Free Fire Max: यूनिक Gloo Wall Skin फ्रीमध्ये मिळवण्याची हीच योग्य संधी, नवीन कोड्स क्लेम करताच मिळणार भरगोस रिवॉर्ड्स
गेम डेवलपर कंपनी गरेना पुन्हा एकदा त्यांच्या फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स घेऊन आली आहे. गरेनाने जारी केलेले रिडीम कोड्स म्हणजे प्लेअर्सना फ्री फायरमधील इन गेम आयटम्स जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. ज्या प्लेअर्सना डायमंड खर्च करून इन गेम आयटम्स खरेदी करणं शक्य नसतं किंवा ज्या प्लेअर्सना डायमंड खरेदी करणंं देखील शक्य नसतं, अशा प्लेअर्ससाठी गेम डेवलपर कंपनी गरेना रोज रेडिम कोड्स जारी करत असते. या रिडीम कोड्समध्ये प्लेअर्सना आकर्षित रिवॉर्ड्स मिळतात. या रिवॉर्ड्ससाठी कोणतेही डायमंड देखील खर्च करण्याची गरज नसते.
गरेना प्रत्येक प्रदेशासाठी मर्यादित काळासाठी रिडीम कोड्स जारी करत असते. हे कोड्स 12 ते 16 अंकी असतात. या कोड्सच्या मदतीने प्लेअर्सना वेपन्स, कॅरेक्टर, पेट्स, बंडल, स्किन, ग्लू वॉल व इमोट्स इत्यादी रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. याशिवाय काही दुर्मिळ रिवॉर्ड्स देखील रेडिम कोड्सच्या मदतीने जिंकू शकतात. हे असे रिवॉर्ड्स असतात जे मिळवण्यासाठी शेकडो डायमंड खर्च करावे लागतात. गरेनाने जारी केलेल्या आजच्या रेडिम कोड्सबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
बॅटल ग्राऊंड गेम फ्री फायर मॅक्समध्ये डायमंड्स इन-गेम करेंसी आहे. हे डायमंड्स खरेदी करण्यासाठी प्लेअर्सना पैसे खर्च करावे लागतात. यासाठी गेममध्ये वेळोवेळी टॉप-अप ईव्हेंट सुरु केला जातो. या ईव्हेंटच्या मदतीने प्लेयर्सना इन-गेम करेंसी डायमंड्सची खरेदी केल्यावर एक्स्ट्रा रिवॉर्ड्स फ्री मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही देखील गेममध्ये डायमंड्स टॉप-अप करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. गेममध्ये Lucky Bonus Top-up ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना डायमंड खरेदी केल्यावर आकर्षक रिवॉर्ड्स मिळणार आहेत. ज्यामध्ये Diamonds Box आणि Drum Twiri Emote इत्यादींचा समावेश असणार आहे. हा ईव्हेंट 16 ऑगस्ट रोजी सुरु झाला असून 22 ऑगस्टपर्यंत लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटदरम्यान प्लेअर्सनी डायमंड्स खरेदी केल्यास त्यांना Diamonds Box आणि Drum Twiri Emote यासारखे फ्री रिवॉर्ड्स दिले जाणार आहेत.