स्वस्त स्मार्टफोनच्या शोधात आहात? itel ने लाँच केला नवा 5G फोन, दमदार फीचर्ससह किंमत 10 हजारांहून कमी
स्मार्टफोन कंपनी Itel ने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन itel A95 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. हा हँडसेट ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 6300 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 6GB पर्यंत रॅम आहे आणि तो Android 14 वर काम करतो.
फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे आणि उत्पादकता साधने आणि व्हॉइस असिस्टंट सारख्या अनेक AI-समर्थित वैशिष्ट्यांसह येतो. फोटोग्राफीसाठी, स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सल मुख्य रियर सेंसर आणि 8-मेगापिक्सल सेल्फी शूटर आहे. Itel A95 5G तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन धूळ आणि स्प्लॅश रेजिस्टेंससाठी IP54 रेटिंगसह येतो. (फोटो सौजन्य – X)
itel A95 5G स्मार्टफोन भारतात 4GB + 128GB आणि 6GB + 128GB अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. itel A95 5G च्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 9,599 रुपयांपासून सुरू होते, तर 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये आहे. कंपनीने एक प्रेस रिलीज पाठवून ही माहिती दिली आहे. हा हँडसेट ब्लॅक, गोल्ड आणि मिंट ब्लू रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. फोनसोबत 100 दिवसांची मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट देखील दिली जात आहे.
11/
Itel A95 5G launched in India– 6.67- inch HD+ IPS Display with 120Hz refresh rate.
– MediaTek 6300 Octa-Core Processor.
– 50MP Super HDR Rear Camera and 8MP Front Camera.
– 5000mAh battery with 10W Charging.
– IP54 Rating.
– Priced at ₹9599 for 4GB + 128GB and ₹9999 for… pic.twitter.com/8WRkghdwby— Mukul Sharma (@stufflistings) April 17, 2025
itel A95 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि पांडा ग्लास प्रोटेक्शनसह 6.67-इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेज आहे. हे आउट-ऑफ-द-बॉक्स अँड्रॉयड 14 वर चालते.
कंपनीचा दावा आहे की itel A95 5G पाच वर्षांसाठी स्मूथ परफॉर्मंस देईल. कंपनीचे AI व्हॉइस असिस्टंट Aivana आणि Ask AI टूल्स हँडसेटमध्ये देण्यात आले आहेत. ही टूल्स यूजर्सना वेगवेगळ्या कंटेंट ड्राफ्ट करण्यासठी, माहितीचा सारांश देण्यास किंवा संदेशांचे अचूक ट्यूनिंग करण्यास मदत करतात. फोनमध्ये डायनॅमिक बार देखील आहे, जो फ्रंट कॅमेरा कटआउटभोवती कोलॅप्सिबल बारच्या स्वरूपात नोटिफिकेशन्स आणि अलर्ट मोठ्या स्वरूपात प्रदर्शित करतो.
फोटोग्राफीसाठी, itel A95 मध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य मागील कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. हे 2K व्हिडिओ रेकॉर्डिंग, ड्युअल व्हिडिओ कॅप्चर, व्लॉग मोड असे काही फीचर्स देण्यात आले आहेत.
स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी, यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर आहे. हँडसेटला IP54 धूळ आणि स्प्लॅश-प्रतिरोधक रेटिंग आहे. फोनमध्ये इन्फ्रारेड सेन्सर देखील आहे आणि त्याची जाडी 7.8mm आहे.