युनिक स्क्रॅच कार्ड मिळतात. जेव्हा तुम्ही मोबाईल रिचार्ज किंवा विजेचे बिल भरता तेव्हा स्क्रॅच कार्ड मिळतात. या स्क्रॅच कार्डमधून पार्टनर ब्रांड्सचे डिस्काउंट कूपन मिळतात. रिवार्ड सेक्शनमधून तुम्ही हे स्क्रॅच कार्ड क्लेम करू शकतात.
जर तुम्हाला तुमच्या आवडत्या सब्सक्रिप्शन्सच्या तारखा लक्षात ठेवण्यात अडचण येतेय का? तर गुगल पे तुम्हाला आटोपे फीचर देखील ऑफर करते. यामध्ये JioCinema, Netflix, Spotify, YouTube Premium, Google One Cloud आणि अनेक मोठे ॲप सपोर्ट आहे. यासाठी तुम्हाला केवळ सेटिंगमध्ये जाऊन ऑटो पे फीचर चालू करू शकता.
WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
गुगल पेमधून तुम्ही तुमचे बँक अकाउंट लिंक करून बॅलन्स तपासू शकता. यासाठी तुम्हाला बँकिंग ॲप किंवा वेबसाइटवर लॉगिन करण्याची गरज नाही. हे एक छोटे फीचर आहे, मात्र हे फिचर अत्यंत कामाचं आहे. तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन View Account Balance वर टॅप करावं लागणार आहे. पिन एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचा बँक बॅलन्स दिसणार आहे.
आपण अनेकदा विसरतो की आपण कोणाला पेमेंट केला आहे. मात्र यासाठीच आता गुगल पे कस्टम नोट्स किंवा लेबल फीचर ऑफर करते. हे बजेटिंग, कर किंवा व्यवसाय परतफेडीसाठी खूप उपयुक्त आहे. पैसे पाठवण्यापूर्वी तुम्ही साधा मजकूर किंवा इमोजी देखील जोडू शकता.