Wi-Fi Not Working? Wi-Fi कनेक्ट होत नाहीये?(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
ही सगळ्यात जुनी ट्रिक आहे पण 100% काम करते. तुमच्या राऊटरचं बटण बंद करा. त्याचा प्लग पण काढून टाका. आता 30 सेकंद थांबा. घाई करू नका. 30 सेकंदानंतर परत प्लग लावा आणि राऊटर चालू करा. याने राऊटरची मेमरी साफ होते आणि तो फ्रेश होतो. 80% वेळा यानेच नेट परत येतं. Wi-Fi Not Working?
राऊटरवर छोट्या छोट्या लाईट असतात. Power, PON, LOS, Internet असं लिहिलेलं असतं. नीट बघा. जर LOS चा लाईट लाल झाला असेल तर समजून जा की बाहेरूनच केबल तुटली आहे किंवा कंपनीकडूनच नेट बंद आहे. यात तुम्ही काहीच करू शकत नाही, कंपनीवाल्यांना फोन करावाच लागेल. पण जर सगळे लाईट हिरवे असतील आणि तरीही नेट चालत नसेल तर प्रॉब्लेम तुमच्या मोबाईलमध्ये आहे.
कधी कधी घर झाडताना किंवा लहान मुलांनी किंवा कुत्र्या मांजरामुळे राऊटरची केबल हलते. मागे जी पिवळी किंवा निळी फायबर केबल असते ती सैल झाली की नेट जातं. एकदा राऊटरच्या मागे जाऊन सगळ्या केबल घट्ट बसल्या आहेत का ते चेक करा.
जर फक्त तुमच्याच मोबाईलमध्ये वाई-फाई चालत नसेल आणि बाकीच्यांच्या मोबाईलमध्ये चालत असेल, तर ही ट्रिक करा. तुमच्या मोबाईलचा एअरप्लेन मोड 5 सेकंदासाठी चालू करा आणि मग बंद करा. याने तुमच्या फोनचं नेटवर्क रिफ्रेश होतं आणि तो वाई-फाईचा सिग्नल परत पकडतो.
ही पण भारी ट्रिक आहे. तुमच्या मोबाईलच्या वाई-फाई सेटिंगमध्ये जा. तुमच्या वाई-फाईच्या नावावर दाबून ठेवा. तिथे Forget Network असा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा. आणि मग परत तुमच्या वाई-फाईचं नाव शोधून पासवर्ड टाकून कनेक्ट करा. याने बऱ्याचदा IP चा जो घोळ असतो तो निघून जातो.
अनेक लोक राऊटर कपाटात लपवून ठेवतात किंवा भिंतीच्या एका कोपऱ्यात ठेवतात. असं करू नका. वाई-फाईचे सिग्नल सगळीकडे जायला हवेत. राऊटर नेहमी घराच्या मधोमध आणि थोडा उंचावर ठेवा. खाली जमिनीवर ठेवू नका. भिंतीच्या मागे पण ठेवू नका. मोकळ्या जागी ठेवलं की स्पीड पण चांगला येतो.
एकाच वाई-फाईवर घरातले 4 मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप सगळं चालू असेल तर नेट स्लो होणारच. स्पीड सगळ्यात वाटला जातो. त्यामुळे जे वापरत नाहीत त्यांचं वाई-फाई बंद करा. आणि टीव्हीवर कोणी बघत नसेल तर त्याचं पण बंद करा.8. 5GHz वाला ऑप्शन वापरातुमच्या राऊटरमध्ये दोन नावं दिसत असतील, एक 2.4GHz आणि एक 5GHz. तर नेहमी 5GHz ला कनेक्ट व्हा. त्यावर स्पीड जास्त मिळतो. 2.4GHz वर घरातले दुसरे इलेक्ट्रॉनिक सामान जसं की मायक्रोवेव्ह याच्यामुळे अडथळा येतो. 5GHz एकदम क्लीन असतं.






