
Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा
जिओ आणि टी-मोबाईल यांनी केलेल्या या पार्टनरशिपनंतर देश बदलल्यानंतर देखील ग्राहकांना 5जीच्या नव्या नेटवर्कवर रोमिंगचा फायदा मिळणार आहे. यामुळे यूजर्सना केवळ वेगवान इंटरनेटच नाही तर लो-लेटेंसी आणि जास्त विश्वसनीय कनेक्शन देखील मिळणार आहे. यासोबतच, रोमिंगदरम्यान दोन्ही कंपन्यांचे ग्राहक व्हिडीओ स्ट्रिमिंगसह ऑफीसची काम देखील अगदी सहज पूर्ण करू शकणार आहेत. दोन्ही देशाचे यूजर्स रोमिंगदरम्यान अगदी सहज 5जी नेटवर्कचा वापर करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – AI Created)
.@TMobile and Jio Achieve World’s First 5G Standalone Roaming https://t.co/7NBckWcNnZ — T-Mobile Newsroom (@tmobilenews) September 21, 2026
टी-मोबाईलचे प्रमुख नेटवर्क ऑफिसर अंकुर कपूर यांनी जिओ आणि टी-मोबाईलच्या पार्टनरशिपबद्दल म्हटलं आहे की, एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचल्यानंतर देखील ग्राहक 5जी स्पीडचा वापर करू शकणार आहेत. ही तंत्रज्ञानाची फार मोठी शक्ती आहे.
जिओचे हेड-इंटरनेशन नेटवर्क, पार्टनरशिप अँड सर्विसेज मार्क यारकोस्की यांनी या पार्टनरशिपबद्दल म्हटलं आहे की, ही कामगिरी केवळ ‘रोमिंग’पुरतीच मर्यादित नाही. जिओ आणि टी-मोबाईल चे 5जी स्टँडअलोन नेटवर्क एकत्र आल्यामुळे ग्राहकांना आणि व्यवसायांसाठीच्या नवीन सेवांसोबतच ‘एआय’ वर आधारित सेवांचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
जिओ आणि टी-मोबाईलच्या 5G स्टँडअलोन रोमिंग कनेक्शनचा थेट फायदा भारत आणि अमेरिकेदरम्यान प्रवास करणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. दोन्ही कंपन्यांचे हे रोमिंग कनेक्शन शक्य करण्यासाठी सिनिव्हर्सच्या (Syniverse) प्लॅटफॉर्मने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या प्लॅटफॉर्मने जिओ आणि टी-मोबाइल यांची नेटवर्क्स सुरक्षितपणे एकमेकांशी जोडण्यास मदत केली.