
आयफोनसारखी डिझाईन अन् 5000mAh बॅटरी... itel च्या नव्या स्मार्टफोनने घातला धुमाकूळ, किंमत केवळ इतकी
टेक कंपनीने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. या डिव्हाईसची सुरुवातीची किंमत 10,399 रुपये ठेवण्यात आली आहे. या टेक फर्मचा नवीनतम झेनो सिरीजचा स्मार्टफोन सध्या अॅमेझॉनवर 549 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह उपलब्ध आहे. आईटेल झेनो 200 हा कॉमेट ऑरेंज, मेटिअर टायटॅनियम आणि नाइटली ब्लू या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
आईटेलने लाँच केलेला झेनो 200 एक डुअल सिम स्मार्टफोन आहे, जो अँड्रॉईड 15 (गो एडीशन) वर चालतो. या डिव्हाईसमध्ये 6.75-इंच एचडी+ (720 x 1,600 पिक्सेल) आयपीएस एलसीडी टचस्क्रीन दिली आहे, जी 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 240Hz टच सँपलिंग रेट, 16.7 मिलियन कलर्स आणि 590 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करते. कंपनीने असा दावा केला आहे की, या हँडसेटमध्ये धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP65 रेटिंग आणि MIL-STD-810H सर्टिफिकेशन आहे.
नव्या आईटेल झेनो 200 मध्ये ऑक्टा-कोर यूनिसोक T7250 चिपसेट दिला आहे, जो 12nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. हा प्रोसेसर 1.8GHz ची पीक क्लॉक स्पीड देण्याचा दावा करतो. यामध्ये 4GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. सुरक्षेसाठी या डिव्हाईसमध्ये फेस अनलॉक सपोर्ट आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देण्यात आला आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, आईटेल झेनो 200 मध्ये मागील बाजूला f/1.85 अपर्चरवाला सिंगल 13-मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे, जो इन्फ्रारेड सेंसरसह येतो. याशिवाय, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. हे डिव्हाईस 1080p/30 fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे.
लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 15W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे. एकदा चार्ज केल्यावर 46 दिवसांपर्यंतचा स्टँडबाय टाइम, 30 तासांपेक्षा जास्त म्युझिक प्लेबॅक किंवा 28 तासांपेक्षा जास्त टॉक टाइम मिळतो, असा दावा केला जातो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, अल्ट्रालिंक आणि एक USB टाइप-C पोर्ट यांचा समावेश आहे. itel Zeno 200 ची जाडी 8.29mm असून त्याचे वजन अंदाजे 185 ग्रॅम आहे.